खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

अमळनेर पोलिसांचे दुसर्‍या दिवशीही धाडसत्र, दोन जुगारी आणि एक दारू विक्रेत्याला अटक

अवैध धंदे चालकांमध्ये उडाली मोठी खळबळ, पोलिसांची धडक मोहीम अशीच सुरू राहणार

अमळनेर (प्रतिनिधी) शहर व तालुक्यात पोलिसांचे धाडसत्र सुरूच असून दुसऱ्या दिवशीही सट्टा जुगार खेळवताना दोघांना आणि दारू विकताना एकाला अटक केली आहे. यामुळे अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. ही धडक मोहीम अशीच सुरू राहणार असे पोलिसांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक अंबादास मोरे , ए पी आय प्रकाश सदगीर , हेडकॉन्स्टेबल बापू साळुंखे , पोलीस नाईक सुनील हटकर , प्रमोद पाटील , भूषण पाटील , संजय पाटील आदींनी शहरात गांधलीपुरा भागात छपा टाकला असता राकेश अरुण चौधरी (वय 47) यास पाचकंदील चौकात सट्टा जुगार खेळवताताना रंगेहात पकडून त्यांच्याजवलील एक हजार चाळीस रुपये रोख व जुगाराचे साधने जप्त केले , तसेच हॊटेल शीतल च्या भिंतीच्या आड अजय आण्णा चव्हाण (वय 29) हा सट्टा जुगार खेळवताना आढळून आल्याने त्याला अटक करून त्यांच्याजवलील एक हजार दहा रुपये व साहित्य जप्त  करण्यात आले तर बिलखेडे येथे धाड टाकून तेथील बोरी नदीच्या काठावर बेकायदेशीर गावठी हात भट्टीची दारू विकताना संजय ओंकार भिल याना रंगेहात पकडण्यात आले त्याच्याजवळून 760 रुपये किमतीची 20 लिटर दारू व इतर साहित्य जप्त करण्यात आले तिघांविरुद्ध  अमळनेर पोलीस  स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button