अमळनेर इतिहास

खान्देशचे ” प्रतिपंढरपुर “

अमळनेर शहर पश्चिम रेल्वेच्या भुसावळ-सुरत मार्गावर आहे. ते जळगावपासून पश्चिमेकडे ५६ किलोमीटर व धुळ्यापासून पुर्वेकडे ३५ किलोमीटर अंतरावर आहे. भौगोलिक दृष्ट्या अमळनेर हे २१.३ उत्तर अक्षांशावर व ७५.१ पुर्व रेखांशावर आहे. हे तापी नदीच्या खो-यात बोरी नदीच्या डाव्या काठावर वसले आहे. नदीमुळे शहराचे दोन भाग झाले असुन उजव्या तीरावरील वस्तीस पैलाड म्हणतात. समुद्र सपाटीपासुन गावाची उंची सुमारे ६०८ फूट ( सुमारे १८५ मीटर ) आहे. शहराचा उतार सामान्यतः दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे. टाऊन प्लॅनिंगमुळे हल्ली शहरांची पस्चिमेकडे वाढ होत आहे. या शहराचे उन्हाळ्यात कमाल उष्णतामान ११२ ( घरात ) व ११६ – ११८ ( बाहेर ) आहे. पावसाचे मान सरासरी २७ इंच आहे. सन १८७१ च्या जनगणनेप्रमाणे अमळनेरची लोकसंख्या ७५६४ होती. तसेच त्यावेळी अमळनेर नगर पालिकेचे उत्पन्न २२५० रुपये होते. सुमारे दीडशे-पावणेदोनशे वर्षापुर्वी अमळनेर योथे श्री सखाराम महाराज या नावाने एक प्रसिध्द साधू होऊन गेले. त्यांच्या स्मरणार्थ बोरी नदीच्या पात्रात त्यांची समाधी बांधली आहे. वैशाख महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. श्री संत सखाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे व त्यांच्यानंतर चालत आलेल्या परंपरेमुळे अमळनेरला एक क्षेत्र म्हणून त्यावेळी मिळालेली प्रसिध्दी आज कायम असुन ते खानदेशचे पंढरपुर समजले जाते.

सुमारे दीडशे-पावणेदोनशे ( अंदाजे ) वर्षापुर्वी अमळनेर येथे श्री सखाराम महाराज या नावाने एक प्रसिध्द साधू होऊन गेले. त्यांच्या स्मरणार्थ बोरी नदीच्या पात्रात त्यांची समाधी बांधली आहे. वैशाख महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. श्री संत सखाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे व त्यांच्यानंतर चालत आलेल्या परंपरेमुळे अमळनेरला एक क्षेत्र म्हणून त्यावेळी मिळालेली प्रसिध्दी आज कायम असुन ते खानदेशचे पंढरपुर समजले जाते. खानदेशातील एक महत्वाचे गाव म्हणजे अमळनेर. या शब्दाची उत्पत्ती अमळनेर म्हणजे मलविरहीत ग्राम म्हणजे अमळनेर,अशी दिसते. अमळनेर हे जळगाव जिल्ह्यातील एक सुप्रसिध्द शहर आहे. सन १९०६ पुर्वी हल्लीचे जळगाव व धुळे ( पुर्वीचे पुर्व खानदेश व पश्चिम खानदेश ) या दोन जिल्ह्याचे मिळून एकच मोठा जिल्हा होता व त्यास खानदेश जिल्हा असे नाव होते. त्यावेळच्या खानदेशातील अमळनेर हे मध्यवर्ती ठिकाण म्हणता येईल.