खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १२ एप्रिल रोजी होणारा भव्य संत सावता गौरव पुरस्कार सोहळा स्थगित

नाशिक विभागीय संत सावता गौरव पुरस्कार समितीच्या निर्णयाचे स्वागत

अमळनेर( प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले जयंती निमित्त अमळनेरात १२ एप्रिल रोजी होणारा नाशिक विभागीय संत सावता गौरव पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आला असून या दिवशी महत्मा फुले जयंतीचेही कार्यक्रम न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे संत सावता बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे काळजी घेण्याच्या दृष्टीने गर्दी जमवणाऱ्या कार्यक्रमांना रद्द करण्याच्या सूचना शासनाने सर्व संस्था संघटना यांना दिल्या आहेत. महात्मा फुले जयंती सप्ताहनिमित्त अमळनेर येथे दि.१२ एप्रिल रविवार होणाऱ्या सावता प्रेरणा प्रबोधन विकास संस्था व क्रांतीसुर्य महात्मा फुले विचारमंच महाराष्ट्र्र आयोजित नाशिक विभागीय भव्य संत सावता गौरव पुरस्कार सोहळा २०२० स्थगित करण्यात आलेला आहे.  या कार्यक्रमात महाराष्ट्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याने नाशिक विभाग मिळून एकूण मोठे ३२ मंडळ, संघटना यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. सदर सोहळ्यास मोठ्या प्रमाणावर संघटना, मंडळे, महिला मंडळे, पंच मंडळे समाज बांधवांसह मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थिती देणार आहे. परंतु आरोग्याच्या दृष्टीने परिस्थिती पूर्वत होई पर्यंत शासनाचे पुढील आदेश जाहीर झाल्यावर नाशिक विभागीय संत सावता पुरस्काराची तारीख जाहीर करण्यात येईल. तरी सर्व माळी समाज संघटना, महिला मंडळे, पंच मंडळे, विविध संस्था, सावता भक्त समाज बांधव, महिला भगिनी सर्व नागरिक यांनी नोंद घ्यावी. तसेच महात्मा फुले जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करावेत व सर्वांनी काळजी घेऊन इतरांनाही काळजी घेण्यास सांगा, असे क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच महाराष्ट्र्रचे संस्थापक व सावता प्रेरणा प्रबोधन विकास संस्था अध्यक्ष प्रवीण बी.महाजन, अनिता महाजन, रुपाली महाजन, नाशिक विभागीय संत सावता गौरव पुरस्कार समितीने कळवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button