पाडळसे धरणासाठी आ.शिरीष चौधरी यांचे मुख्यमंत्री यांना साकडे

अमळनेर तालुक्यातील पाडळसे धरणाला अत्यल्प निधी दिल्याबद्दल असमाधान व्यक्त करीत आ.शिरीष चौधरी यांनी काल अमळनेर तालुक्यातील सरपंचानां घेऊन मुख्यमंत्री यांची भेट घेतली.यावेळी धरणास भरघोस निधी मिळावा आणि जनआंदोलनाच्या लोकक्षोभाची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटिल यांच्यासह धुळे येथिल मा.आ.प्रा.शरद पाटील यांनी देखिल आंदोलनाची माहिती देऊन …

निम्नतापी प्रकल्प पाडळसेच्या एकही अधिकारी आंदोलनाकडे फिरकला नाही ; जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी यांनी जाहिर निषेध नोंदविला.

पाडळसे धरणासाठी सुरु असलेल्या साखळी उपोषणात अमळनेर पत्रकार संघटनेचाही सहभाग अमळनेर(प्रतिनिधी )पाडळसे धरण युद्धपातळीवर सुरू होण्यासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणात आज आ.शिरीष चौधरी, मा.आ.डॉ. बी.एस.पाटील यांनीही आज आंदोलनास पाठिंबा दिला. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या पत्रकारांनीही ‘जल है तो कल है ‘ हे वास्तव लक्षात घेत जनतेच्या प्रश्नावर आंदोलनात …

पाडळसरे धरणासाठी जनता त्रस्त ; मात्र लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष…. जलसंपदामंत्री आश्वासन देण्यात मस्त ; येणाऱ्या निवडणुकीत पुढारी व्यस्त.

पाडळसरे धरण जन आंदोलन संघर्ष समितीचे शिवजयंती पासून साखळी उपोषण सुरू होणार अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरण संदर्भात संघर्ष समितीचे शिवजयंती १९ फेब्रुवारी पासून साखळी उपोषण सुरू होणार असल्याची माहिती संघर्ष समितीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. बुधवारी सांयकाळी येथील मामा ट्रान्सपोर्ट येथे संघर्ष समितीच्या वतीने आयोजित करण्यात आली …