स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथे केली कारवाई अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी प्रकरणातील गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथून सीताफीने अटक केली. अमळनेर परिसरातील वाढत्या घरफोडी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे …
झाडे लावलेल्या वन क्षेत्रात बकऱ्या चारण्यास अडवल्याने वनमजुराला दोघांकडून मारहाण
अमळनेर (प्रतिनिधी) झाडे लावलेल्या वन क्षेत्रात बकऱ्या का चारतो, असे विचारण्याचा राग आल्याने दोघांनी वनमजुराला मारहाण केल्याच्या घटना जानवे भागात घडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जानवे महिंदळे भागात वनविभागाने नवीन झाडे लावली असून २७ रोजी कायम वनमजूर म्हणून कार्यरत असलेले पुंजू वेडू …
चालकास शिंका आल्याने कार झाडास धडकल्याने अपघातात चार जण जखमी
अमळनेर (प्रतिनिधी) चालकास शिंका आल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटून कार झाडावर आदळल्याने एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाल्याची घटना दि. 27 रोजी दुपारच्या सुमारास एकलहरे गावाजवळ घडली.येथून शिंदखेडाकडे कारने जात असताना हा अपघात झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील पारस गोल्ड सराफी पेढीचे मालक संदीप थोरात हे खाजगी कामानिमित्त …
अमळनेरात गोदाम उपलब्ध नसल्याने पुन्हा शासकीय ज्वारी खरेदीला लागली नाट
आतापर्यंत ६३ शेतकऱ्यांची २ हजार ८०० क्विंटल ज्वारीची खरेदी अमळनेर (प्रतिनिधी) शासकीय ज्वारी खरेदीला नाट लागली असून गोदाम उपलब्ध नसल्याने पुन्हा खोडा बसला आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून ज्वारी खरेदी बंद झाली आहे. आतापर्यंत ६३ शेतकऱ्यांची २हजार ८०० क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शासनाने …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
पोलीस भरती लेखी परीक्षा- 🙏चालू घडामोडी वर मागील किती दिवसांचे प्रश्न येतात? 👉एक ते दीड वर्षापर्यंतच्या चालू घडामोडी 🙏पोलीस भरतीला चालू घडामोडी चे प्रश्न रिपीट होतात का? 👉 होय काही प्रश्न रिपीट होतात परंतु बहुतेक प्रश्नांशी साम्य असलेले प्रश्न येतात. 🙏 चालू घडामोडी घटकावर किती प्रश्न …
जवखेडा, आंचलवाडी शिवारात पावसाचे तांडव, शेकडो एकर शेती वाहून गेली, नाले भरले तुडुंब
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात पुन्हा जवखेडा, आंचलवाडी शिवारात जोरदार पाऊस झाला.. कित्येक एकर शेती वाहून गेली आहे. नाले तुडुंब वाहिले तर विहिरी जमीन पातळीवर भरल्या. सुरुवातीलाच पावसाच्या तांडवाने शेतकरी हैराण झाले आहेत. अमळनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेली जवखेडा , आंचलवाडी या गावात २७ रोजी सायंकाळी अतिवृष्टी झाली. जवखेडा येथे ग्रामपंचायतजवळ गावदरवाज्याच्या बाहेर …
पंचायत समिती आवारात अन्यायकारक शासन निर्णयाची संगणक परिचालकांनी केली होळी
अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामविकास विभागाने संगणक परीचालकांच्या तोंडाला पाने पुसत काढण्यात आलेल्या अन्यायकारक शासन निर्णयाची संगणक परिचालकाकडून पंचायत समिती आवारात होळी करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, मागील सुमारे १२ वर्षापासून संग्राम व आपले सरकार प्रकल्पाच्या माध्यमातून काम करून राज्यातील सुमारे १२ कोटी जनतेला विविध प्रकारच्या ऑनलाईन व ऑफलाईन सेवा …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
*सराव प्रश्नसंच* ◾️महाराष्ट्र पोलीस महासंचालक – रश्मी शुक्ला ( महाराष्ट्रातील पाहिल्या महिला पोलीस महासंचालक) ◾मुंबई पालकमंत्री – दिपक केसरकर ◾मुंबई महापौर – किशोरी पेडणेकर ◾मुंबई जिल्हाधिकारी – संजय यादव ◾मुंबई शहरचे पोलीस आयुक्त – विवेक फणसाळकर ◾मुंबई विद्यापीठ कुलगुरू – डॉ. रवींद्र कुलकर्णी …
पालिकेतील १४२ कर्मचाऱ्यांना निवृत्त उपदान, वेतन आयोगाचा निधी वाटप
भारतीय कर्मचारी महासंघाच्या वतीने मुख्याधिकारी तुषार नेरकरांचा सत्कार अमळनेर (प्रतिनिधी) पालिकेतील सुमारे १४२ सफाई कामगार व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त उपदान व सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित रकमा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी वाटप केले. यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सन २०१६ ते २०२१ पर्यंतच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी १,३७,७००८० …
भरवस येथील रेल्वे बोगद्यात पाणी साचत असल्याने नागरिकांचे हाल
समस्या नवनिर्वाचित खासदारांनी कायमस्वरूपी सोडण्याची मागणी अमळनेर (प्रतिनिधी) पावसाळा सुरू झाल्याने तालुक्यातील भरवस येथील रेल्वे बोगद्यात पाणी साचत असल्याने प्रवाश्यांना तसेच वाहनांना त्रास होत असून किरकोळ अपघात होत आहेत. गेल्या अनेक वर्षापासूनची ही समस्या नवनिर्वाचित खासदारांनी कायमस्वरूपी सोडावी, अशी मागणी भरवस व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. तालुक्यातील नागरिकांना अमळनेर …