मुख्यमंत्री फडणवीस यांचे आ शिरीष चौधरींसह शिष्टमंडळास आश्वासन अमळनेर( प्रतिनिधी) निम्न तापी पाडळसे धरणास लवकरच मोठा निधी उपलब्द करून देणार असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळास दिली असल्याची माहिती आ शिरीष चौधरी यांनी दिली.धरणासाठी सुरु असलेल्या साखळी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आमदारांनी नुकतीच मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. …
शेतकऱ्यांना समृद्धी देणारे धरण मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांनी तातडीने पूर्णत्वास न्यावे – सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील
अमळनेर(प्रतिनिधी)”सरकार मध्ये मंत्री असलो तरी एक शेतकरी म्हणून मी पाडळसे धरणाच्या जनआंदोलनात सहभागी आहे.अमळनेर, धरणगाव सह परिसरातील शेतकऱ्यांना समृद्धी देणारे धरण खासबाब म्हणून मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांनी तातडीने पूर्णत्वास न्यावे!” असे सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी पाठींबा दिला. साखळी उपोषण आंदोलनाच्या ११ व्या दिवशी राज्यमंत्री यांनी भेट देतांना डोक्यावर …
भाजप सरकारचे अमळनेर पाडळसरे धरणाकडे पूर्णतः दुर्लक्ष.! – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
काँगेसचे सरकार आल्यास रखडलेले धरणाचे सिंचन प्रकल्प पूर्ण करणार! – काँगेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी अमळनेर : पाडळसरे धरणाकडे भाजपा सरकारनं ५ वर्षात पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. येणाऱ्या काळात आघाडीचे सरकार आल्यास जळगांव धुळे असे दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फायदेशीर धरण आघाडी सरकार सत्तेवर आल्यास पूर्ण करणार! असे माजी मुख्यमंत्री अशोक …
राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आज आश्वासन न पाळणाऱ्या जलसंपदामंत्री ची “प्रेतयात्रा”काढणार…
भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आ.सौ.स्मिता वाघ यांची भाजप सरकारमधील पत संपली – सुभाष आण्णा चौधरी उद्या आंदोलन मंडप समोर दु.१२ वाजता जनआंदोलन समिती जेलभरो आंदोलन करणार…. अमळनेर(प्रतिनिधी) जलसंपदा मंत्री जिल्ह्यातील असूनही ना.गिरीश महाजन यांनी जाहीर २३०० कोटी निधी देण्याचे आश्वासन पाळले नाही तर भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आ.सौ.स्मिता …
पाडळसे धरणासाठी आ.शिरीष चौधरी यांचे मुख्यमंत्री यांना साकडे
अमळनेर तालुक्यातील पाडळसे धरणाला अत्यल्प निधी दिल्याबद्दल असमाधान व्यक्त करीत आ.शिरीष चौधरी यांनी काल अमळनेर तालुक्यातील सरपंचानां घेऊन मुख्यमंत्री यांची भेट घेतली.यावेळी धरणास भरघोस निधी मिळावा आणि जनआंदोलनाच्या लोकक्षोभाची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटिल यांच्यासह धुळे येथिल मा.आ.प्रा.शरद पाटील यांनी देखिल आंदोलनाची माहिती देऊन …
पाडळसरे धरण समितीचे २ मार्चला जेल भरो आंदोलन ; तुटपुंजी निधीमुळे संतप्त समिती आंदोलन उग्र करणार….
जनआंदोलन आणि लोक प्रतिनिधींच्या प्रयत्नांना शासनाने हरताळ फासला.! अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथिल पाडळसे धरनास महाराष्ट्र शासनाने जनआंदोलनाचा रेटा असतांनाही बजेट मध्ये तुटपुंजी तरतूद करून महाकाय पाडळसे धरणाच्या लाभार्थी ६ तालुक्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत.म्हणून आता आंदोलन उग्र करू!” असे जन आंदोलन समिती तर्फे पदाधिकारी सुभाष चौधरी, शिवाजीराव पाटिल यांनी तिव्र रोष …
धरणासाठी पेटलेले आंदोलन शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे चिघळण्याची परिस्थिती निर्माण
मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटिल यांनी सध्याच्या सरकारमधील लोकप्रतिनिधीच्या काळात ८६ कोटी रुपये प्राप्त झाले असल्याचे निवेदन जनआंदोलन समिती समोर केले. अमळनेर (प्रतिनिधी ) पाडळसे धरण जनआंदोलनाची दखल घेऊन धरणाचे काम युद्धपातळीवर शासनाने सुरू करावे म्हणून विविध संघटना स्वतंत्रपणे पुढे सरसावल्या असून धरणासाठी पेटलेले आंदोलन शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे चिघळण्याची परिस्थिती निर्माण आहे. …
पाडळसे आंदोलनात धुळे तालुक्यातील जनता घेऊन रस्त्यावर उतरू.! – माजी आमदार प्रा.शरद पाटील
मा.मंत्री.आ.एकनाथराव खडसे यांनी आंदोलनास दुरध्वनीने संबोधित करीत साखळी उपोषणास दिला जाहीर पाठींबा अमळनेर(प्रतिनिधी) “लोकप्रतिनिधींच्या सामूहिक प्रयत्नांनी २० वर्षांपासून प्रलंबीत पाडळसे धरण पूर्ण होऊ शकते!” असे मा.मंत्री. आ.एकनाथराव खडसे यांनी पाडळसे जनआंदोलन संघर्ष समितीच्या आंदोलनास दुरध्वनीने संबोधित करीत साखळी उपोषण आंदोलनास पाठींबा जाहिर केला.आजच्या आंदोलनात धुळे येथी आजी माजी लोकप्रतिनिधीनी प्रत्यक्ष …