स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  *🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*   *19 जून 2025*   🔖 *प्रश्न.1) ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?*   *उत्तर -* शिवेंद्रराजे भोसले   🔖 *प्रश्न.2) ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे …

महसूलच्या आशीर्वादाने अमळनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीला आला उत

तहसीलदारांच्या “मी नाही त्यातली कडी लावा आतली” च्या भूमिकेने संताप !   अमळनेर (प्रतिनिधी) सध्या संपूर्ण तालुक्यात वाळू माफियांकडून राजरोसपणे अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. याला प्रशासनातील काही झारीतील शुक्राचाऱ्यांचा पाठिंबा असल्याने वाळू माफियांनी अवैध वाळू रगडून बक्कळ पैसा काढणे सुरू केले. तर तहसीलदारांची भूमिका “मी नाही त्यातली कडी लावा …

अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या मध्य महाराष्ट्र प्रांत कार्यकारणीत खान्देशला प्रथम स्थान

सचिवपदी डॉ. अनिल देशमुख यांची तर कार्यकारिणीत अमळनेरच्या ॲड. भारती अग्रवाल यांचाही समावेश   अमळनेर (प्रतिनिधी) अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांतची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. खान्देशला प्रथमच मिळाली संधी मिळाली असून सचिवपदी डॉ. अनिल देशमुख यांची तर कार्यकारिणीत अमळनेरच्या ॲड. भारती अग्रवाल यांचा ही समावेश आहे. मध्य महाराष्ट्र …

उत्कर्ष एक सामाजिक फाऊंडेशनने शालेय साहित्याचे केले वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) उत्कर्ष एक सामाजिक फाऊंडेशन बदलापूरतर्फे गांधलीपुरा येथील श्री.आबासो अनिल अंबर पाटील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. उत्कर्ष एक सामाजिक फाउंडेशन ही लोकसहभागातून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप, दिवाळी निमित्त विद्यार्थ्यांना नवीन कपडे, बूट, मिठाईचे वाटप करून …

एचआयव्हीसह जगणाऱ्या ३० अनाथ मुलांना सकस आहाराचे वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर रोटरी क्लब आणि आधार बहुउद्देशीय संस्था, अंकुर सेवा सेतू प्रकल्पांतर्गत एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ मुलांसाठी सकस आहार व प्रोटीन किट वाटप करण्यात आले. त्यामुळे त्यांना मोठा आधार मिळाला. या कार्यक्रमात ३० अति गरजू एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ व एकलपालक बालकांना दर महिन्याप्रमाणे किराणा किट व प्रोटीन किट कै. वसंत …

पैलाड भागातील एकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पैलाड भागातील एकाने स्वतःच्या राहत्या घरात छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लालचंद नारायण येशी (वय ५५) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा पुतण्या कल्पेश राजेंद्र येशी याने …

गांधली येथे विविध कामांचे उद्घाटन, खासदार स्मिता वाघ यांचा केला सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत पाडळसरे धरणाचा समावेश करून यावर्षी तब्बल ८५९ कोटी रुपयांचा निधी मिळवून दिल्याबद्दल गांधली  येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात संसदरत्न खासदार स्मिताताई वाघ यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. गांधली येथे महिला ग्राम संघ कार्यालयाचे उद्घाटन तसेच अभ्यासिकेच्या सुसज्जिकरणाचा शुभारंभ खासदार वाघ …