: ♦️09 November 2024 Current Affairs in English & Hindi ➼ ‘National Cancer Awareness Day’ is celebrated every year on 07 November in India . भारत में प्रतिवर्ष 07 नवंबर को ‘राष्ट्रीय कैंसर जागरूकता दिवस’ मनाया जाता है। ➼ Republican Party candidate Donald Trumpwill become …
जमदे – भोलाणे गावात घोड्यावरून काढली वरात, शिरीष दादांचा 42 खेड्यात प्रचार जोरात !
अमळनेर (प्रतिनिधी) माजी आमदार शिरीष चौधरी यांची जमदे – भोलाणे गावात घोड्यावरून वरात काढून जोरदार स्वागत करण्यात आले. त्यामुळे 42 खेड्यात त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. अब शिरीष दादा बॅटसे घुमायंगे सिक्सर म्हणत तरुणांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला. अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांचा तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार …
अमळनेरात थंडीची चाहुल, स्वेटर विक्रेते थाटू लागली दुकाने
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात थंडीची चाहुल लागल्याने उत्तर प्रदेशातील उबदार स्वेटर विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटायला सुरुवात केली आहे. त्यांच्याकडे ५०० ते २५०० रुपयांपर्यंत स्वेटर उपलब्ध आहेत. नोव्हेंबर महिन्यातच गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे दरवर्षी शहरात धुळे रस्त्यावर जुन्या पोलिस कर्मचारी वसाहतीजवळच स्वेटर विक्रेते आपली दुकाने थाटतात. हे विक्रेते …
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांना गावागातून मिळतोय प्रतिसाद
अमळनेर (प्रतिनिधी) महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांनी प्रचारात तालुका पिंजून काढला असून त्यांना गावागांत पसंती दिली जात आहे. त्यांना भरघोस मते देऊन प्रतिसाद देऊन, अशी ग्रामस्थ ग्वाही देत आहेत. अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली- रंजाणे, खापरखेडा- अंबारे, करणखेडा, तासखेडा, आमादे, नंदगांव, लडगांव, दरेगांव, हिंगोणे बु, मुडी, पिंगळवाडे, गलवाडे बु., खु., …
मंत्री अनिल पाटील यांना अमळनेर चर्मकार समाजाने दिला पाठींबा
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात झालेली विकासकामे व भुमीपुत्र असल्याने समाजाची पहिली पसंती मंत्री अनिल पाटील यांना असून समाज त्यांच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही तालुका चर्मकार समाजाने दिली आहे. अमळनेर तालुका चर्मकार समाजातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, समाजाच्या पदाधिकारी व असंख्य समाजबांधवांच्या वतीने त्यांना सह्यांचे पाठिंबा पत्र अनिल पाटील यांना …
विधानसभा मतदार संघात ईव्हीएमचे दुसरे दृच्छीकरण १० रोजी होणार
अमळनेर (प्रतिनिधी) विधानसभा मतदार संघात ईव्हीएमचे दुसरे दृच्छीकरण निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात १० रोजी करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता निवडणूक निरीक्षक डॉ. रणजितकुमार सिन्हा यांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी दिली. त्याचप्रमाणे मतदानासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात ११ नोव्हेंबर रोजी …
एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या बालकांना सकस आहाराचे वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या बालकांना सकस आहार किराणा किट वाटप रोटरी क्लब आणि आधार संस्थेच्या संयुक्त उपक्रमाने वाटप करण्यात आले. ओमकार अंध केव्हीके सोसायटी मुंबई यांच्या कडून किशोर देवरे यांनी ५० सकस आहार किट त्यांच्या स्वतःच्या खर्चातून अमळनेर येथे पार्सलद्वारे पोहचवले. मकसुद भाई बोहरी यांच्या कडून ३० प्रोटीन किट …
प्रधानमंत्री सुरक्षा रक्षक एसपीजी कमांडो अरविंद बैसाणेंना पदोन्नती
अमळनेर (प्रतिनिधी) प्रधानमंत्री सुरक्षा रक्षक एसरीजी कमांडो असलेला अमळनेराचे सुपुत्र अरविंद बैसाणे यांना पदोन्नती प्रधान करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सुरक्षा रक्षक एसपीजी कमांडो म्हणून चार वर्ष दिल्ली येथे एमपीओ सेवार्थ असलेले अमळनेरचे सुपुत्र अरविंद बैसाणे यांना विभागामार्फत पदोन्नती प्रदान करण्यात …
दिव्यांगांसह ८५ वर्षावरील १७८ मतदारांचे घरी जाऊन मतदान
अमळनेर(प्रतिनिधी) दिव्यांग आणि ८५ वर्षावरील मतदारांचे मतदान घेण्यास प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. या वेळी १९० पैकी १७८ मतदारांनी मतदान केले. चार मतदार मयत झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी दिली. शहरात ८५ वर्षावरील १४९ मतदार असून त्यापैकी १४१ मतदारांनी मतदान केले. ३ मतदार मयत झाले …
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या ५ नंबरच्या गोदामात ठेवणार ईव्हीएम
अमळनेर (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. २० रोजी मतदान झाल्यावर ईव्हीएम मशीन टाकरखेडा रस्त्यावर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या ५ नंबरच्या गोदामात ठेवले जाणार आहेत. त्या कक्षाभोवती त्रिस्तरीय सुरक्षा कवच आणि सीसीटीव्हीचे नियंत्रण राहिली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी दिली. त्रिस्तरीय सुरक्षा कवचात …