कृषिभूषण दादांच्या जनादेशाने स्मिता वाघांना ‘बळ’ इतर इच्छुकांना काढावा लागेल ‘पळ’…..

अमळनेर (खबरीलाल) अमळनेर मतदार संघातील भाजपकडून उमेदवारी मिळण्यास आमदार स्मिता वाघ यांचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानात सांगितल्यानंतर त्यांनी कृषिभूषण माजी आमदार साहेबराव पाटील यांना अमळनेर मतदार संघातील उमेदवारीचा जनादेश विचारला. आपसूकच साहेबराव दादांचा जनादेश स्मिता वाघांना ‘बळ’ देणारा असल्याने इतर …

अवघ्या १० मिनिटातच मुख्यमंत्र्यांनी घेतला अमळनेरकरांचा जनादेश

अमळनेर (प्रतिनिधी) निम्न तापी प्रकल्पाला १५०० कोटी रुपये मंजूर केले असल्यामुळे या भागात सिंचन वाढून शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी लवकरच निधू मिळवून देऊन धरणाचा प्रश्न आमचेच शासन पूर्ण करणार आहे, त्यामुळे तुमचा जनादेश घ्यायला आलो आहे, तुमचा जनादेश आहे का ? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

अवैध धंद्यांना पोलिसांना जबाबदार धरत आमदार स्मिता वाघ यांनी तोफ डागत आमदार शिरीष चौधरींवर साधला निशाणा….

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरात मोठ्याप्रमाणावर दारूचे गुत्ते, सट्टा, गुटखा विक्री जोरात सुरू आहे. त्यामुळे या अवैध धंद्यांनी अमळनेकरांचे आरोग्य बिघडत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून अमळनेरात नंदुरबार मार्गे अवैध पद्धतीने येणाऱ्या बनावट आणि विषारी दारूचा उद्रेक झाला असून शहरात ठिकठिकाणी दारूचे गुत्ते निर्माण झाले असून याला सर्वस्वी जबाबदार पोलिस असल्याचा …

अमळनेरचे ‘एबीपी’हातावरची घड्याळ काढून लवकरच टाकणार‘बीजेपी’च्या फुलांची माळ..?

अमळनेर (खबरीलाल) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा खान्देशात ८ ऑगस्ट रोजी पर्दापण करणार आहे. या यात्रेच्या पालखीचे भोई होण्यासाठी खान्देशातील अनेक नेते आणि कार्यकर्ते सज्ज झाले आहे. यात अमळनेर मतदार संघातील राष्ट्रवादीचे एक नेतेही आपली ‘घड्याळ’ उतरवून ‘फुल’ हातात घेणार आहेत. मात्र ते मुळातच भाजपावासीय असल्याने ते आपल्या घरवापसीच्या …

दिव्यांग बांधवांना ३ टक्के निधी वाटप करण्यात जिल्ह्यातील अमळनेर नगरपरिषद ठरली पहिली

अमळनेर (प्रतिनिधी)मा.आ.ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू संस्थापक अध्यक्ष प्रणित प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग क्रांती आंदोलनास मोठे यश मिळाले असून आज रोजी अमळनेर नगरपरिषद मार्फत दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यात आली. प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष पंकज पाटील व प्रहार अपंग क्रांती संस्था शहराध्यक्ष योगेश पवार यांनी नोव्हेंबर २०१७ पासून नगरपरिषदेस …

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून भारतभर रस्ते होत असतांना स्थानिक आमदारांचा संबध काय..?

आ.सौ.स्मिता वाघ यांचा सवाल,प्रत्येक ठिकाणी फुकटचे श्रेय घेणारे तुम्हीच… दुष्काळात होरपळनाऱ्या जनतेस वाऱ्यावर सोडल्याचा आरोप अमळनेर(प्रतिनिधी) आधुनिक युगात रस्त्यांचे जनक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते केंद्रीय वाहतूक व रस्ते विकास मंत्री मा नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतभर रस्त्यांची दरजोन्नतीची कामे जोमाने सुरू आहेत तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

ग्रामस्थांच्या उत्साहवाढीला जिल्हाधिकारी सरसावले..! अनोरे येथे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले श्रमदान..

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील आनोरे येथे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील यांच्या उपस्थितीत अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शासकीय कर्मचाऱ्यांनी महाश्रमदान केले. काल सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यां समवेत इतर अधिकाऱ्याचे आगमन झाल्यानंतर गावातील महिलांनी औक्षण करून स्वागत केले नंतर लगेच भूमातेच्या पूजनांनंतर प्रत्यक्ष …

सत्ताधाऱ्यांनो मुस्कटदाबीला भीक घालणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीस यांचे “ट्विट” जनतेची दिशाभूल करणारे…

सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पीपणाचा जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे जाहीर निषेध.पाडळसे धरण पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन तिव्र करत राहू.! अमळनेर (प्रतिनिधी) येथिल पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे धरणाच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या निदर्शनानंतर मुख्यमंत्री यांनी पाडळसरे धरण आम्हीच पूर्ण करू!असे जाहीर आश्वासन भाषणात दिले ,ट्विटरवर काम पूर्ण गतीने सुरू असल्याचे …

पाडळसे धरणाला पैसा न दिल्यास सरकारच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान करू….

धरणास निधी न देणाऱ्या शासनाच्या विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतसारा व लाईटबील भरू नये, महामोर्चा न्यावा आणि लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना जाब विचारावा.!’ पाडळसरे धरणाच्या बैठकीला ह्या लोकप्रतिनिधींची हजेरी…. आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, धुळे येथील माजी आमदार शरद पाटील यांनीच उपस्थित राहून पाडळसरे धरणासाठी आस्था दाखवली. अमळनेर( प्रतिनिधी)पाडळसे …

पाडळसे धरणाच्या बैठकीला आज दांडी मारणाऱ्या पुढाऱ्यांकडे सहा तालुक्यांचे लक्ष….

अमळनेर(प्रतिनिधी ) तालुक्यातील पाडळसे धरण युद्ध पातळीवर पूर्ण व्हावे या मागणीसाठी जनआंदोलन संघर्ष समितीनी आंदोलनाचे विविध मार्ग अवलंबित आंदोलन व्यापक करण्यासाठी आता अमळनेर,धुळे, पारोळा, चोपडा,धरणगाव,शिंदखेडा या ६ तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधिंची महत्वपूर्ण बैठक अमळनेर येथे १० मार्च दुपारी ३ वाजता बोलविली आहे. लोकप्रतिनिधिच्या सामूहिक प्रयत्नांची सोबत घेऊन आंदोलनाची पुढिल दिशा …