खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेरात कॅन्सर शिबिरात ३५६ रुग्णांची  तर ११२ महिलांची पैप स्मिअर तपासणी 

लायन्स क्लब ,आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर आणि ग्रामीण रुग्णालयतर्फे शिबिराचे आयोजन 

अमळनेर (प्रतिनिधी) येथील लायन्स क्लब, आधार बहुउद्देशीय संस्था व ग्रामीण रुग्णालयतर्फे झालेल्या कॅन्सर शिबिरात ३५६ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
त्यात मुख्य म्हणजे स्त्रियांमधील स्थनाच्या गाठीची व गर्भाशय मूखाच्या ११२ महिलांची पैप स्मिअर तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन जळगावचे सुप्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉक्टर निलेश चांडक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा रुग्णालय जळगाव येथील मुख्य सिव्हील सर्जन डॉ. एन. एस. चव्हाण होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी डॉ. चांडक व डॉ. चव्हाण यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच अमळनेर येथील लायन्स क्लब चे सभासद डॉ. मंजिरी कुलकर्णी यांचे ऑल इंडिया लायनेस क्लबचे अध्यक्षची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार लायन्स क्लबचे अध्यक्ष नीरज अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला लायन्स क्लब अमळनेरचे सर्व सदस्य सोबत आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा भारती पाटील, कार्यकारी संचालक रेणू प्रसाद व यांची संपूर्ण टीम तसेच ग्रामीण रुग्णालय अमळनेर ची पूर्ण टीम त्यात प्रामुख्याने डॉ.ताडे, डॉ. जी.एम.पाटील, डॉ. संचेती, समुपदेशक अश्वमेध पाटील, जयेश मोरे यांचे सहकार्य लाभले.  भारती पाटील यांनी आभार मानले.

या डॉक्टरांनी केली रुग्णांची तपासणी 

जळगाव येथील सुप्रसिद्ध कँसर तज्ञ डॉ. नीलेश चांडक, डॉक्टर श्रध्दा चांडक,व अमळनेर येथील डॉक्टर रवींद्र जैन इतर सहकारी डॉक्टरांनी केली.  प्रयोगशाळा तपासणी साठी डॉ. प्राजक्ता बहुगुने व डॉक्टर हिरा बाविस्कर व डॉक्टर मनीषा भावे यांनी सहकार्य केले. ज्या रुग्णांना एक्स-रे सोनोग्राफी व इतर तपासणीची गरज होती त्यांना सुद्धा सदरच्या तपासणी मोफत मध्ये करून देण्यात आली. तसेच ज्या रुग्णांना ज्या सर्जरीची आवश्यकता होती त्यांना जिल्हा रुग्णालयाला पुढील तपासणी व सर्जरी करिता पाठवण्यात आले. संशयित रुग्णाची बायोप्सी तपासणी शिबिरा दरम्यान करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button