गंढ भेटणं तर गोड लागस, नही भेटणं तर दुःख वाटसं….बॅनर बंदीचा नारा लावणारेच आज नगरपरिषदेच्या सत्तेत आहेत अन जागोजागी भले मोठे डिजिटल बॅनर रोज झळकत आहेत, इतके भव्य दिव्य व नागरिकांचे जीवाशी खेळणारे हे मोठमोठे होर्डिंग बॅनर दादा आपल्या छाताड्यावर उभे आहेत, कुणाचा जीव घेण्याची वाट पहात आहात? नगरपरिषद प्रशासन …
प्रताप महाविद्यालयाचे पराग पाटील बालिश उत्तरे देतात;तर प्राचार्यांनी ठेवले कानावर हात…
चेअरमन,संचालक मंडळ कारवाई का करत नाही..?अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर प्रताप महाविद्यालयात रॅगिंग झाल्याचे घटनेला १५ दिवस उलटून देखील कुठलीही कारवाई, गुन्हा दाखल नाही राज्यभर नामांकित व न्याक प्रमाणीत या महाविद्यालयात मुले, मुली, सुरक्षित आहेत का..? महाविद्यालयाचे रॅगिंग समिती प्रमुख पराग पाटील यांना खबरीलाल ने रॅगिंग बाबत विचारणा केली असता त्यावर ते म्हणाले …
भारतीय जनता पक्षाचे वाद चव्हाट्यावर; जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचा जाहीर निषेध…
दुसऱ्या गटातर्फे ठराव मंजूर..अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर, १० रोजी च्या जळगाव येथील भाजपा विस्तृत बैठकीला भाजपचे माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष श्री.डॉ.बी.एस. पाटील है कार्यकर्त्यांमध्ये कायम निमंत्रित सदस्य म्हणून हजर होते. बैठकीत त्यांना पाहून जिल्हाध्यक्ष उदय वाघांनी सूचना केली कि, ज्यांना आमंत्रणे नाही, त्यांनी येथून निघून जावे. त्यानुसार डॉ.पाटलांनी मला निमंत्रण नाही …
सटोड्यांना सट्टा घेतांना पकडले अप्पर पोलीस अधीक्षक पथकाची कारवाई..
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील दोन जणांना शहरात चोरून लपून सट्टा घेतांना पकडले आणि त्यांच्याकडून ६ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पथकाने केली त्यात नारायण डिगंबर पाटील व प्रल्हाद संतोष पाटील हे चोरून लपून सट्टा घेतांना आढळून आल्याने त्यांना पकडण्यात आले …
सानेगुरुजी वाचनालया तर्फे ए.पी.जे कलाम यांच्या जयंती निमित्त अभिनव “वाचनध्यास” कार्यक्रम आयोजित…
अमळनेर( प्रतिनिधी)अमळनेर येथिल पू.सानेगुरुजी ग्रंथालय व मोफ़त वाचनालायतर्फे भारतरत्न दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त १५ ऑक्टोबर रोजी अभिनव “वाचनध्यास” कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वाचन ध्यास च्या माध्यमातून वाचकांना व श्रोत्यांना सुप्रसिद्ध पुस्तकावर आधारित अभिवाचन करण्याची आणि संबंधित पुस्तकावरील विविध मान्यवर साहित्यिक विचारवंतांची संदर्भपूर्ण चर्चा ऐकण्याची संधी …
झेप फाऊंडेशन च्या माध्यमातून रोजगाराभिमुख कोर्सेसला होतकरू विद्यार्थी व महिलांचा प्रचंड प्रतिसाद..
संस्थेकडूनच मिळतेय रोजगाराची हमी,अनेकांचा रोजगार सुरु,जास्तीत जास्त विद्यार्थी व महिलांनी लाभ घ्यावा-आ शिरीष चौधरी..अमळनेर(प्रतिनिधी) झेप फाऊंडेशन अंतर्गत JSWE च्या माध्यमातून शहरी भागातील सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत येणारे होतकरु विद्यार्थी व महिला वर्गास भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत विविध रोजगाराभिमुख कोर्सेस चे प्रशिक्षण दिले जात आहे,विशेष म्हणजे या कोर्स नंतर संबधित संस्थाच …
बँकेतून पैसे लांबवणारा दुबे भामट्याच्या मध्यप्रदेश पोलिसांनी अमळनेरात आवळल्या मुसक्या…
बिहारी दुबे ने सुज्ञ लोकांना डुबवले…अमळनेर (प्रतिनिधी) देशातील आंतरराज्यात ठिकठिकाणी सराईतपणे सलगी वाढवून त्याच्याच बँक अकाऊंट मधील पैसे लांबवत गंडा घालणारा हा भामटा अमळनेर शहरात गेल्या चार वर्षांपासून वास्तव्यास होता यामुळे खळबळ उडाली आहे. अमळनेर येथील शिरुड नाका परिसरातील शिव कॉलनीत हा सुनील दुबे नामक वय ३० उत्तर प्रदेशातील मिर्झापुर येथील …
अमळनेरात रविवारी भव्य ग्रंथ वितरण सोहळ्याचे आयोजन.
आ.सौ स्मिता वाघ यांच्या निधीतून शासनमान्य ग्रंथालयांना मिळणार विपुल ग्रंथसंपदा,ग्रंथालय वैभव संपन्न करण्याचा प्रयत्न…अमळनेर-शहरात भव्य ग्रंथ वितरण सोहळ्याचे आयोजन उद्या रविवार दि १४ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे करण्यात आले असून या सोहळ्यात आमदार सौ. स्मिताताई उदय वाघ यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत अमळनेर मतदार संघ व अमळनेर …
म्हसले ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा,सरपंचपदी रविंद्र पाटील विराजमान…
अमळनेर(प्रतिनिधी)-अमळनेर तालुक्यातील म्हसले ग्रामपंचायती वर भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व सिद्ध करीत सरपंचपदी भाजपाचेच रविंद्र अर्जुन पाटील यांची निवड झाली आहे.सदर निवडीबद्दल आ सौ स्मिता वाघ व भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या हस्ते नूतन सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे तालुका सरचिटणीस हिरालाल पाटील तसेच ग्रा प सदस्य भरत पाटील,वना …
अमळनेर आगाराचे चुकीच्या नियोजनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान.!
सुरक्षा रक्षकाचे विद्यार्थ्यांशी गैरवर्तन…अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर एस.टी.आगारात नादुरुस्त एस.टी.बसेस व चुकीच्या नियोजनामुळे विद्यार्थायचे शैक्षणिक नुकसान होत असून ११ रोजी कावपिंप्री येथील विद्यार्थ्यांचे १२ वि चे पेपर बुडाले व सुरक्षा रक्षकाने विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याने अ.भा.वि.प. संघटनेने आगार प्रमुखांना निवेदन देऊन एस.टी. बसेस ची सुविधा न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. अंचाळे मुक्कामी …