खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

पाडळसेसाठी ५ वर्ष महाजनांनी केले काय.? हवा टाईट झाल्याने नागरिकांचे धरताय पाय..!

राष्ट्रवादीचे विद्यार्थी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भूषण भदाणे यांनी केली सडकून टिका...

अमळनेर (प्रतिनिधी) आगामी पाच वर्षातही अमळनेर तालुक्यातील पाडळसे धरण पूर्ण होणार नाही, हे सुज्ञ नागरिकांना माहिती असतानाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे तीन वर्षात हे धरण पूर्ण करून शेतात पाणी आणण्याच्या वलग्ना करीत आहे. मग पाच वर्ष यांनी धरणातील गवत उपटले काय असा प्रश्न उपस्थित होत असून इंद्र आणि सरविश्वश्वरैया जरी खाली उतरून आले तरी धरण पूर्ण होणार नाही. त्यामुळे खरेतर ते अमळनेकर जनतेला उल्लू बनवून दिवसा तारे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र अमळनेर मतदार संघातील जनतेने कोणत्याही भूलथापांना बळी न पडता भूमिपुत्रालाच निवडून देण्याचे ठरवलयं. म्हणून कोणी कितीही थयथयाट केला तरी जनता आता स्वतःचे ऐकणार आहे, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते भूषण भदाणे यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे भूषण भदाणे यांनी टिका करताना म्हटले आहे की, निवडणुकीच्या तोंडावर पाडळसेसाठी १५०० कोटी रुपायंचे नाबार्डकडून कर्ज घेण्यास मंजुरी दिल्याचा गवगवा करण्यात आला. मात्र सरकार आणि जलसंपदामंत्री हे पाच वर्ष झोपेलेल होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी निर्णय घेतला. विशेष म्हणजे हा निधी कोणत्या वित्तीय संस्थेकडून घ्यायचा हे अद्याप ठरलेले नाही, हे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. त्यामुळे तीन वर्षात काय पाच वर्षातही हे धरण पूर्ण होणार नाही. त्यातही राज्य वित्त आयोग, आणि राज्य तांत्रिक समिती ची मान्यता नाही त्यामुळे कोणतीही राज्याची देशाची वित्त संस्था कर्ज देऊ शकत नाही.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच काळात निधी मिळालेला आहे ते धरण आज दिसत आहे. भाजपा सरकरच्या काळात एक इंचही धरण उभे राहिले नाही. त्यामुळे निव्वळ जलसपंदामंत्री लोकांच्या डोळ्यात धुळफेक करून उल्लू बनवत आहे. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार महाराष्ट्रभर फिरत असल्यामुळेच भाजपाला आणि त्यांच्या उमेदवारांना घाम फुटत आहेत. त्यांचा उत्साह उमेदवारांना बळ देत आहे. उल्लू बनवण्याचे कोणतेही मशीन त्यांच्याकडे नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यात किती जागा येतील, हे लवकरच जनता दाखवून देणार आहे. त्यांना सत्तेची चढलेली गुर्मी आता जनताच उतरवणार आहे. ज्यांनी पाच वर्ष मतदार संघाला वेठीस धरले, विकास रोखला अशा उमेदवाराल तिकिटी देऊन भाजपा पुन्हा मतदार संघाला विकासापासून दूर नेण्याचे महापाप करीत आहे, अशी टिकाही राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते भूषण भदाणे यांनी केली आहे.

जलसंपदामंत्री महाजन यांनी समज दिली की दमबाजी केली..?

अमळनेर मतदार संघाची जागा हातातून जाणार असल्याने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याही पायाखालची वाळू घसरली आहे. म्हणूनच त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी भाजपाच्याच ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची इज्जत घेतली.
यावेळी भाजपचे जुने कार्यकर्ते मंत्री महाजनांना भेटायला गेले असता महाजनांनी त्यांनाही पक्षाचे काम करायचे असेल तर करा नाही तर करू नका अशी तंबी देण्यात आली असे भाजपचे कार्यकर्त्यांनी नाव न सांगण्याच्या अटी वर सांगितले आहे. तरी तिकीटावरून नाराजीनाट्य संपले नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसून आले. म्हणूनच त्यांनी माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार साहेबराव पाटील यांना उमेदवार पडल्यास त्यांचेही राजकीय भविष्य खराब करण्याचा सज्जड दम दिला. महाजन हे दम देत असतानाच उदय वाघ आणि साहेबराव दादा यांचा चेहरा पडला तर उमेदवार शिरीष चौधरी आणि त्यांचे बंधू रवींद्र चौधरी आणि त्यांचे कार्यकर्ते फिदीफीदी हसत होते. हा सारा बाका प्रसंग अमळनेर मतदार संघातील जनता पाहत आहे. त्यामुळे ज्यांची हयाती पक्षात गेली त्यांनाच अशी खाली मान घालावी लागत असेल तर त्यांच्या कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचा हे काय आदर करतील, असा प्रश्न पडू लागला आहे.

खरच तालुक्याचेही ठरलय….

या मेळाव्यात आमचं ठरलय, तालुक्याचेही ठरलंय, असे सूचक वक्तव्य भाजपा चे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केल्याने शिरीष चौधरींना निवडून आणण्याचे की त्यांना पाडण्याचे ठरलंय हे मतदानानंतर लगेच २४ तारखेला दिसणार आहे. त्यामुळे त्यांचा हा गर्भगळीत अर्थ आता सुज्ञ नागरिक घेऊ लागले आहेत. म्हणून खरच तालुक्याचे जनतेचेही ठरल्याने भाजपाचा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटणार आहे. अमळनेर मतदार संघाचेही तेच वैशिष्ट्ये आहे. ज्याच्या मागे खूप फौजफाटा असतो, त्याला जनता आपटतेच हे दोन पंचवार्षिक निवडणुकीत जनतेने दाखवून दिले आहे. म्हणून कोणी कितीही जोर लावला तरी जनतेने जे ठरवले आहे, तेच होणार आहे, असा विश्वासही राष्ट्रवादी काँग्रेसचे भूषण भदाणे यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button