खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

अमळनेरला येथील श्री मंगळ देव ग्रह मंदिर मध्ये दीपोत्सवानिमित्ताने वसुबारस व धनतेरस साजरी

कर्मचाऱ्यांना दिला दीपावलीचा विशेष बोनस व आगाऊ वेतन

अमळनेर ( प्रतिनिधी ) शहरातील प्रसिद्ध श्री मंगळ देव ग्रह मंदिर दिवाळी निमित्ताने सजविण्यात आले असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी वसू बारस व धनतेरस निमित्त विशेष पूजा करून विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात आले. यामुळे मंदिराच्या परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंदिरात गीर जातीच्या दोन गाई आहेत. वसू बारस निमित्ताने त्यांची विधिवत पूजा करण्यात आली. तसेच श्री यंत्राची विशेष कुंकुमार्जन पूजा करण्यात आली. मंदिरात धनतेरस निमित्तची विशेष पूजाही झाली. यावेळी वसुबारस व धनतेरसह दीपावलीच्या पार्श्वभूमीवर मंदिराला अत्यंत मनोहारीरित्या सजवण्यात आले आहे.

तुलसी विवाहाची मंदिरात जय्यत तयारी

येत्या चार दिवसातही मंदिरात रोज विशेष पूजा अर्चा व सजावट होत राहणार आहे. दरम्यान येत्या १२ नोव्हेंबरला मंदिरात भव्य श्री तुलसीविवाहाचा कार्यक्रम होणार आहे. त्याची तयारी मंदिरात सुरु झाली आहे.

मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी केली गोड

मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांना दीपावलीचा विशेष बोनस व आगाऊ वेतन देण्यात आले. तसेच सर्वांना विश्वस्तांच्या हस्ते मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी.बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम,खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्थ अनिल अहिरराव, जयश्री साबे उपस्थित होते. कर्मचाऱ्यांतर्फे व्यवस्थापक गणेश सपकाळे यांनी विश्वस्थ मंडळाचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button