अमळनेर (प्रतिनिधी) काश्मीर येथे अतिरेक्यांनी निरपराध लोकांना गोळ्या घातल्या. या सैतानांचा सकल हिंदू समाजातर्फे तीव्र धिक्कार करत प्रांताधिकारी कार्यालयासमोर निषेधार्थ धरणे आंदोलनाचे 28 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता हे आंदोलन होईल. या आतंकवादाच्या निषेधार्थ लढ्यात सहभागी होवून सर्वानी आपले योगदान द्यावे, असे आवाहन सकल हिंदू समाज, …
ढेकू रोडवरील क्रांती पर्व स्मारकाचा आज होणार लोकार्पण सोहळा
अमळनेर (प्रतिनिधी) येथील ढेकू रोडवरील क्रांती पर्व स्मारकाचा 25 रोजी सकाळी 10 वाजता आमदार अनिल पाटलांच्या हस्ते लोकार्पण सोहळा आयोजित कारण्यात आला आहे. अमळनेर येथील नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र. 7 मधील जय हिंद कॉलनी येथील खुल्या भूखंडाचा सर्वांगीण विकास अंतर्गत 77 लक्ष निधीतून निर्माण झालेल्या विकास कामाचे लोकार्पण होणार आहे. …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
First Indian Women Personalities 🔷 भारत की पहली महिला व्यक्तित्व 🔷 ════════════════════ ▶ ओलंपिक पदक जीतने वाली ➭ कर्णम मल्लेश्वरी ▶ एयरलाइन पायलट ➭ दुर्बा बॅनर्जी ▶ अंतरिक्ष में जाने वाली ➭ कल्पना चावला ▶ माउंट एवरेस्ट पर चढ़ने वाली ➭ बचंदरी पाल …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
🔷 चालू घडामोडी :- 24 एप्रिल 2025 ◆ स्मृती मानधना विस्डेन क्रिकेट पुरस्कार दोनदा जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. ◆ निकोलस पूरन 2025 चा टी 20 क्रिकेट मधील अव्वल खेळाडू ठरला असून तो वेस्ट इंडिज देशाचा खेळाडू आहे. ◆ जसप्रीत बुमराह ने 2024 मध्ये …
उन्हाची दहकता वाढूनही विद्यार्थी सरबत, ताक, ओआरएसपासून राहिले वंचीत
निधी नसल्याने शिक्षण विभागाने महसूल मंत्रालयाच्या सूचनेला दाखवली केराची टोपली अमळनेर (प्रतिनिधी) उन्हाची दहकता वाढूनही विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामध्ये सरबत, ताक, ओआरएस पाकिटे मिळाली नाहीत. केवळ निधी नसल्याने शिक्षण विभागाने महसूल मंत्रालयाच्या सूचनेला केराची टोपली दाखवली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मार्च-एप्रिल महिन्यात उन्हाळा वाढल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी वर्ग …
शहरातील नागरिकांचे हाल थांबवून पाणीपुरवठा तातडीने नियमित करा
आमदार अनिल पाटलांनी केल्या मुख्याधिकारीना सूचना अमळनेर (प्रतिनिधी) उन्हाळा सुरू असल्याने शहरातील पाणीपुरवठा वितरण काही प्रमाणात विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने तातडीने योग्य नियोजन करून पाणीपुरवठा सुरळती करण्याच्या सूचना आमदार अनिल पाटील यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना केल्या आहेत. तसेच लवकरच केलेल्या नियोजनाचा आणि पाणीपुरवठा विभागाचा …
अमळनेर येथे चैत्र वद्य वरुथिनी एकादशीला गोरक्षानाथ जयंती व चैतन्य महापूजा होणार
अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्राचीन नाथ संजीवन समाधी मंदिर येथे चैत्र वद्य वरुथिनी एकादशीला प. पू. गोरक्षनाथ जयंती व चैतन्य नवनाथ महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. साधारणत: १३ व्या शतकातील अमळनेर चोपडा रोडवरील गायत्री शक्तिपीठा मागे असलेल्या ह्या नाथपंथीय समाधी मंदिराचे बांधकाम पूर्णत: दगडात असून मंदिरांत जाण्यासाठी दगडी प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारांतून …
फार्मसी महाविद्यालयात पुस्तकांचे पूजन करून पुस्तक दिनाचे महत्व केले विषद
अमळनेर (प्रतिनिधी) स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथालयात ग्रंथपाल सुजित अमळकर व शिवाजी पाटील यांनी पुस्तकांचे पूजन केले. उपस्थित मान्यवरांनी पुस्तक दिनाचे महत्व सांगितले. प्राचार्य डाॅ. रवींद्र सोनवणे यांनी महाविद्यालयातील ग्रंथालयास ११००० रुपये देणगी …
तासखेडा आमोदे विकासोच्या चेअरमनपदी राकेश पाटील यांची बिनविरोध निवड
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील तासखेडा आमोदे विविध कार्यकारी विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. चेअरमनपदी राकेश तापीराम पाटील तर व्हाइस चेअरमनपदी दीपक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचे या वेळी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संचालक भाऊसाहेब पाटील, चंद्रकांत पाटील, देवराम पाटील, संजय पाटील, अर्जुन पाटील, छोटुलाल पाटील, पोपट पाटील तर …
अमळनेर येथे २७ एप्रिल रोजी रंगणार कुस्तींची महादंगल
नेपाळ केसरी देवा थापा व हरियाणा केसरी शेरा पैलवानांची कुस्ती ठरणार आकर्षण अमळनेर (प्रतिनिधी) येथील बंगाली फाईल मधील बालवीर व्यायामशाळेतर्फे २७ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजेला कुस्त्यांची महादंगल रंगणार आहे. सुप्रसिद्ध पैलवान नेपाळ केसरी देवा थापा व हरियाणा केसरी शेरा पैलवान यांच्यात प्रमुख कुस्ती होणार आहे. ऋतिक राजपूत धुळे आणि …