अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अमळगाव येथे श्री गजानन महाराजांच्या कृपाशीर्वादाने दि. 16 जुलै रोजी श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोदुगत पारायण विद्याताई पडवळ यांच्या सुस्वर आवाजात होणार आहे. लता रमण हॉल, जळोद रोड येथे सकाळी ७.३० ते दपारी ३.३० या वेळेत हा सोहळा होणार आहे. या भक्तिभावपूर्ण कार्यक्रमात गजानन महाराजांचे दर्शन, प्रवचन, …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
आजचे चालु घडामोडी प्रश्न 🔴प्रश्न 1: केंद्र सरकारने नुकतीच कोणती नवी डिजिटल हेल्थ योजना सुरू केली? 👉 आयुष्मान भारत डिजिटल मिशन 2.0 🔴 प्रश्न 2: १५ जुलै २०२५ रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो? 👉 जागतिक कौशल्य विकास दिवस (World Youth Skills Day) 🔴 प्रश्न 3: भारताचा …
बोहरा गावाचे शंभर टक्के पुनर्वसनच्या मागणीसाठी आज ग्रामस्थांचा मोर्चा
अमळनेर (प्रतिनिधी) निम्न तापी प्रकल्पामुळे बाधीत झालेले बोहरा गावाचे शंभर टक्के पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी आज दि. १६ जुलै रोजी ग्रामस्थ प्रांत कार्यालय आणि आमदारांच्या घरावर मोर्चा काढणार आहेत. तरीही योग्य कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी ग्रामस्थ तापी, बोरी,अनेर नद्यांच्या संगमावर जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. बोरी आणि …
पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या स्नेहल पाटीलची गावातून काढली मिरवणूक
अमळनेर (प्रतिनिधी) पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्यानंतर स्नेहल जगदीश पाटील यांचे गावात प्रथमच आगमन होताच टाकरखेडे गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावातर्फे जिल्हा परिषद मराठी शाळेत त्यांचा सत्कार करण्यात आला. स्नेहलच्या कुटुंबात देश सेवेचा वारसा आहे. तिचे वडील जगदीश प्रभाकर पाटील हे महाराष्ट्र पोलिस विभागात सहाय्यक …
नांद्री येथील विद्यार्थ्यांना उकिरड्यातून वाट काढत जावे लागतेय शाळेमध्ये
ग्रामस्थाने केली गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील नांद्री येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना उकीरड्यातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामपंचायतींचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार महेश लक्ष्मण नागेश यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले …
जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा संघ उपविजेता
अमळनेर (प्रतिनिधी) पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या ६४वी जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात अमळनेर येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा संघ उपविजेता ठरला. ही स्पर्धा गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे पार पडली. यात …
बांधकाम मजुरांना भांडे घेण्यासाठी बोलावून कोणीही उपस्थित नसल्याने उडाला बोजवारा
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील बांधकाम मजुरांना घरगुती भांडे घेण्यासाठी १५ रोजी मंगरूळ येथील कोल्डस्टोरेज येथे बोलावले होते. परंतु तेथे सकाली ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणीही आले नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा मजुरांची फसवणूक झाली. तर या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नसल्याने भांडे घेण्यासाठी आलेल्यांना पावसाचा, चिखलाचा समाना करावा लागला. त्यामुळे यंत्रणेविषयी प्रचंड …
पोलिसांनी पाचोऱ्याच्या दोघांना पकडून जप्त केला १५ किलो गांजा
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जळोद गावाजवळ पोलिसांनी छापा टाकून पाचोरा येथील दोघांना १५ किलो गांजा पकडला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, एपीअय रवींद्र पिंगळे, सुनील लो.नागरे, अमोल पाटील, गणेश पाटील, जितेंद्र निकंभे, प्रशांत पाटील, सुनील पाटील यांनी ही कारवाई केल्येथील आरोपी महेश …
नोटीस बजावूनही कागदपत्रे सादर न केल्याने साखळी आंदोलनाचा इशार
अमळनेर (प्रतिनिधी) नोटीस बजावून ही नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे परेश उदेवाल याने निवेदन देत साखळी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. नोटीस बजावून ही अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे नमूद केले आहे. पुढील दहा दिवसांत कोणतीही …
गंभीर गुन्हे करणाऱ्या तरुणाला केले सहा महिने जिल्ह्यातून हद्दपार
अमळनेर (प्रतिनिधी) पिस्टलने गोळीबार करून लूटमार, दरोडा , मोटरसायकल अडवून लूटसह विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शहरातील पैलाड भागातील तरुणाला उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी सहा महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. पैलाड भागातील रहिवाशी सागर संजय पाटील (वय २५) यांच्यावर पिस्टलने गोळीबार करून लूटमार, दरोडा , मोटरसायकल अडवून लूट, …