: 🔷 चालू घडामोडी :- 08 जून 2025 ◆ 2025 UEFA चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) ने पटकावले आहे. [त्यांनी अंतिम फेरीत इंटर मिलानचा पराभव केला.] ◆ 26व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत चीन देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत. ◆ राजीव कृष्णा यांची उत्तर प्रदेश राज्याच्या पोलिस …
अमळनेर शिवसेनातर्फे आयोजित शिबिरात १५० जणांची मोफत नेत्र तपासणी
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शिवसेनातर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिसवानिमित्त ५ रोजी नेत्र तपासणी शिबिर झाले. या शिबिरात तालुक्यातील सुमारे १५० जणांनी लाभ घेतला. शिबिराचे उदघाट्न जिल्हाध्यक्ष वासुदेव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अमळनेर तालुक्यातील नेत्ररोगाने त्रस्त नागरिकांची निकड लक्षात घेता शिवसेना तालुका प्रमुख सुरेश पाटील व शहर प्रमुख संजय पाटील …
रवि ज्वेलर्सच्या विशेष ड्रॉ तील ठरले 101 भाग्यवान विजेते
सचिन देवीदास पाटील ठरले पहिले इलेट्रिक बाईक विजयाचे मानकरी अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील, सराफ बाजारातील रवि ज्वेलर्स या सुवर्ण दालनाने शुभारंभा निमित्त आयोजित केलेल्या विशेष ऑफरचा ड्रॉ शुक्रवार 6 जून रोजी काढण्यात आला. यात पहिल्या बक्षिसचे विजेते शहरातील सुंदर नगर भागातील रहिवाशी सचिन देवीदास पाटील ठरले. ते इलेट्रिक बाईक विजयाचे …
अमळनेरात सामुहीक नमाज पठण, देशात अमन व शांतीसाठी प्रार्थना
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील मुस्लीम बांधवांनी बकरी ईद अर्थात ‘ईद-उल-अज्हा’ शनिवारी साजरी केली. यानिमित्ताने ईदगाह मैदानावर सकाळी शहर-ए-खतीब नवशाद आलम यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक नमाजपठण केले. देशात अमन व शांती नांदावी या साठी दुआ करण्यात आली. त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. बकरी ईद हा मुस्लीम समाजासाठी त्याग …
अमळनेर आगारात दाखल पाच नव्या बसेसचे थाटात लोकार्पण
अमळनेर (प्रतिनिधी) येथील रा.प.म.एस टी आगाराला नवीन पाच बसेस उपलब्ध झाल्याने शनिवारी ७ जून रोजी सकाळी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते थाटात व वाजतगाजत लोकार्पण करण्यात आले. या वेळी मान्यवर आणि प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील, विनोद पाटील, आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी, आगार प्रमुख …
श्रमसाफल्य एजुकेशन सोसायटीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्याख्यान
अमळनेर (प्रतिनिधी) श्रमसाफल्य एजुकेशन सोसायटी संचालित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रमसाफल्य एजुकेशन सोसायटीचे चेअरमन अभिजित सुभाष भांडारकर होते. पं. ज. ने समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. श्वेता विनोद वैद्य हे वक्ते होते. सुरुवात दिप प्रज्वलनाने व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रतिमास पुष्पहार अर्पण …
जलजागर जलसंधारण स्पर्धेत अमळनेर तालुक्याने मिळवले पहिले तिन्ही बक्षीसे
अमळनेर (प्रतिनिधी) शासनाच्या जलजागर जलसंधारण स्पर्धेत संस्था गटात तालुक्यातील पिंपळे येथील धरती माता बचत गटाचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आला आहे. तर वैयक्तिक गटात जिल्ह्यात पहिले तिन्ही बक्षिसे अमळनेर तालुक्याने मिळवली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला आहे. यामुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे. शासनाने ग्रामीण भागात सिंचनक्षमता वाढवण्यासाठी पाझर …
बाजार समितीतर्फे आश्विनी भदाणे हिचा सत्कार
अमळनेर (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल अशोक भीमराव भदाणे यांची मुलगी अश्विनी अशोक भदाणे हिने एमएसस्सी आय आय टी दिल्लीच्याच्या प्रवेश परीक्षेत ऑल इंडिया १३० रँक प्राप्त केली आहे. त्यानिमित्ताने बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, उपसभापती सुरेश पिरण पाटील व संचालक सुभाष सुकलाल पाटील यांच्या हस्ते अश्विनीसह तिचे …
अमळनेर येथील श्री गोविंद महाराज भक्तनिवासाच्या ऑनलाईन बुकिंगचा शुभारंभ
अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री गोविंद महाराज भक्तनिवासाच्या ऑनलाईन बुकिंगचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची मोठी सोय झाली आहे. संत परंपरेच्या पवित्र पुण्यस्मरणात आणि भाविकांच्या सेवाभावातून साकार झालेल्या श्री गोविंद महाराज भक्तनिवास या नव्याने उभारलेल्या भक्तनिवास प्रकल्पाने एका नवे अध्यायाची सुरुवात केली आहे. अध्यात्म आणि आधुनिकतेचा संगम साधत, या …
कृषिभूषण साहेबराव दादांनी शेतात चक्क “सिंदूर”चा केला यशस्वी प्रयोग !
अमळनेर (प्रतिनिधी) मोदींच्या नेतृत्वात पाकिस्तानाला धडा शिकवण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ सर्वांनी अनुभवले. तर माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी आपल्या शेतात “सिंदूर” रोपांची यशस्वी लागवड करून 15 महिन्यातच यशस्वी “सिंदूर”चे उत्पादन घेतले. हा “सिंदूर” धार्मिक विधीसाठीही उपयुक्त असून बाजारातील रासायनिक कुंकूपेक्षा तो अधिक सुरक्षित आणि शुद्ध असल्याने हा नवा प्रयोग जिल्ह्यात …