जलसत्याग्रहानंतरही शासनाने दखल न घेतल्यास आता जलसमाधी ; दुर्लक्ष करणारे जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री, पालकमंत्री व सरकारचा धिक्कार.!

शांततेच्या मार्गाने सुरू असलेले अहिंसक आंदोलन जनतेच्या हातात जाईल होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहिल असा निर्वाणीचा इशारा समितीने दिला.. अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेरसह ६ तालुक्यांसाठी संजीवनी ठरणारा प्रकल्प ‘पाडळसे धरणाचे काम भरघोस निधीसह युद्धपातळीवर व्हावे ! ‘या मागणीसाठी जन आंदोलन समितीने पाडळसे धरणावर मोर्चा नेत भर उन्हात धरणाच्या छातीभर पाण्यात उतरून दिवसभर …

धरण संघर्ष समितीचे शेकडो कार्यकर्ते “जेलभरो” आंदोलनात सहभागी…

जेलभरो आंदोलन अमळनेर (प्रतिनिधी) ‘पाडळसरे धरण झालेच पाहिजे!’ जय जवान,जय किसान च्या घोषणा देत आंदोलनकर्ते, शेतकरी, महिला,युवक,व राजकिय पदाधिकारी यांनी शेकडोंच्या संख्येने स्वतःला अटक करवून घेतली.पाडळसे धरण जनआंदोलनाच्या १२ व्या दिवशी समितीच्या जेलभरो आंदोलनात शेकडो (२७५) लोकांनी स्वतःची अटक देत आंदोलन उग्र केले. जेलभरो आंदोलनाच्या दिवशी निम्न तापी प्रकल्पाच्या कार्यकारी …

पाडळसरे धरण समितीने केले जेल भरो आंदोलन

अमळनेर येथे ११ दिवसापासून साखळी उपोषण सुरू असतांना आज आंदोलनात जेलभरो करतांना पोलिसांच्या वाहनात उत्स्फूर्तपणे अटक देण्यासाठी मोठी झुंबड उडाली. समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या आधीच घोषणा देणाऱ्या शेकडो शेतकरी, युवक , राजकिय कार्यकर्त्यांनी वाहन भरून गेले.पोलिसांनी १२.१५ पासून आंदोलन कर्त्यांना अटकेचे सत्र सुरू केलं. १ तासाने दुपारी आंदोलन स्थळी सुटका केल्याचे जाहिर …

रा.कॉ.ने जलसंपदामंत्री महाजन यांचा फोटो जाळून केला निषेध; स्थानिक दोन लोकप्रतिनिधींचा धिक्कार…..

‘फसणवीस सरकारचा धिक्कार असो’, गिरीश महाजन यांच्या विरोधातही घोषणाबाजी करुन निषेध केला अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेरात जनआंदोलन आणि लोक प्रतिनिधींच्या प्रयत्नांना शासनाने हरताळ फासला तुटपुंजी निधीमुळे संतप्त विविध संघटना उग्र आंदोलन करीत अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरले आहे. २०१९ च्या अर्थसंकल्पात पाडळसरे धरणासाठी केवळ ३२ कोटी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. …

निम्न तापी पाडळसरे धरणासाठी लवकरच मोठा निधी उपलब्ध करून देणार

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आ शिरीष चौधरींसह शिष्टमंडळास आश्वासन अमळनेर( प्रतिनिधी) निम्न तापी पाडळसे धरणास लवकरच मोठा निधी उपलब्द करून देणार असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळास दिली असल्याची माहिती आ शिरीष चौधरी यांनी दिली.धरणासाठी सुरु असलेल्या साखळी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आमदारांनी नुकतीच मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. …

शेतकऱ्यांना समृद्धी देणारे धरण मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांनी तातडीने पूर्णत्वास न्यावे – सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील

अमळनेर(प्रतिनिधी)”सरकार मध्ये मंत्री असलो तरी एक शेतकरी म्हणून मी पाडळसे धरणाच्या जनआंदोलनात सहभागी आहे.अमळनेर, धरणगाव सह परिसरातील शेतकऱ्यांना समृद्धी देणारे धरण खासबाब म्हणून मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांनी तातडीने पूर्णत्वास न्यावे!” असे सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी पाठींबा दिला. साखळी उपोषण आंदोलनाच्या ११ व्या दिवशी राज्यमंत्री यांनी भेट देतांना डोक्यावर …

भाजप सरकारचे अमळनेर पाडळसरे धरणाकडे पूर्णतः दुर्लक्ष.! – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

काँगेसचे सरकार आल्यास रखडलेले धरणाचे सिंचन प्रकल्प पूर्ण करणार! – काँगेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी अमळनेर : पाडळसरे धरणाकडे भाजपा सरकारनं ५ वर्षात पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. येणाऱ्या काळात आघाडीचे सरकार आल्यास जळगांव धुळे असे दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फायदेशीर धरण आघाडी सरकार सत्तेवर आल्यास पूर्ण करणार! असे माजी मुख्यमंत्री अशोक …

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आज आश्वासन न पाळणाऱ्या जलसंपदामंत्री ची “प्रेतयात्रा”काढणार…

भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आ.सौ.स्मिता वाघ यांची भाजप सरकारमधील पत संपली – सुभाष आण्णा चौधरी उद्या आंदोलन मंडप समोर दु.१२ वाजता जनआंदोलन समिती जेलभरो आंदोलन करणार…. अमळनेर(प्रतिनिधी) जलसंपदा मंत्री जिल्ह्यातील असूनही ना.गिरीश महाजन यांनी जाहीर २३०० कोटी निधी देण्याचे आश्वासन पाळले नाही तर भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आ.सौ.स्मिता …

पाडळसे धरणासाठी आ.शिरीष चौधरी यांचे मुख्यमंत्री यांना साकडे

अमळनेर तालुक्यातील पाडळसे धरणाला अत्यल्प निधी दिल्याबद्दल असमाधान व्यक्त करीत आ.शिरीष चौधरी यांनी काल अमळनेर तालुक्यातील सरपंचानां घेऊन मुख्यमंत्री यांची भेट घेतली.यावेळी धरणास भरघोस निधी मिळावा आणि जनआंदोलनाच्या लोकक्षोभाची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटिल यांच्यासह धुळे येथिल मा.आ.प्रा.शरद पाटील यांनी देखिल आंदोलनाची माहिती देऊन …

पाडळसरे धरण समितीचे २ मार्चला जेल भरो आंदोलन ; तुटपुंजी निधीमुळे संतप्त समिती आंदोलन उग्र करणार….

जनआंदोलन आणि लोक प्रतिनिधींच्या प्रयत्नांना शासनाने हरताळ फासला.! अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथिल पाडळसे धरनास महाराष्ट्र शासनाने जनआंदोलनाचा रेटा असतांनाही बजेट मध्ये तुटपुंजी तरतूद करून महाकाय पाडळसे धरणाच्या लाभार्थी ६ तालुक्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत.म्हणून आता आंदोलन उग्र करू!” असे जन आंदोलन समिती तर्फे पदाधिकारी सुभाष चौधरी, शिवाजीराव पाटिल यांनी तिव्र रोष …