स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  🔷 चालू घडामोडी :- 21 एप्रिल 2025   ◆ महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे.   ◆ महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे.   ◆ महाराष्ट्र शासनाचा हिंदीतील राज कपूर जीवनगौरव पुरस्कार अनुपम खेर यांना जाहीर झाला …

वर्षभरात शहरासह ग्रामीण भागात 62 ठिकाणी लागलेल्या आगी विझवण्यात अग्निशमन दल यशस्वी

अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागात वर्षभरात 62 विविध ठिकाणी लागलेली आग आटोक्यात आणण्यात अमळनेर नगरपरिषद अग्निशमन विभागाला मोलाचे यश आहे. यातून त्यांची कर्तव्य दक्षता दिसून येते. तर 14 ते 20 एप्रिल दरम्यान अग्निसुरक्षा सप्ताह साजरा होत असल्याने जनजागृती ही करण्यात येत आहे. अमळनेर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसापासून …

डांगरी गावातूनच काँग्रेसच्या २६ तारखेच्या स्वातंत्र्यलढा स्मरण पदयात्रेला होतोय विरोध

अमळनेर (प्रतिनिधी) येथील क्रांतीपर्व स्मारकावरून वाद पेटला असताना काँग्रेसच्या एका गटाने काढलेल्या स्वातंत्र्य लढा स्मरण पदयात्रेला डांगरी गावातूनच आणि डॉ. उत्तमराव पाटील यांच्या कुटुंबियांनी विरोध केला आहे. अमळनेर शहरातील अपूर्ण असलेल्या क्रांतीपर्व स्मारकाचे काँग्रेसच्या एका गटाकडून उतावीळपणे कुलूप तोडून लोकार्पण झाल्याचे सांगण्यात आले. मात्र स्मारक उभारणीसाठी प्रयत्न करणाऱ्या माजी नगरसेवक …

पातोंडा येथील ग्रामविकास अधिकारी यांची चौकशी करून कारवाईची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पातोंडा येथील ग्राम पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी हे ग्राम पंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार चालवत आहेत. तसेच पंधराव्या वित्त आयोगाचे कामेही आपल्या जवाई व त्यांच्या मित्रांना देण्याचे प्रकार करीत आहेत. या कामाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासंबंधीची तक्रार आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून ग्राम पंचायत सदस्य तथा …

जवखेडे येथील जिल्हा परिषद शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जवखेडे येथील जिल्हा परिषद शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा व जवखेडे गावाच्या प्रथम नागरिक तथा सरपंच जयश्री माळी व शाळा व्यवस्थापन समिती, जवखेडेच्या अध्यक्षा कविता पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. तद्नंतर शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे …

मुडी प्र. डांगरी येथे जयश्री पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे थाटात भूमिपूजन आणि उद्घाटन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुडी प्र. डांगरी गावात जिल्हा परिषद व डी.पी.डी.सी.च्या जनसुविधा योजनेंतर्गत माजी जि प सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून कामे मंजुर झाली आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी मंजूर २० …

लक्ष्मीनगर जलकुंभाजवळ जलवाहिनीतून गळतीने पाणी वाया, आरोग्यही धोक्यात

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील लक्ष्मीनगर जलकुंभाजवळील  जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत आहे. या ठिकाणी पंधरा दिवसांपूर्वी खड्डा खोदण्यात आला होता, मात्र त्यानंतर कोणतीही दुरुस्ती न करता तो तसाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी रोज वाया जात असून, या खड्ड्यामुळे  दूषित पाणीपुरवठा होत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास …

मारवड महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले होते. त्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश …

जिओ कंपनीची केबल टाकताना मुंदडा नगरमध्ये पाईप लाईन फोडली, पाणीपुरवठा विस्कळीत

अमळनेर (प्रतिनिधी) मुंदडा नगरमध्ये जिओ कंपनीची केबल टाकणाऱ्या ठेकेदाराने पालिकेची पूर्वपरवानगी न घेता खड्डे खोदणे सुरू केल्याने मुख्य जलवाहिनी फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून अर्ध्या शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. भर उन्हाळ्यात आफत आल्याने पाण्यासाठी नागरिकांचे हाल होणार आहेत. शहरातील मुंदडा नगर मधून अर्ध्या अमळनेर शहराला …

प्रा. धर्मसिंह पाटील हे आयुष्यभर जगले कृतिशील जीवन : प्रा. प्रकाश पाठक

पंचाहत्तरी निमित्त सत्कार सोहळा उत्साहात, ७५ जोडप्यांच्या हस्ते सामाजिक सद्भाव गायत्री महायज्ञ अमळनेर (प्रतिनिधी) प्रा. धर्मसिंह पाटील हे आयुष्यभर कृतिशील जीवन जगलेत. त्यांचं जीवन कर्तव्य प्रदान आहे, असे गौरवोद्गार धुळे येथील प्रसिद्ध व्याख्याते प्रा. प्रकाश पाठक यांनी काढले. अमळनेर प्रताप महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक व सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात एक समर्पित व्यक्तिमत्त्व …