. 🇮🇳 नागरी सेवा दिन :- 21 एप्रिल 🇮🇳 ब्रिटीश राजवटीत वॉरन हेस्टिंग्जने नागरी सेवेचा पाया घातला आणि चार्ल्स कॉर्नवॉलिसने त्यात सुधारणा, आधुनिकीकरण आणि तर्कशुद्धीकरण केले. त्यामुळे चार्ल्स कॉर्नवॉलिस यांना ‘भारतातील नागरी सेवेचे जनक’ म्हणून ओळखले जाते. 24 वेगवेगळ्या नागरी सेवांसाठी UPSC पदे केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित …
पालिकेने झामी चौकातील १० पक्की घरे आणि १६ दुकानांचे अतिक्रमन हटवले
अमळनेर (प्रतिनिधी) नगरपालिकेने शहरातील पोलिस बंदोबस्तात झामी चौकातील २६ अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा केला आहे. यामुळे वाहतूक कोंडी सुटणार असल्याने या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. मुख्य रस्त्याला अडथळा ठरणारी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या आदेशाने बांधकाम विभाग अभियंता डिगंबर वाघ, अभियंता सुनील पाटील, शिमाली आंबोरे, अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल …
अमळनेर तालुक्यातील निवडक शेतकरी गटांचे २४ व २५ रोजी दोन दिवसीय प्रशिक्षण
अमळनेर (प्रतिनिधी) मंगळग्रह सेवा संस्था व पानी फाऊंडेशनचा संयुक्त विद्यमाने अमळनेर तालुक्यातील निवडक शेतकरी गटांचे २४ व २५ एप्रिल रोजी एकदिवसीय प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र नेहमी दुष्काळमुक्त राहावा, यासाठी पानी फाऊंडेशन निरंतर प्रयत्नशील आहे. पानी फाऊंडेशन महाराष्ट्रातील गावा-गावांमध्ये जलसंरक्षणासह वॉटरशेड बांधण्याच्या दिशेने कार्य करते. या उद्देशाला अनुसरून कार्य करणाऱ्या …
दोन दिवसाआड पाणी पुरवठा न केल्यास १ मे रोजी पालिकेवर काढणार मटका मोर्चा
नागरिकांनी मुख्याधिकारीना निवेदनाद्वारे दिला इशारा अमळनेर (प्रतिनिधी) शहरात पूर्वीप्रमाणे दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात यावा अन्यथा १ मे रोजी पालिकेवर मटका मोर्चा काढून मटके फोडून निषेध करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी मुख्याधिकारीना निवेदनाद्वारे दिला आहे. नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर शहरातील नागरिक नियमित पाणी पट्टी कर व …
शालेय जनरल नॉलेज परीक्षेत साने गुरुजी विद्यालयाचा मानव पाटील राज्यात प्रथम
अमळनेर (प्रतिनिधी) भारती विद्यापीठ, पुणे संचलित शालेय जनरल नॉलेज परीक्षेत साने गुरुजी विद्यालयाचा इयत्ता सातवीचा विद्यार्थी मानव रावसाहेब पाटील याने 200 पैकी 148 गुण प्राप्त करून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला . त्याचे संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक संजीव पाटील, शिक्षक वृंद यांनी कौतुक …
अमळनेर बाजार समिती जिल्ह्यात पहिली तर नाशिक विभागात तिसरी
महाराष्ट्रातील एकूण ३०५ बाजार समित्यांपैकी राज्यात आली १७ वी अमळनेर (प्रतिनिधी) बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातील ३०५ बाजार समित्यांपैकी तिसऱ्या क्रमांकावर आली असून जळगाव जिल्ह्यात पहिली तर नाशिक विभागात तिसरी आली आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन …
लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या क्रांतीपर्व स्मारकाचे तात्काळ लोकार्पण करावे
माजी नगरसेवकांसह डांगरी ग्रामस्थांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली मागणी अमळनेर(प्रतिनिधी) शहरातील ढेकु रोड भागात अनेक दिवसांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या क्रांतिवीर डॉ.उत्तमराव पाटील व क्रांतिवीरांगणा लीलाताई पाटील यांच्या क्रांतीपर्व स्मारकाचे तात्काळ लोकार्पण करण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवकांनी तसेच डांगरी ग्रामस्थांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्याकडे केली आहे. मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले …
डी. डी. पाटील यांची राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या ( इंटक) जळगाव जिल्हा अध्यक्षपदी निवड
अमळनेर (प्रतिनिधी) येथील धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. डी पाटील यांची राष्ट्रीय मजदूर काँग्रेस ( इंटक), संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक ) या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार डॉ. जी संजीवा रेड्डी यांच्या मान्यतेने पक्ष संघटनेतील उल्लेखनीय कार्य पाहता व …
अमळनेर तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे काढले आरक्षण
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली जातीनिहाय प्रवर्गातील तर उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले. जातीनिहाय विविध प्रवर्गातील महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत मोहित महाजन याच्या हस्ते चिठ्ठी काढून काढण्यात आले. यात अनुसूचित जाती – नगाव खुर्द, रुंधाटी,शिरसाळे …
आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने तासखेडा येथील दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
अमळनेर (प्रतिनिधी) पाणी भरण्यावरून वाद झाल्यानंतर आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप करीत मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून तालुक्यातील तासखेडा येथील पिता पुत्रावर तब्बल दोन महिन्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तासखेडा येथील पंकज चंद्रकांत पाटील याने …