अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका को-ऑपरेटिव्ह फ्रुट सेल सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी उमेश प्रतापराव काटे यांची गुरुवारी निवड झाली. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. अमळनेर तालुका को-ऑपरेटिव्ह फ्रुट सेल सोसायटीची संस्थेच्या कार्यालयात गुरुवारी संचालक मंडळाची विशेष बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रताप पाटील हे होते. या बैठकीत स्वीकृत …
जी.एस.हायस्कूलच्या करुणा क्लबच्या विद्यार्थ्यांनी जखमी बगड्याचे वाचवले प्राण
अमळनेर (प्रतिनिधी) येथील जी.एस.हायस्कूलच्या करुणा क्लबच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात एका बगळ्याचा जीव वाचवीला. त्यांचे शिक्षकांडून कौतुक करण्यात आले. शाळेत वार्षिक परीक्षा सुरू असून वार्षिक परीक्षेचा पेपर झाल्यानंतर इयत्ता सातवीचे विद्यार्थी यश विनोद धनगर व रोहित मनोहर पाटील यांना शालेय प्रांगणामध्ये बगडा जखमी अवस्थेत पडलेला दिसला त्यावेळी त्यांनी शाळेचे शिक्षकजी.एस. चव्हाण …
पोलिसांनी धाड टाकून सट्टा जुगार खेळणाऱ्या तिघांच्या आवळल्या मुसक्या
अमळनेर (प्रतिनिधी ) पोलिसांनी शहरातील अर्बन बँकेसमोरील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये धाड टाकून सट्टा जुगार खेळणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळून गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेडकॉन्स्टेबल रवींद्र पाटील, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, हर्षल पाटील यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून १९ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास …
जिजाऊ रथ यात्रेचे अमळनेर येथे २२ रोजी आगमन, मराठा समाज स्वागतासाठी सज्ज
अमळनेर (प्रतिनिधी) मराठा सेवा संघ संचलित मराठा जोडो अभियान अंतर्गत जिजाऊ रथ यात्रेचे अमळनेर येथे २२ रोजी आगमन होत आहे. यात्रेच्या स्वागताची तयारी मराठा समाज बांधवांकडून करण्यात आली आहे. भोसले गढी वेरूळ ते लाल महाल पुणे पर्यंत १८ मार्च ते १ मे २०२५ दरम्यान या रथयात्रेच्या आयोजन करण्यात आले आहे. …
भुमी अभिलेख कार्यालयातून लॅपटॉप चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक
अमळनेर (प्रतिनिधी) येथील भुमी अभिलेख कार्यालयातून लॅपटॉप चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अमळनेर येथील शहरातील स्टेशन रोडवरील भुमी अभिलेख कार्यालयाचे कुलुप तोडुन 30,00 रुपये किमतीचा लॅपटॉप चोरीस गेल्याबाबत स्मिता पोरशा गावित यांनी तक्रार दिली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा …
वावडे येथे सन १९९६-९७च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा रंगला स्नेह मेळावा
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वावडे येथे बी. बी. ठाकरे महाविद्यालयातील सन १९९६-९७ च्या १० वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रंगला. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला ७० ते ८० माजी विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी हजेरी लावली. वावडे परिसरातील जवखेडे, मांडळ, आर्डी, अनोरे, तरवाडे या गावांचे विद्यार्थी उपस्थित होते. माजी मुख्याध्यापक …
दुचाकीला भरधाव बसने धडक देत पती पत्नीला ५० ते ६० फूट नेले फरफटून
अमळनेर (प्रतिनिधी) शेतात जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव येणाऱ्या बसने धडक दिल्याने पती पत्नी गंभीर जखमी झाले. दोघांना तब्बल ५० ते ६० फूट ओढून नेले. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी …
श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान परिसराच्या २.४० कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन
नव्याने होणाऱ्या विकास कामांमुळे अमळनेरच्या धार्मिक पर्यटनाला मिळणार प्रोत्साहन अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान परिसराच्या २.४० कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिता वाघ या होत्या. श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान परिसरात होत असलेली विकास कामे अमळनेरचा सर्वांगीण …
अमळनेर नगरपालिकेत एकाच ठेकेदारच्या ३ एजन्सीना काम देऊन बोकाळला भ्रष्टाचार
१ मे महाराष्ट्र दिनापासून अमरण उपोषणाचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भुषण भदाणे यांचा इशारा अमळनेर (प्रतिनिधी) पालिकेतील पाणीपुरवठा विभागात एकाच ठेकेदारच्या ३ एजन्सीना काम देऊन शासकीय दरापेक्षा ४० ते ५० पटीने जास्त दराचे वार्षिक कार्यादेश देऊन मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे, याची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष …
अमळनेर तालुक्यात पुन्हा चार ठिकाणी आगी लागून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात आगी लागण्याच्या घटनाध्ये वाढ झाली आहे. पुन्हा चार गावांत आगी लागून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आगी लागल्या आहेत. शेतकरी या आगीत नुकसानीने होरपळून निघत आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील तरवाडे शिवारात …