दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. दिवाळीला ‘प्रकाशाचा सण’ असेही म्हणतात कारण या दिवशी घरे, रस्ते आणि मंदिरांमध्ये दिवे लावून अंधार दूर केला जातो. दिवाळीचा सण आनंद, ऐश्वर्य, आणि नवी सुरुवात याचे प्रतीक मानला जातो. हा सण प्रामुख्याने पाच दिवस साजरा केला जातो. दिवाळीचे सांस्कृतिक आणि धार्मिक …
धनदाई महाविद्यालयास नॅक पुनर्मूल्यांकनात बी प्लस श्रेणी
अमळनेर (प्रतिनिधी) येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयास न्याक समितीतर्फे पुनर्मुल्यांकनात 2.54 प्लस श्रेणी प्राप्त झाली आहे. यामुळे संस्थेचे कौतुक होत आहे. मूल्यमापन करणाऱ्या समितीने नुकतीच महाविद्यालयास भेट दिली होती. या समितीचे अध्यक्ष रिवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजयकुमार अग्रवाल हे होते तर या समितीत समन्वयक म्हणून जयपूर विद्यापीठातील डॉ. ए. …
दीपावलीच्या शुभमुहूर्तावर अमळनेरात दोन सिनेप्लेक्सने मनोरंजनाची पर्वंनी
अमळनेर (प्रतिनिधी) तब्ब्ल सहा वर्षानंतर दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर चित्रपट गृह सुरू करण्यात आले. चित्रपट प्रेमिसाठी ही मनोरंजनाची पर्वनी ठरली आहे. मिडटाऊन येथे कलावती गोकलाणी यांच्या हस्ते एसएस सिनेप्लेक्सचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उद्योगपती सरजु गोकलाणी , सिनेप्लेक्सचे मालक संजय सुराणा उपस्थित होते. अमळनेरातील अखेरचे चित्रपटगृह तंबोली टॉकीजची जागा उद्योगासाठी घेतल्यानंतर …
अमळनेर मतदारसंघात आमदार रिपीट न करण्याची परंपरा यंदाही राहणार कायम
डॉ. अनिल शिंदे समर्थकांचा विश्वास अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर मतदारसंघात आमदार रिपीट न करण्याची परंपरा असून ती या निवडणुकीतही कायम राहणार असल्याचा विश्वास डॉ. शिंदे समर्थकांनी व्यक्त केला आहे. अमळनेर तालुक्यातील जनतेने शिरीष चौधरी आणि अनिल पाटील दोघांची कारकीर्द अनुभवली असून तालुक्याचा शाश्वत विकास न झाल्याने तिसरा पर्याय म्हणून डॉ. …
दिवाळी भेट पदयात्रेत व्यावसायिक व व्यापारी बांधवांनी मंत्री अनिल पाटलांना दिल्या ‘विजयी भव’च्या शुभेच्छा व आशीर्वाद !
अमळनेर (प्रतिनिधी) महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ यांनी महायुतीची दिवाळी भेट पदयात्रा काढत लहान, मोठे व्यावसायिक व व्यापारी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी सर्वानीच विजयी भवच्या शुभेच्छा व आशीर्वाद त्यांना दिले. लक्ष्मी पूजनाच्या दिवशीं सकाळीच पाच पावली देवी मंदिरात सर्व भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते, …
व्यापारी बांधवांशी डॉ. अनिल शिंदे यांनी संवाद साधत प्रचाराला दिला वेग
अमळनेर (प्रतिनिधी) महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ.अनिल नथ्थू शिंदे यांनी १ नोव्हेंबर रोजी शहरामध्ये प्रचारासाठी विविध भागांत संपर्क साधला. सर्व ठिकाणी व्यापारी बांधव आणि भगिनींशी संवाद साधत, डॉ. शिंदे यांना साथ देण्याचे आवाहन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केले. भागवत रोड, बस स्थानक, बाजारपेठ, दगडी दरवाजा, आणि भाजी मार्केट या ठिकाणी साथ …
अमळनेर विधानसभा मतदारसंघात तेवीस दिवसात २६४६ नवमतदारांची नोंदणी
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदारसंघात तेवीस दिवसात २६४६ नवमतदारांची नोंदणी झाली असून त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळणार आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या रात्री १२ वाजेपर्यंत नवीन मतदारांना नोंदणी करण्याची मुदत होती. ७ ऑक्टोबर रोजी प्रशासनाने मतदारांची आकडेवारी जाहीर केली होती. त्यावेळी अमळनेर विधानसभा मतदारसंघात ३०५६२६ मतदार होते. …
बाळंतपणाच्या पाचव्या दिवशी अचानक प्रकृती बिघडल्याने विवाहितेचा मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गोवर्धन येथील विवाहितेचा बाळंतपणाच्या पाचव्या दिवशी अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना ३१ रोजी घडली आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गोवर्धन येथील सपना रोहित भिल (वय २०) हिला २६ रोजी प्रसूतीसाठी धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेज येथे …
कोणत्याही शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांक शुल्क माफ
प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर न मागण्याचा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांनी दिला आदेश अमळनेर (प्रतिनिधी) कोणत्याही शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर न मागण्याचा आदेश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी दिले आहेत. शासनाने १०० किंवा २०০ रुपये ऐवजी ५०० रुपये मुद्रांक शुल्क करण्यात आले आहे. उच्च न्यायालय, खंडपीठ …