पाडळसे धरणासाठी आता ‘रक्तरंजित’ लढा, ५१००० पत्रे लिहून शासनाचा उघडतील डोळा!

९ फेब्रुवारीला मिरवणूक काढून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठवणार पोस्टकार्ड धरण  समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, रणजित शिंदे यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातही सुजलाम सुफलाम म्हणून वरदान ठरणार्‍या निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाचे काम गतिमानतेने व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत धरणाचा समावेश करावा यासाठी अमळनेरच्या हजारो …

अमळनेर पंचायत समिती सभापतीपदी भाजपच्या रेखा पाटील तर उपसभापतीपदी भिकेश पाटील बिनविरोध

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या रेखा नाटेश्वर पाटील तर उपसभापतीपदी भिकेश पावभा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. यावेळी रेखा पाटील व भिकेश पाटील यांनी सकाळी ११ वाजता प्रत्येकी दोन अर्ज घेतले होते. त्यानंतर हेच दोन अर्ज आल्याने निवड बिनविरोध होणार हे …

अभाविप आणि राष्ट्रीय सुरक्षा मंच संघटनेने रॅली काढून नागरिकत्व सुधारणा कायद्याला दिले समर्थन

अमळनेर (प्रतिनिधी)  केंद्र शासनाने पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा संशोधन  कायदा (सीएए व एनआरसी ) च्या समर्थनार्थ अभाविप व राष्ट्रीय सुरक्षा मंच संघटनेतर्फे अमळनेर शहरातून रॅली काढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली. तहसील कार्यालयाजवळ रॅलीचा समारोप होऊन सभेत रुपांतर झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. …

अमळनेरात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे स्मारक उभे राहणार

अमळनेरात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे स्मारक उभारून त्यांच्या कार्याच्या आठवणी नेहमी तेवत ठेवण्याचा मानस कार्यकर्त्यांचा आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अमळनेरात उदय वाघ यांनी केलेले कार्य कधीही विसरता येणारे नाही. त्यांनी अनेक सर्व सामान्यांना आणि कार्यकर्त्यांना घडवले आहे. उभे केले आहे. भाजपासाठी भरीव असे काम …