अमळनेर (प्रतिनिधी) धाडधाड धावणाऱ्या रेल्वेतच गरोदर महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्याने तिच्या पतीसह आजूबाजूच्या प्रवाशांचीही धांदल उडाली. धावणारी रेल्वे आणि प्रसूती कळाने विवहळणारी महिला पाहून सर्वांच्याच्या काळजाचे धस्स झाले, पण आजूबाजूच्या आयाबायांनी प्रसंगावधान राखत महिलेला रेल्वेच्या स्वच्छतागृहात नेले. डॉक्टर नाही की कोणी नर्स नाही, आणि रेल्वेही धावत होती. काय होईल, …