खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

थ्रेशर मशीन घेऊन गेलेल्या शेतकर्‍याला डोळ्यादेखत जळून गेलेला मका दिसला ; सुमारे दोन लाखाचा मका जळून खाक झाल्याने शेतकरी खचला..

कुणीतरी अज्ञात व्यक्तीने हे  कृत्य केल्याचा शेतकऱ्याने केला आरोप

अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील गांधली येथील शेत गट नंबर २४५/२ शेतात असलेला मका जळून खाक झाल्याची घटना घडली. यात शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून कुणीतरी अज्ञात व्यक्तीने हे  कृत्य केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला.

        सोमा संपत महाजन (रा.गांधली) यांच्या गट नंबर २४५/२ एक हेक्टर ७६ आर या स्वमालकीच्या  गांधी शिवारातील शेतात चालू वर्षात मका पेरला होता. दिनांक 3 डिसेंबर रोजी मक्याची बुंणके मोडून शेतात ढिगारा मारून ठेवला होता. काही दिवस खराब वातावरणामुळे मक्याच्या बुणक्यांच्या ढिगारा  प्लास्टिक कागद व ताळपत्री झाकून ठेवला होता.  दिनांक १७ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत शेतात होते. त्यानंतर रात्री उशिरा घरी आले १८ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता मका काढण्यासाठी थ्रेशर मशीन घेऊन शेताकडे गेले. मात्र समोर वेगळे चित्र दिसले. संपूर्ण मक्याच्या ढिगा-यांला आग लागली होती. संपूर्ण मका जळून खाक झाला होता. हे पाहून शेतकऱ्याने मोठा धसका घेतला आहे.

कृषी सहाय्यक, तलाठी यांनी पोलीस पाटील आणि गावपंचासमोर केला जळालेल्या मकाचा पंचनामा

सुमारे ९० ते ९५ क्विंटलचा १,५०,००० ते २,००,००० रुपये किंमतीचा मका जळून खाक झाला आहे. याबाबत त्यांनी अमळनेर पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे. तसेच कृषी सहाय्यक, तलाठी यांनी पोलीस पाटील व गावपंचासमोर पंचनामा देखील केला आहे. पंचनामा करतांना सुमारे २,००,०००लाख रूपयांचा मका नुकसान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button