अमळनेरसाठी वस्तादच आखाड्यात उतरल्याने मोठा राजकीय भूकंप !

अमळनेर (प्रतिनिधी) येणाऱ्या विधनसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भूकंप अमळनेरात होणार आहे. यामुळे मोठी उलथापाथ होणार आहे. यासाठी मोठी राजकीय पेरणी झाली आहे. प्रस्थापिताला चिटपट करण्यासाठी मोठे वस्तादच आखाड्यात उतरल्याने डावपेच आखले जात आहे. यामुळे अमळनेर विधानसभेची निवडणूक राज्यभर गाजणार आहे. त्यामुळे हा राजकीय भूकंप कोणी केला, त्याचा केंद्र बिंदू कुठे …

गतवर्षी दरवाढ न झाल्याने यंदा कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

अमळनेर (प्रतिनिधी) मागील वर्षी कापसाला सुरुवातीपासून दरवाढ होण्याऐवजी घसरण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाकडे पाठ फिरवल्याने यंदा अमळनेर तालुक्यात कापसाचे क्षेत्र घटले. गेल्या वर्षी 51 हजार 978 हेक्टरवर तर यंदा 44 हजार 119 हेक्टरवर लागवड झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील अमळनेर, शिरूड, पातोंडा, मारवड, नगाव, टाकरखेडे, हेडावे, अमळगाव, भरवस, …

धुळे- चोपडा मुख्य रस्त्यावरील जीवघेण्या अवजड वाहनांच्या वर्दळीने विद्यार्थ्यांची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील मुख्य धुळे-चोपडा रस्त्यालगत तीन ते चार मोठ्या शाळा असून, त्या शाळांमध्ये शहरासह ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी रोज येतात. मात्र अवजड वाहनांच्या जीवघेणी वर्दळीने विद्यार्थ्यांची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात पालिकांच्या शाळांसह खासगी शैक्षणिक संस्थांच्या मराठी व इंग्रजी तर, इंग्रजी माध्यमांच्या शाळा बहुसंख्येने आहेत. यातील अनेक …

मारवड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस केला साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. व्हि. डी. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. दिलीप कदम उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी …

तरुणावरील हल्ल्यातील संशयित फरार आरोपीना अटक करण्याची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सुंदरपट्टी येथील  तरुणावर हल्ला करणाऱ्या फरार संशयितांना अटक लवकरात लवकर अटक करण्याची मागणी जखमी तरुणाचे पिता सुरेश पाटील यांनी केली आहे. सुंदरपट्टीचे माजी सरपंच सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की,  मागील एका भांडणाच्या कारणावरुन गोपाल उर्फ उमाकांत सुरेश पाटील (रा.सुंदरपट्टी, ता. अमळेनर) हा तरुण …

कावपिंप्री व इंद्रापिंप्री गावातील चार तरुण एकाच वेळी भारतीय सैन्य दलात भरती

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कावपिंप्री व इंद्रापिंप्री गावातील चार तरुण एकाच वेळी भारतीय सैन्य दलात भरती झाल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. यात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे, विशेष म्हणजे सर्वच तरुण सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. यामध्ये गौरव राजेंद्र पाटील हा सहा महिन्यांपूर्वीसैन्य दलात भरती झाला असून तो सध्या जम्मू येथे प्रशिक्षण …

लहान बहिणीला शाळेत सोडून परत येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तरुणाने केला अत्याचार

अमळनेर (प्रतिनिधी) लहान बहिणीला शाळेत सोडून परत येणाऱ्या बारावीतील अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून रिक्षात निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना २४ रोजी अमळनेर शहरात भरदिवसा सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जययोगेश्वर माध्यमिक विद्यालयात १२ …