खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

१५० युवा संतांच्या उपस्थित अमळनेर येथील स्वामीनारायण चौकाचे नामकरण

खान्देशात पंचतीर्थ यात्रा करण्यासाठी अमळनेरात अवतरला संतांचा मेळा

अमळनेर ( प्रतिनिधी)- सारंगपूर येथील प्रशिक्षित १५० युवा संतांच्या उपस्थित अमळनेर येथील स्वामीनारायण चौकाचे विधिवत पूजा करून नामकरण करण्यात आले. या वेळी भाविकांनी या संतांच्या दर्शनासाठी गर्दी केली होता. या सोहळ्यामुळे अमळनेरात संतांचा मेळा अवतरला होता.
विश्ववंदनीय प्रकट ब्रह्मस्वरूप परम पूज्य महंत स्वामी महाराज यांच्या आज्ञेनुसार खान्देशात पंचतीर्थ यात्रा करण्यासाठी सारंगपूर येथील प्रशिक्षित १५० युवा संतांचे अमळनेरात जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर भव्यदिव्य असे स्वामीनारायण चौकीचे भगवंताचे स्तोत्र, आरतीने नामकरण करण्यात आले. स्वामीनारायण चौकाचे नामकरण अमळनेर नगरपरिषदेच्या सौजन्याने प्रस्तावित करण्यात आले. यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांचे सहकार्य लाभले. त्यानंतर १५० संतांनी भगवंतांचे दर्शन घेऊन साष्टांग दंडवत केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी हरिभक्त श्यामकांत बागड, प्रीतम मणियार, अतुल सोनी, अमरीश अग्रवाल , हरिकृष्ण सोनी, जगदीश चौधरी, चंद्रकांत लोहार, चंद्रकांत महाजन, रमेश कुंभार, किशोर सोनी, नरेंद्र सोनी, अनिल पाटील, चंद्रकांत वाणी, रवी चौधरी, आकाश माहेश्वरी, राकेश माहेश्वरी, महिला मंडळ युवक-युवती मंडळ सत्संग मंडळाने सहकार्य केले.

मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ
संतांचे पुष्पवृष्टीद्वारे स्वागत

मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ संतांचे पुष्पवृष्टीद्वारे स्वागत करण्यात येत होते. योगीस्नेह स्वामी, संतवृंद तथा अमळनेरनगरीचे कृषिभूषण माजी आमदार साहेबराव पाटील, बजरंग अग्रवाल यांनी भगवंतांची आरती केली. या कार्यक्रमाला दलित समाजाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ संदांशिव, नगरसेवक मनोज पाटील, नगरसेवक निशांत अग्रवाल, योगेश मुंदडा, विक्रांत पाटील , प्रवीण सोनी, प्रदीप अग्रवाल, पंकज मुंदडा, प्रसाद शर्मा, जितेंद्र जैन, आकाश माहेश्वरी, नीरज अग्रवाल यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button