खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

प्रेम.. स्नेह… उत्साह.. आणि जल्लोषचे ‘अंबिका’ मंगल कार्यालयाने अमळनेरकरांशी जोडले नाते..

कैलास पाटील यांच्या मंगलकार्यालयाचा तिसरा वर्धापन दिननिमित्त 'खबरीलाल'ने घेतला धांडोळा

अमळनेर (खबरीलाल विशेष) : प्रेम.. स्नेह… नातं…उत्साह.. आणि जल्लोषाचा संगम म्हणजे अमळनेरातील अंबिका मंगल कार्यालय. विवाह बंधनात अडकणाऱ्या अनेकांना या वास्तुने अक्षरशः भुरळ घातली आहे. याच मंगल कार्यालयातून आपल्या विवाहाचे आणि कोणत्याही मंगल कार्याचे क्षण संस्मरणीय करण्यास पसंती देत आहेत. या मंगल कार्यालयाचा १२ नोव्हेंबर रोजी तिसरा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने या मंगल कार्यालयाची उभारणी आणि गेल्या तीन वर्षांत पुरवण्यात आलेल्या सुविधा आणि बदल याचा ‘खबरीलाल’ने धांडोळा घेतला आहे.

अमळनेरकरांना सुपरिचित असलेले कैलास पाटील यांनी अमळनेर येथील गलवाडे रोडवर पुण्या, मुंबईच्या धर्तीवर अंबिका मंगल कार्यालायाचे वैभव उभारले आहे. अत्यंत कष्टाने उभारलेल्या या वैभवामागे त्यांचा सेवाभाव, प्रामाणिकपण, सचोटीचा मूलाधार आहे. अख्ख्या पाटील कुटुंबीयांच्या श्रमाने हे मंगलकार्यालय दिमाखाने उभे राहिले आहे. लोकांच्याही सचोटीवर ते उतरल्यानेच या मंगलकार्यालयाने आपला एक वेगळा ठसा उमटला आहे. त्यामुळे अंबिका मंगल कार्यालय नुसते कार्यालय नसून एक चांगला ब्रँड आहे. म्हणून पाटील यांनी अमळनेरात नावलौकिक मिळविला आहे.


कैलास पाटील यांनी त्यांच्या दोन बंधूंचा मंडपचा व्यवसाय होता. त्याला जोड म्हणून मोठ्या परिश्रमाने त्यांनी १२ नोव्हेंबर २०१६ रोजी अंबिका मंगलकार्यालय उभारून अमळनेरकरांसाठी नवे दालन खुले केले. विशेष म्हणजे एकाच कामावर लक्ष केंद्रीत करून सेवेते कोणतीही तडजोड करीत नसल्याने हे मंगल कार्यालय लोकांच्या पसंतीस उतरले आहे.

शहरातील कोणत्याही कोपऱ्यातून पाच मिनिटात पोहचात येते मंगलकार्यालयात…

शहरातील कोणत्याही कोपऱ्यातून अवघ्या पाच मिनिटात मंगलकार्यालयात पोहचता येते. केटरींगपासून ते वाजंत्री, घोडा उपलब्ध करून देण्यात येत असल्याने विवाह करणार्‍यांना कुठेही फिरून पायपीट करावी लागत नाही. एकदा दिलेला शब्द पाळला जातो. म्हणून कोणीही नाराज होऊन जात नाही, ही वैशिष्ट्य कैलास पाटील यांनी जपले आहे. ढेकू रोड, पिंपळेरोड ते थेट धुळे रोडशीही हे मंगलकार्यालय जोडले गेले आहे. स्टेशन रोडने उड्डाण पुलाखालून ही मंगल कार्यालयात येता येते. म्हणजेच सुविधांसह सुखर मार्ग या मंगल कार्यालयाचा आहे. तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त त्याच्या भरभराटीला अमळनेरकरांसह ‘खबरीलाल’कडून अक्षररुपी शुभेच्छा..!!!

“थ्रि” स्टार हॉटेलचे फिलिंग….

प्रत्येक माणूस मंगल कार्यालयाची भव्य इमारत पाहताच प्रेमात पडतो. हवेशीर रचना, प्रसन्न वातावरण मनाला भुरळ घालते. १६०० लिटर्सचे सोलरसिस्टीममुळे गरम पाण्यची सुविधा मिळते. जम्बो जनरेटर, सुंदर आकर्षक लग्न हॉल, स्टेजची रचना, फुलांचे डेकोरेशन, फुलझाडांचे सुंदर स्वागत गेट, उत्कृष्ट सेवा, स्वादिष्ट व रुचकर भोजनाची व्यवस्था या सोयींनी “अंबिका मंगल कार्यालय” विवाहासाठी वधु-वरांना आकर्षिक करीत आहे. नवी सजावट, नव्या पिढीचा कल बघुन गेट सजावट, रात्रीचा लाईट इफेक्ट, एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध, सुधारीत डायनिंग हॉल, १२ एसी रुम आणि मिटींग रुमही एसी आहे. सावलीसाठी प्रांगणात लावेलेली असंख्य झाडे , गाड्या पार्किंगची उत्तम सोय असल्याने प्रत्येकालाच थ्री स्टार हॉटेलमध्ये असल्याचे फिलिंग जाणवते.

“व्हाय-फाय” आणि सीसी-टीव्ही कॅमेऱ्याची नजर…

बदलणार्‍या जगाबरोबर कैलास पाटील यांनी आपल्या अंबिका मंगलकार्यालयात सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात इंटरनेट ही प्रत्येकाची जीवनावश्यक गरज झालेली आहे. म्हणून मंगलकार्यालयात येणार्‍यांना व्हाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येकाच्या वस्तूंची सुरक्षितता जपण्यासाठी आणि विघातक गोष्टींना पायबंद घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यामुळे येथे कार्यक्रम घेणार्‍या प्रत्येकाला आपण सुरक्षित असल्याची भावना निर्माण होते. म्हणूनच लोक ‘अंबिका’ मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यासह विविध कार्यक्रम घेण्यासाठी प्रथम प्राधान्य देतात. हेच या मंगल कार्यालयाच्या यशाची पावती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button