अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणे बु. येथे वीज पडून गोठ्यात बांधलेली म्हैस ठार झाल्याची घटना १२ रोजी रात्री ९:३० वाजता घडली आहे. भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील हिंगोणे बु. येथील शेतकरी प्रवीण मखमल पाटील यांची ७५ हजार रुपयांची गाभण असलेली म्हैस गोठ्यात बांधलेली होती. …