अमळनेर (प्रतिनिधी) आषाढी एकादशीनिमित्त मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सकाळी साडे सात वाजता श्री मंगळग्रह मंदिरातून दिंडी काढण्यात आली. यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी वरुणराजाने ही हजेरी लावली. मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे काढलेल्या दिंडीत सजविलेल्या पालखीत श्री विठ्ठल-रुख्मिणी मातेची मूर्ती होती. मंदिरात उपस्थित भाविकांनी सपत्नीक पालखीतील मूर्तींचे मंत्रोपचारात पूजन केले. …
चिमनपुरी पिंपळे खुर्द येथे राबवला बालिका स्नेही पंचायत उपक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे खुर्द येथील किशोरवयीन १४ ते १८ वर्षे वयोगटातील बालिकांच्या स्नेही पंचायत उपक्रम राबवण्यात आला. यात सरपंच गायत्री विनोद पाटील यांचे नेतृत्वाखालील उपसरपंच व ११ ग्रा.पं. सदसस्यांनी ग्राम पंचायतीचा कारभार चालवला. याचे सर्व गावकऱ्यांनी कौतुक केले आहे. जिप मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी गटविकास अधिकारी …
आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज बाजार समितीत विविध कार्यक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकरी व सभासदांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन 7 जुलै रोजी करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे हा कार्यक्रम दुपारी ४ वाजता होणार आहे. आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बैल जोडी असणाऱ्या तालुक्यातील शेतकरी …
आषाढी एकादशीनिमित्त श्री मंगळग्रह देवतेला दिले विठुरायाचे रुप, दर्शनासाठी भाविकांनी केली गर्दी
अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री मंगळग्रह मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची मांदियाळी होती. मंदिरात आकर्षक सजावट करुन श्री मंगळग्रह देवतेला विठुरायाचे रुप दिले होते. आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरला जातात. मात्र काही भाविक विविध अडचणींमुळे विठुरायाच्या भेटीला जाऊ शकत नाही. त्यांचा भक्तिभाव जाणून येथील श्री मंगळग्रह मंदिरात आकर्षक …
चिमणपुरी पिंपळे परिसरात रिक्षाची बॅटरी, बोअरवेलची वायर व विहिरीवरील मोटर लांबवली
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे परिसरात भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांनी परिसरात अनेक छोट्या मोठ्या वस्तू चोरीचा सपाटा लावला आहे. त्यामुळे या भुरट्या चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र मन्साराम पाटील यांच्या पिंपळे खु. शिवारातील शेतातील विहिरीवर लावलेली ४५०० हजार रुपये …
दुचाकीवरून 43 हजारांचा अवैध देशी, विदेशी कंपनीचा दारुसाठा घेऊन जाणाऱ्या तरुणला अटक
अमळनेर (प्रतिनिधी) दुचाकीवरून अवैध देशी, विदेशी कंपनीचा दारुसाठा घेऊन जाणाऱ्या जानवे येथील एकाला अटक केली असून 43255 किंमतीची दारुसाठा जप्त केला आहे. ही कारवाई काल साडेचार वाजेच्या सुमारास करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांना एका दुकानातून देशी, विदेशी कंपनीचा दारुसाठा एकजन दुचाकीने घेऊन …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
: 🔷 चालू घडामोडी :- 06 जुलै 2025 ◆ दूरसंचार विभागाचे डिजिटल इंटेलिजेंस युनिट (DOT-DIU) संस्थेने आर्थिक फसवणूक जोखीम निर्देशक (FRI) सुरू केला आहे. ◆ C-FLOOD प्लॅटफॉर्म सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (C-DAC) पुणे आणि सेंट्रल वॉटर कमिशन (CWC) या दोन संस्थांनी संयुक्तपणे विकसित केला आहे. …
सायरदेवी बोहरा स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त रंगला दिंडी सोहळा
अमळनेर (प्रतिनिधी) सायरदेवी बोहरा स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन सुरेंद्रकुमार बोहरा यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा केल्या होत्या. शाळेच्या पटांगणात दिंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन रिंगण सोहळा व फुगड्या खेळण्यात आल्या. पालखी मिरवणूक काढण्यात आली. मुख्याध्यापक जितेंद्र सिंह यांनी विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन करून …
अभियांत्याने २० जनमित्रांना स्वखर्चातून वाटली सुरक्षा साधने
अमळनेर (प्रतिनिधी) शहर कक्ष १ चे सहाय्यक अभियंता हेमंत सैंदाणे यांनी कक्षातील २० जनमित्रांना स्वखर्चातून सुरक्षा साधने विकत घेऊन वितरित केले. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. सैंदाणे यांची कर्मचाऱ्याप्रती असलेली आत्मियता व सुरक्षा विषयी जागरुकतेमुळे सुरक्षा साधनांची वाटप करून “शून्य अपघात महावितरण” संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणली. त्याबद्दल त्यांचे कक्ष …
सावित्रीबाई फुले, राजीव गांधी विद्यामंदिरात विठ्ठल रखुमाईचा गजर
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व राजीव गांधी प्राथमिक विद्यामंदिर यांच्यातर्फे आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी काढण्यात आली. पालखी सजवून विठ्ठल रुक्माई यांची प्रतिमा पालखीत ठेवून टाळ मृदंगांच्या गजरात विठ्ठल रुक्माई यांच्या गाण्याच्या तालासुरात सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका,कर्मचारी यांनी ठेका घेतला होता. यामुळे …