स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  : *चालू घडामोडी*   1. आशिया महिला क्रिकेट कप 2024 मध्ये एकूण किती संघ सहभागी झाले होते?   * *योग्य उत्तर – 08*   2. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पहिले सुवर्णपदक कोणत्या देशाने पटकावले आहे?   * *योग्य उत्तर –  चीन*   3. पॅरिस ऑलम्पिक 2024 मध्ये एकूण किती …

जानवे शिरूड गट यंदा विकासाभिमुख नेतृत्व अनिल पाटलांना देणार खंबीर साथ

भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला दावा   अमळनेर (प्रतिनिधी) महायुतीचे उमेदवार अनिल पाटील हे विकासाभिमुख नेतृत्व असल्याने त्यांच्या विजयासाठी खासदार स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा मतदारसंघात सुमारे ४१ गावांचे मोठे साम्राज्य असलेला जानवे शिरूड जि. प. गट यंदा भाजप महायुतीलाच खंबीर साथ देणार आहेत. यासाठी सारे पदाधिकारी व कार्यकर्ते एकसंघ …

अमळनेर मतदार संघातील २५० मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग होणार

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा निवडणुकीत निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहेत. प्रशासनही तयारीत आहेत. त्यात अमळनेर मतदार संघात ३२५ मतदान केंद्र असून ६६ टक्के म्हणजे २५० मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. तर ७५ मतदान केंद्रांवर मायक्रो ऑबझर्व्हर नियंत्रण ठेवतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. गेल्या निवडणुकीत कमी मतदान झालेल्या ठिकाणी …

अमळगांव शिवारामध्ये झालेल्या खून प्रकरणात आणखी दोन आरोपी निष्पन्न

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अमळगाव शिवारात झालेल्या खून प्रकरणात पोलिसांनी तपास करताना आणखी दोघांची नावे निष्पन्न केली आहेत. आरोपींची संख्या आठ झाली असून आठही आरोपीना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विकास प्रवीण पाटील याच्या खून प्रकरणात एलसीबी पोलिसांनी अमोल वासुदेव कोळी, मनोज हनुमंत …

पालिकेच्या विद्युत विभागाचा भोंगळ कारभार, पथदिवे बंदमुळे जीव धोक्यात

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील ढेकू रोड,सानेनगर व ग्रामीण रुग्णालय परिसरातील रस्त्यावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. दिवाळीतही नागरिकांना अंधाराचा सामाना करावा लागला. दिवाळी संपूनही पालिकेला जाग येत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. नगरपरिषदेने शहरातील पथदिवे देखभाल- दुरुस्तीसाठी एक वर्षाचा ठेका मे. विश्व इलेक्ट्रिकल्स, ठाणे यांना दिलेला आहे. मात्र ढेकू रोडवरील …

मतदार संघातील शेतरस्त्यांचा प्रश्न प्रामुख्याने सोडविणार

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदेंची ग्वाही   अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जनतेने संधी दिल्यास मतदार संघातील शेतरस्त्यांचा प्रश्न प्रामुख्याने सोडविणार असल्याचे आश्वासन  महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांनी दिले आहे.     ५ नोव्हेंबर रोजी सती मातेचे दर्शन घेऊन डॉ. शिंदे यांनी प्रचाराला सुरुवात केली. तालुक्यातील कुऱ्हे बु, कुऱ्हे खु, टाकरखेडा, …

गावांगावात टवाळ खोरांना दारू पाजून प्रचार सभेत गोंधळ घालण्याचे गलिच्छ राजकारण

आम्हालाही सर्वच खेळ येतात ः जिल्हाध्यक्ष भुषण भदाणे यांचा इशारा   अमळनेर (प्रतिनिधी)  अमळनेर विधानसभा निवडणुकीत गलिच्छ राजकारण करीत काही गावातील टवाळ खोरांना दारू पाजून गोंधळ घालण्याचा निंदनीय प्रकार केला जात आहे.  एवढ्या खालच्या स्तरावर जाऊ नका, खिलाडू वृत्तीने लढा देण्याची तयारी ठेवा अन्यथा आम्हालाही सर्वच खेळ येतात, असा इशारा …