अमळनेर– राज्याची सध्याची शैक्षणिक स्थिती दर्जा सुधारण्यासाठी अध्ययन निष्पत्ती ७५ टक्के झाली पाहिजे त्यासाठी शिक्षकांनी नाविन्याची कास धरावी आणि शाळा विद्यार्थ्यांसाठी तयार करावी असे आवाहन गणित विषयाचे राज्यस्तरीय सुलभक डी ए धनगर यांनी गणित शिक्षकांना उदबोधन प्रसंगी केले. अमळनेर व पारोळा तालुक्यातील ५ वी ते १० वी ला गणित विषय …
लाडशाखीय वाणी समाज राष्ट्रीय महाअधिवेशनानिमित्त अमळनेरात हितगुज मेळावा उत्साहात..
ग्रामिण भागातील समाज सक्षम होण्यासाठी महाअधिवेशन-कैलास वाणीअमळनेर-दि २४ व २५ नोव्हेंम्बर रोजी अखिल भारतीय लाड शाखीय समाजाचे राष्ट्रीय महाधिवेशन पुणे येथे तब्बल २८ वर्षानंतर होणार असून यापार्श्वभूमीवर अमळनेर येथे वाणी समाज मंगल कार्यालयात वाणी समाजाचा हितगुज मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी महा अधिवेशनास अमळनेरातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थिती देतील …
अमळनेर पोलिसांच्या सतर्कतेने दरोडा फसला; दोन ताब्यात तर दोन फरार…
अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर शहरात दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीत असताना पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून दोन जण फरार झाले आहेत. न्यायालयाने तीन अल्पवयीन मुलांना बालसुधार गृहात रवाना केले आहे तर एकाला ११ पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. आमिन एजाज खाटीक वय २० रा. पिंपळे रोड व तीन अल्पवयीन मुले, राकेश वसंत चव्हाण, इम्रान …
राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रियाताई सुळे १० रोजी अमळनेरात
प्रतापमध्ये जागर युवा संवाद अंतर्गत साधणार विद्यार्थ्यांशी परिसंवाद,व्यापारी डॉक्टरांसोबतही साधणार मुक्त संवाद नाट्यगृहात महिला मेळाव्याचे आयोजन..अमळनेर– (प्रतिनिधी)यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आयोजित ‘जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा’ या स्त्रीभ्रूण हत्या, युवतींची छेडछाड, हुंडाविरोधी अभियानांतर्गत राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खा. सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत “जागर युवा संवाद” कार्यक्रमाचे आयोजन प्रताप महाविद्यालय, …
कळंबु येथे आधुनिक ग्रामपंचायत कार्यालयाचे आ.शिरीष चौधरींच्या हस्ते थाटात लोकार्पण..
मुडी-बोदर्डे-कळंबु रस्त्याचे काम मार्गी लावल्याने केले ग्रामस्थानी कौतुक…अमळनेर(प्रतिनिधी)पांझरा काठावर वसलेल्या कळंबु गावात नविन अत्याधुनिक ग्रामपंचायत तयार झाल्याने गावाचा कारभार देखील अत्याधुनिक होईल, अतिशय सुंदर अशी ही इमारत असून याची निगा देखील ग्रामस्थानी घेणे अपेक्षित आहे,अशी भावना आ शिरीष चौधरी यांनी कळंबु येथे ग्रा.प. इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी व्यक्त केली.तसेच गावासाठी सामाजिक …
खाजगी शाळा शिक्षकेत्तर संघटनेची तालुका कार्यकारणी जाहीर…
अमळनेर(प्रतिनिधी) येथिल डी.आर.कन्या शाळेत काल रविवारी जळगांव जिल्हा खाजगी शिक्षकेत्तर संघटना,कर्मचारी संघाची बैठकित अमळनेर तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी संघटीतपणे शासनाच्या खाजगी शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचारी विरोधी धोरणाच्या बाबत लढण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद दिलीप महेश्री उपस्थित होते.खाजगी शाळांच्या शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी, व संघटनेच्या …
आपल्या बापाचा कायदा समजणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रताप; माहितीच्या अधिकारात माहिती मागणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची लेखी धमकी…
अमळनेर(प्रतिनिधी)येथिल पंचायत समिती चे गटविकास अधिकारीने नागरिकांमध्ये प्रशासकीय दहशत निर्माण करीत असून माहितीच्या अधिकारात माहिती मागणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची लेखी धमकी देण्याचा प्रताप केला आहे ! याविरोधात संबंधित जेष्ठ नागरिकांनी अमळनेरच्या नागरी हित दक्षता समिती कडे धाव घेतल्याने समितीतर्फे ना.ग्रामविकास मंत्री यांचे केली असून संबंधित अधिकाऱ्याच्या या कृतीबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे मुख्य …
समाजाच्या प्रगती आणि एकजुटीकरिता महा-अधिवेशनात कोणतेही राजकारण नाही – अध्यक्ष कैलास वाणी
अमळनेर (प्रतिनिधी)-समाजाच्या एकजुटीकरिता आणि भविष्यात येणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे यातून शोधून समाजाची प्रगती होऊन सर्व समाज बांधव मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुणे येथे अखिल भारतीय लादशाखीय वाणी समाजाचे महाधिवेशनाचे आयोजन दि २४/२५ नोव्हेंबर मध्ये होणार असल्याची माहिती या महाधिवेशनाचे अध्यक्ष कैलास वाणी यांनी अमळनेर येथील लाडशाखीय वाणी मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार …
उपसभापती अनिल अंबर पाटील यांच्या बंगल्यात चोरांचा दोन लाखाचा डल्ला…
अमळनेर (प्रतिनिधी)- बाजार समितीचे उपसभापती अनिल अंबर पाटील यांच्या बंद घराचे कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना क्रांतीनगर भागात ३ ते ७ ऑक्टोबर दरम्यान घडली. अमळनेर बाजार समितीचे सभापती अनिल पाटील हे शस्त्रक्रिया झाली असल्याने पुणे येथे रुग्णालयात गेल्या महिनाभरापासून दाखल असल्याने त्यांचे धुळे रोडवरील …
स्वातंत्र्य सैनिकांची तुलना कुत्र्यांशी करणाऱ्या काँग्रेस चे खरगे यांची बुद्धी भ्रष्ट झाली काय..? -जिल्हाध्यक्ष उदय वाघ
स्वातंत्र्य लढा हा एक विचार व चळवळ,त्यात सर्वांचेच योगदान,काँग्रेसला उगाच भांडवल न करण्याचा दिला सल्लाअमळनेर-काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाजपा व संघाचे कुत्रेही मेले नाही असे विचित्र वक्तव्य करून एकप्रकारे थोर स्वातंत्र्य सेनानींचा संबध कुत्र्यांशी जोडून अपमानच केला आहे,यामुळे भाजपातर्फे त्यांचा जाहीर निषेध असून खरगे यांनी आधी इतिहास …