खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

अभावीपतर्फे मुकमोर्चा काढून  हैदराबाद येथील घटनेचा निषेध करून प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

खटला जलदगती न्यायालयात चालण्याची केली मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) अभावीपतर्फे मुकमोर्चा काढून हैदराबाद येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध केला. यासंदर्भात प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना निवेदन देण्यात आले.  खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलापासून मुकमोर्चा काढण्यात आला. व डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावर पाशवी बलात्कार करून जिवंत जाळणाऱ्या या संपूर्ण घटनेने देशात विशेष करून महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद निषेध करीत असून प्रशासनाच्या माध्यमातून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व तो खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा,
अशी मागणीचे निवेदन प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना दिले. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहर मंत्री निलेश पवार, मोर्चा प्रमुख प्रगती काळे, शहर मंत्री क्रांती ठाकरे, मेघा पाटील, नागराज माळी, मनिषा वाल्हे, विकास चौधरी, जे के दाभाडे, जे के सोनवणे, ए ए गरुड, प्रा धीरज वैष्णव, राजेंद्र निकुम, माधुरी पाटील, डॉ चंद्रकांत पाटील, अभिषेक पाटील, दिनेश नाईक, रोहन मुंदडा, सुवर्णा देसले, हर्षल पाटील, नरेंद्र देसले, केशव पाटील, माधुरी पाटील, निकिता शिंपी, वैष्णवी पाटील आदी उपस्थित होते यावेळी प्रताप महाविद्यालय, अॅड. ललिता पाटील इंटरनेशनल स्कूल, दौ. रा. कन्या शाळा यातील विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button