गंभीर गुन्हे करणाऱ्या तरुणाला केले सहा महिने जिल्ह्यातून हद्दपार

अमळनेर (प्रतिनिधी) पिस्टलने गोळीबार करून लूटमार, दरोडा , मोटरसायकल अडवून लूटसह विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शहरातील पैलाड भागातील तरुणाला उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी सहा महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. पैलाड भागातील रहिवाशी सागर संजय पाटील (वय २५) यांच्यावर पिस्टलने गोळीबार करून लूटमार, दरोडा , मोटरसायकल अडवून लूट, …

साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये हिंदी परीक्षेत १५५ विद्यार्थिनी सहभागी

अमळनेर (प्रतिनिधी) साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये पुण येथील महात्मा गांधी राजभाषा हिंदी परीक्षेत १५५ विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व मार्गदर्शक संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते. शाळेच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा घेण्यात आल्या. साने गुरुजी कन्या हायस्कूल गेल्या पंचवीस वर्षापासून परीक्षेची तयारी व मार्गदर्शन करीत आहे. हिंदी विषय शिक्षक दिलीप पाटील …

गलेलठ्ठ फी घेऊनही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकवण्याची पडतेय बोंब

कमी पगारावर शिक्षक नियुक्ती, पालकांची फसवणूक तर मुलांचे भवितव्य अंधारात!   अमळनेर (खबरीलाल स्पेशल) शहरात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा उत आला आहे. दरवर्षी हजारो रुपये फी पालकांकडून वसूल करीत शिकवण्याच्या नावाने मात्र बोंबा बोंब आहे. याकडे शिक्षण विभागाचे सपशेल दुर्लक्ष होत असून यात पालकांची फसवणूक तर मुलांचे भवितव्य अंधारात ढकलले जात …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🔷 चालू घडामोडी :- 15 जुलै 2025   ◆ गुगलने अ‍ॅग्रिकल्चरल मॉनिटरिंग अँड इव्हेंट डिटेक्शन (AMED) API लाँच केले आहे, जे भारतातील शेतकऱ्यांना पीक आणि शेती डेटा प्रदान करते.   ◆ नीती आयोगाने “राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान (S&T) परिषदांना बळकट करण्यासाठी एक रोडमॅप” हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.   ◆ …

सामुहिक विवाह करणाऱ्या हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा केला सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) स्वतंत्र सेनानी अल्लामा फजले हक खैराबादी (रहें) स्टडी सेंटर अ‍ॅण्ड पब्लिक लायब्ररी, तथा सुन्नी दारूल कजा अमळनेर यांच्या वतीने हसनैन करीमैन वेल्फेअर संस्था यांच्या सर्व पद अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी शब्बीर अली सैय्यद होते. नवनियुक्त अध्यक्ष मोना शेख, उपाध्यक्ष सैय्यद नबी,व जुबेर पठाण, सचिव: …

राज्य सरकारच्या निर्णया विरोधात अमळनेर तालुका होमिओपॅथिक असोसिऐशनतर्फे निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) बीएचएमएस डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्यास राज्य सरकारने मज्जाव केल्याने या निर्णयाला विरोध करण्यासाठी अमळनेर तालुका होमिओपॅथिक असोसिऐशनतर्फे प्रांतधिकाऱ्यांना सोमवारी प्रांताधिकारी निवेदन देण्यात आले. प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारला इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे सदर निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे होमिओपॅथिक असोसिऐशनचे म्हणने …

साने गुरुजी विद्यालयातील एनसीसी ए प्रमाणपत्र परीक्षेत यश

अमळनेर (प्रतिनिधी) साने गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एनसीसी ए प्रमाणपत्र परीक्षेत यश मिळवले असून त्यांचे कौतुक केले जात आहे. अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात ४९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमळनेर अंतर्गत एनसीसीचे युनिट चालवले जाते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये साने गुरुजी विद्यालयातील एकूण २६ विद्यार्थी एनसीसी ए प्रमाणपत्र परीक्षेत प्रविष्ट …

अमळनेर तालुक्यात पाच गट जाहीर, 21 जुलैपर्यंत नोंदवता येतील हरकती

अमळनेर (प्रतिनिधी) आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकिसाठी प्रारूप गटरचना दि. 14 रोजी जाहीर झाली आहे. यात अमळनेर तालुक्यात पाच गटांची निर्मिती करण्यात आली आहे. दि. 21 जुलै पर्यंत हरकतीसाठी मुदत देण्यात आली आहे.   सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक घेण्याच्या आदेश दिल्याने प्रक्रियेला वेग आला आहे. त्यानुसार गट रचनेला सुरुवात …

वृत्तपत्रांच्या पार्सलवरून वाद झाल्याने एसटी वाहकाला मारहाण

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ येथील एकाने वृत्तपत्रांच्या पार्सलवरून वाद झाल्याने एसटी वाहकाला मारहाण केल्याची घटना १३ रोजी घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अमळनेर डेपोतील वाहक भगवान साहेबराव पारधी (वय ५४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १३ रोजी सकाळी ते अमळनेर सोनगीर …

पालिकेत धडकत लोकवर्गणीसह शिक्षणकर कमी करण्यासाठी अमळनेरकर आक्रमक

अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या १३ वर्षांपासून सक्तीने वसूल करण्यात येणारी लोकवर्गणी रद्द करा आणि जळगाव महापालिकेच्या तुलनेत १४ टक्के जादाचा नपा शिक्षण कर कमी करा अशी आक्रमक भूमिका अमळनेरकरानी दुसऱ्या दिवशी पालिकेत धडक देत घेतली. त्यावर मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी हे सर्व कर आधी झालेल्या ठरावानुसार असून ते कमी करता येतील …