पाडळसरे धरणाचे काम युद्ध पातळीवर व्हावे म्हणून दिवसा उपोषण आंदोलन तर रात्री खेडोपाडी जागर

अमळनेर(प्रतिनिधी)पाडळसे धरणाचे काम युद्धपातळीवर सुरू व्हावे या मागणीसाठी सुरू असलेले साखळी उपोषण आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेचे मा.अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी “आंतरराष्ट्रीय पातळीवरील पाण्यासाठी होणारा संघर्ष आता देश,राज्य,जिल्हा व तालुका पातळीपर्यंत येऊन ठेपला आहे.चोपडा तालुक्यातही पाण्याचा प्रश्न गंभिर झाला असून पाण्याचे महत्व लक्षात घेऊन शासनाने तत्परतेने पाडळसे धरणाचे काम सुरू करावे!”असे …

जळगांव जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना काय ‘लाज’ वाटली ‘ड्राय डे’ ठेवायला. .? “राजे” आपला मावळा “नो ड्राय डे” मुळे नाचतांना पाय चुकवत होता

धुळे जिल्ह्यात ड्राय डे मात्र जळगांव जिल्ह्यात का नाही जनतेचा सवाल… अमळनेर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत , एक आदर्श राजा , सुराज्य आणि स्वराज्य निर्माण करणाऱ्या महापुरुषांच्या जयंतीला अमळनेर शहरात बिनधास्त पणे दारू विकली जात होती ही प्रशासनच्या दृष्टीने लज्जस्पद बाब आहे राजांचा आदर्श तरुणांनी घ्यावा म्हणून धडे दिले जातात …

पाडळसरे धरणासाठी जनता त्रस्त ; मात्र लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष…. जलसंपदामंत्री आश्वासन देण्यात मस्त ; येणाऱ्या निवडणुकीत पुढारी व्यस्त.

पाडळसरे धरण जन आंदोलन संघर्ष समितीचे शिवजयंती पासून साखळी उपोषण सुरू होणार अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरण संदर्भात संघर्ष समितीचे शिवजयंती १९ फेब्रुवारी पासून साखळी उपोषण सुरू होणार असल्याची माहिती संघर्ष समितीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. बुधवारी सांयकाळी येथील मामा ट्रान्सपोर्ट येथे संघर्ष समितीच्या वतीने आयोजित करण्यात आली …

अमळनेरात स्वाईन फ्ल्यू चा एक बळी

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील वाडी चौकातील रहिवासी व अमळनेरचे वनरक्षक संतोष शिवाजी बोरसे वय ५२ यांचे खाजगी रुग्णालयात उपचार घेताना २ रोजी मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू स्वाईन फ्ल्यू ने झाल्याची शक्यता डॉ संदीप जोशी यांनी व्यक्त केली आहे. संतोष बोरसे हे न्यूमोनिया झाल्याने नर्मदा फौंडेशन मध्ये दाखल झाले होते त्यांच्या …

शेतकऱ्यांचे कर्जाचे कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून कर्जमाफी देणारे पहिले महान पुरुष म्हणजे संत तुकाराम महाराज

अमळनेर (प्रतिनिधी) दुष्काळातील शेतकऱ्यांचे कर्जाचे कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून कर्जमाफी देणारे पहिले महान पुरुष म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज होते असे प्रतिपादन तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्ताने मराठा मंगल कार्यालय येथे विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने असे विचारप्रबोधनात सांगण्यात आले. संत तुकाराम महाराज जयंती साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते मराठा मंगल कार्यालय …