स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  🔷 चालू घडामोडी :- 10 जून 2025   ◆ 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा(MH) मध्ये होणार आहे.   ◆ स्पेनच्या कार्लोस अल्काराझने इटलीच्या यानिक सिनरवर मात करून, फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.   ◆ पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या …

अमळनेरात प्रति व्यक्ती एकही झाड नसल्याने उन्हाळा होतोय असाह्य!

पालिकेने पावसाळा सुरू झाल्याने तातडीने वृक्षरोपण  मोहीम हाती घेण्याची मागणी   अमळनेर (प्रतिनिधी) शहरात वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे उन्हाळा असाह्य होत आहे. शहराच्या लोकसंख्येनुसार प्रती व्यक्ती २८ एवढी वृक्षांची संख्या असणे आवश्यक असताना एक झाडही येत नाही. त्यामुळे पालिकेने पावसाळा सुरू झाल्याने तातडीने वृक्षरोपण  मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात …

कृषी विभागाने नगाव शेतकऱ्यांना योजना, खरीप हंगामासंदर्भात मार्गदर्शन

अमळनेर (प्रतिनिधी) खरीप हंगमाला सुरुवात झाल्याने कृषी विभागार्तफे तालुक्यातील नगाव बु. गावात शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शक सभा झाली. या वेळी गावातील शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना आणि खरीप हंगामासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. उपविभागीय कृषी अधिकारी सी. डी. साठे व तालुका कृषी अधिकारी …

अभियंता डिगंबर वाघ व स्वछता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे यांचा बदलीनिमित्त सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) येथील नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता डिगंबर वाघ यांची चोपडा तर आरोग्य विभागाचे स्वछता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे यांची धरणगाव नगरपलिकेत बदली झाल्याने पालिकेतर्फे त्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी तुषार नेरकर होते. यावेळी काँट्रॅक्टर महावीर पहाडे, माजी नगरसेवक घनश्याम पाटील, अनंत निकम, माजी नगरसेवक मनोज पाटील, पत्रकार संजय पाटील …

समाजातील अनुचित प्रकाराविरोधात आज मंगळ ग्रह मंदिरात देणार शपथ

अमळनेर (प्रतिनिधी) मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या माध्यमातून दि. १० जून मंगळवार रोजी विवाह सोहळा व कौटुंबिक जीवनातील अनुचित गैरप्रकार थांबवण्यासाठीची सामूहिक शपथ दिली जाणार आहे. श्री मंगळ ग्रह मंदिर येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर मंदिरात अभिषेकासाठी येणाऱ्या सर्वच भाविकांना  कायमस्वरूपी ही शपथ देण्याचा उपक्रम मंगळ ग्रह …

वावडे येथे मोटरचा फ्यूज काढल्यावरून वाद झाल्याने पुतण्याचा मोडला हात

अमळनेर (प्रतिनिधी) मोटरचा फ्यूज काढल्यावरून काका पुतण्यात झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने पुतण्याला सहा जणांनी मारहाण केल्याने हात मोडल्याची घटना ७ रोजी तालुक्यातील वावडे येथे घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    पोलिसांनी याबाबत दिलेली अधिक माहिती अशी की, वावडे येथील नरेंद्र भीमराव वानखेडे (वय ३०) हा ७ जून …

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाला मुलीसह सुरत जवळून घेतले ताब्यात

अमळनेर (प्रतिनिधी) आश्रम शाळेतील सातव्या वर्गातील अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तेवीस वर्षीय तरुणाला मुलीसह सुरत जवळील कामरेज येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर पॉक्सो व एट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील १४ वर्षे पाच महिने वयाची मुलगी आश्रम शाळेत सातव्या वर्गात …

खोटा सातबारा वापरून शेतजमीन खरेदीच्या तक्रारीकडे तीन वर्षांपासून दुर्लक्ष

अमळनेर (प्रतिनिधी) खोटा सातबारा वापरून शेतजमीन खरेदीची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीकडे तीन वर्षांपासून दुर्लक्ष केले जात आहे. याप्रकरणी मिलिंद भिकन पाटील यांनी उपविभागीय अधिकाऱ्याकडे तातडीचा तक्रार अर्ज केला आहे. अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी मिलिंद भिकन पाटील यांनी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, अमळनेर यांच्याकडे एक तातडीची तक्रार सादर …