अमळनेरात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे स्मारक उभारून त्यांच्या कार्याच्या आठवणी नेहमी तेवत ठेवण्याचा मानस कार्यकर्त्यांचा आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अमळनेरात उदय वाघ यांनी केलेले कार्य कधीही विसरता येणारे नाही. त्यांनी अनेक सर्व सामान्यांना आणि कार्यकर्त्यांना घडवले आहे. उभे केले आहे. भाजपासाठी भरीव असे काम …
अमळनेरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
अमळनेर (प्रतिनिधी) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी तालुक्यात एकूण 1800 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 900 जणांना प्रशिक्षण देण्यात आले प्रथमच व्ही व्ही पॅट यंत्राचा वापर करण्यात येणार असून कर्मचाऱ्यांनी हे यंत्र सूर्यप्रकाशात किंवा विजेच्या दिव्यात ठेवू नये आणि या निवडणुकीपासून 50 मॉक पोल तपासावेच …
चौबारी ग्रामसभेत खडाजंगी; सोयीसुविधांची वानवा,ग्रामप्रशासनास धरले धारेवर…
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील चौबारी येथे मुलभूत सोयीसुविधांची वानवा असल्याकारणाने ग्रामस्थांनी ग्रामसभेत ग्रामप्रशासनास चांगलेच धारेवर धरले. विशेष म्हणजे चौबारीचा विकास खुंटल्याने मुलभूत सुविधांची पुर्तता होण्यासाठी गावाच्या इतिहासात प्रथमच भीमराव कैलास वानखेडे या तरुणाने ग्रामपंचायतीसमोर लाक्षणिक उपोषण केले. नियमित ग्रामपंचायतीचा कर भरुनही सांडपाण्याची योग्य विल्हेवाट का लावली जात नाही असा जाब …