पाडळसे धरणाच्या बैठकीला आज दांडी मारणाऱ्या पुढाऱ्यांकडे सहा तालुक्यांचे लक्ष….

अमळनेर(प्रतिनिधी ) तालुक्यातील पाडळसे धरण युद्ध पातळीवर पूर्ण व्हावे या मागणीसाठी जनआंदोलन संघर्ष समितीनी आंदोलनाचे विविध मार्ग अवलंबित आंदोलन व्यापक करण्यासाठी आता अमळनेर,धुळे, पारोळा, चोपडा,धरणगाव,शिंदखेडा या ६ तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधिंची महत्वपूर्ण बैठक अमळनेर येथे १० मार्च दुपारी ३ वाजता बोलविली आहे. लोकप्रतिनिधिच्या सामूहिक प्रयत्नांची सोबत घेऊन आंदोलनाची पुढिल दिशा …

झोपेचं सोंग घेणाऱ्या शासनाला जाग यावी म्हणून पाडळसे धरण समितीतर्फे “घंटानाद” आंदोलन

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर पाडळसे धरण जन आंदोलन समितीतर्फे आंदोलनाला पाच दिवस झाले तरी शासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचे पाहून शासनाला जाग यावी म्हणून आज आंदोलनकर्त्यांनी दिवसभर ‘घंटानाद’आंदोलन केले.आंदोलन मंडपास आग लावण्याच्या वृत्ताने संतापलेले युवक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.पाडळसे धरण जनआंदोलन समितीचा संघर्ष दिवसेंदिवस तिव्र होत असून आंदोलनास सर्वच स्तरातून पाठींबा …