खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

मेहेरगाव येथे दोन गटात दंगल उसळून दोन जण गंभीर जखमी, परस्परविरोधी ११ जणांवर गुन्हा

लाकडी दांडका आणि फायटरने एकमेकांवर हल्ला करून केले जखमी

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या फवारणीवरून झालेल्या भांडणाच्या कारणावरुन अमळनेर तालुक्यातील मेहेरगाव येथे दोन गटात दंगल उसळली. यात लाकडी दांडका आणि फायटरने एकमेकांवर हल्ला करण्यात आल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी ६ रोजी सायंकाळी साडे सात वाजता घडली. याप्रकरणी ११ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अमळनेर तालुक्यातील मेहेरगाव येथे दोन गटात सोमवारी सायंकाळी दंगल झाली. यात शरद विनायक पाटील यांनी फिर्याद दिली की, ३ रोजी गावात कोरोनाच्या फवारणीवरून झालेल्या भांडणाचे कारण उकरून राकेश दिलीप कोळी , अरुण गुलाब कोळी , व इतर ३ ते ४ जणांनी चापट बुक्क्यांनी मारहाण करून राकेश याने हातातील फायटरने डोक्याला मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली यावरून दोघांसह इतर चौघांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दुसऱ्या गतातर्फे राकेश दिलीप ठाकरे यांनी फिर्याद दिली की शरद विनायक पाटील , सुभाष विनायक पाटील , छाया शरद पाटील , विशाल शरद पाटील , व सुभाषची पत्नी यांनी मागील भांडणाच्या कारणावरून ६ रोजी गावदरवाज्याबाहेर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व शरदने दांडक्याने उजव्या पायाच्या घोट्यावर मारून जखमी केले. यावरून पाचही जंनविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटनांचा तपास एएसआय संतोष पवार करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button