मुडी येथे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संजय पाटील व व्हा.चेअरम उदय शिंदे यांची निवड..

अमळनेर(प्रतिनिधी):अमळनेर मुडी येथील विविध विकास कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन पदी संजय जिजाबराव सोनवणे यांची तर व्हाईस चेअरमन पदी उदय नथु शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटी चे प्रदीप सूर्यवंशी व व्हाईस चेअरमन योगराज संदानशिव राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. कासोदेेकर यांच्या …

अॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे जिल्हा क्रिडा अधिकाऱ्यांची भेट व वृक्षारोपण…!

अमळनेर(प्रतिनिधी)-अमळनेर येथील अॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी भेट देऊन नव्याने बनविण्यात आलेल्या बास्केटबॉल मैदानाची पहानी केली व शाळेच्या आवारात राबविल्या जाणाऱ्या सुमारे दोनशे वृक्षांच्या लागवड कार्यक्रमाची सुरूवात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन करण्यात आली. यावेळी शाळेच्या माध्यमातुन क्रिडा शिक्षणासाठी दिल्या जाणार्या सुविधांविषयी त्यांनी समाधान …

राष्ट्रवादी काँग्रेस च्या सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्षपदी शंकर बैसाने

राष्ट्रवादीचे संघटना भक्कम होत असल्याचा कार्यकर्त्यांचा दावा…अमळनेर-(प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी शंकर बंडू बैसाणे यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली,राष्ट्रवादीच्या सर्व विभाग व आघाड्यांवर जनसंपर्क असलेले क्रियाशील पदाधिकारी त्यांच्या नियुक्त होत असल्याने राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वात तालुक्यात राष्ट्रवादी मजबूत होत असल्याची भावना यावेळी …

उघड्यावर फेकलेल्या गायीचा पतंजली योगसमितीच्या कार्यकर्त्यानी केला दफनविधी

अमळनेर-शहरापासून अवघ्या २ कि.मी. अंतरावर मारवड रस्त्यावर असलेल्या बर्डे हनुमान मंदिराजवळ कोणी अज्ञात इसमाने मृत झालेल्या गाईस उघड्यावर फेकुन दिलेले असताना पतंजली योग समितीचे योग् प्रचारक कमलेश आर्य व कार्यकर्त्यानी या गायीचा विधिवत दफनविधी करून माणुसकीचे दर्शन घडविले. या स्तुत्य कार्यासाठी त्यांना अमळनेर येथील जाधव इंग्लिश क्लासेस चे संचालक विनोद …

भाजपा सरकारपासून महागाईने सर्वसामान्य जनता होरपळली – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

स्थानिक कार्यकर्त्यांच्या संमतीने या ठिकाणी उमेदवार ठरवला जाईल.अमळनेर (प्रतिनिधी): महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष मा.खासदार व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्वाखाली काल शुक्रवारी दुपारी ३. ३० वा.अमळनेर शहरात पैलाड चोपडा नाका येथे जन-संघर्ष-यात्रेचे आगमन होताच ढोल ताशे फटाक्यांच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.स्थानिक शेतककऱ्यांचे बैलगाडे कार्यकर्त्यांचे मोटर सायकली यात सहभागी झाले …

रक्त देऊन तिचे प्राण वाचले रक्तातील माणुसकीने जातीय सलोखा राखला

अमळनेर– तिचे हिमोग्लोबिन फक्त ३ टक्के अतिशय धोकेदायक स्थिती तिचा बाप रक्तसाठी केविलवाणा चेहरा करून फिरतोय अशातच मुस्लिम युवक आणि एक शिक्षक पत्रकार रक्त दयायला पुढे सरसावले आणि तिचा जीव वाचला .४ रोजी संध्याकाळी स्टॅम्प वेंडर कडे रोजंदारी करणारा लक्ष्मण साळुंखे केविलवाण्या आवाजात विनंती करत अमळनेर युवा मित्र परिवाराचे मनोज …

अमळनेर मतदार संघातील प्रश्नांबाबत आ शिरीष चौधरी नियोजन समितीच्या बैठकीत झाले आक्रमक..

मतदार संघ दुष्काळी जाहीर करण्याची केली मागणी अमळनेर(प्रतिनिधी )जळगाव जिल्हा नियोजन विकास समितीची सभां नुकतीच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव येथे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडली.सदर बैठकीत आमदार शिरीष चौधरी यांनी अमळनेर मतदारसंघातील विविध समस्याबाबत आक्रमकपणे भूमिका मांडत अमळनेर मतदार संघात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. या …

अल्पावधीत झेप घेत खबरीलाल ने गाठली उंची.!

खबरीलाल न्यूज पोर्टल ने महिना भरात अनेक विषयांवर भाष्य करीत, नवनवीन विषय मांडून लोकशाही शाबूत राहावी या साठी प्रयत्न केला,अनेकांना उघडे पाडले,सत्य जनते समोर आणले,खबरीलाल खरा पत्रकार म्हणून जनतेच्या पसंतीस पडला, खबरीलाल ने अनेक दडलेल्या बातम्यांना लोका समोर आणले. चोरून लपून काळे,गोरे कारणामे करणारे चेहरे खबरीलालने जनते समोर आणले,अत्यन्त कमी …

अलफैज उर्दू गर्ल्स माध्यमिक विद्यालयात गांधी जयंती उत्साहात संपन्न..

अमळनेर येथील अलफैज उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये नवीन तालीम दिवस साजरा करण्यात आला २ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त शासनाच्या आदेशानुसार अमळनेर येथील अलफैज उर्दू गर्ल्स हायस्कूल मध्ये नवीन तालीम दिवस साजरा करण्यात आला. यात क्षेत्रभेट, स्वचछता अभियान, वादविवाद स्पर्धा, निबंध लेखन, चित्रकला स्पर्धा, समाजातील व्यापारी व कारागीर यांचे …

गांधी जयंती निमित्त शिवाजी गार्डन मॉर्निंग ग्रुप च्या वतीने शिवाजी उद्यानात स्वच्छता मोहीम..

शिवरायांच्या पुतळ्याजवळ वृक्षारोपन,असंख्य महिला व पुरुषांचा सहभागअमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील न्यू प्लॉट भागातील नगरपरिषद मालकीच्या शिवाजी उद्यानात शिवाजी गार्डन मॉर्निंग ग्रुप च्या वतीने जोमाने स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला,राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियांनंतर्गत हे अभियान राबविण्यात आले,यात ग्रुपच्या असंख्य महिला व पुरुष सदस्यांसह जेष्ठ …