♦️30 June 2024 Current Affairs in English & Hindi ➼ Every year on 28th June ‘ National Insurance Awareness Day ‘ is celebrated in India . हर वर्ष 28 जून को भारत में ‘राष्ट्रीय बीमा जागरूकता दिवस’ मनाया जाता है। ➼ According to the report of the …
अमळनेर तालुका विधानसभा निवडणूक काँग्रेस लढणार, सभेत इच्छुकांची चाचपणी
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका विधानसभा निवडणूक काँग्रेस लढणार असल्याने इच्छुकांची चाचपणी आणि त्यांचे मत जाणून घेण्यासाठी अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची शुक्रवारी सभा झाली. धनदाई माता एज्युकेशन सोसायटीच्या हॉलमध्ये दुपारी झालेल्या सभेत निरीक्षक म्हणून प्रदीप देशमुख व देवेंद्र सिंग पाटील (चाळीसगाव) यांची पक्षाकडून निरीक्षक म्हणून खास उपस्थिती होती. दोन्ही …
काँग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी गोकूळ बोरसे यांची झाली निवड
अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी अमळनेर शेतकी संघाचे माजी प्रेसिडेंट आणि तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष गोकुळ बोरसे यांची निवड करण्यात आली यनिमित्ताने त्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी अमळनेर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक मनोज पाटील ,धुळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य के. डी पाटील, चाळीसगावहून आलेले …
अमळनेरातील होतकरू तरुणाचा पोलिस भरतीत धावताना मुंबईत मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी) पोलिस भरतीसाठी धावत असतानाच अचानक कोसळल्याने रुग्णालयात नेल्यावर तेथे पुन्हा ह्रदयविकाराचा झटका आल्याने अमळनेर येथील होतकरू तरुणाचा मुंबईत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २९ जून रोजी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर येथील प्रबुद्ध कॉलनीतील रहिवासी अक्षय मिलिंद बिऱ्हाडे (वय २२) हा तरुण मुंबईत बाडेगाव येथे पोलीस भरतीसाठी …
औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमात मुलींची बाजी, महाविद्यालयाचा १००% निकाल
अमळनेर (प्रतिनिधी) औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पी. सी. भांडारकर व स्व. प्रा. र. का. केले फार्मसी महाविद्यालयाच्या पदविका फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला. म. रा. तंत्र शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या औषध निर्माणशास्र पदविका परीक्षेचा महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाचा निकाल १०० …
वादळ आणि पाऊस आल्याने घर कोसळून महिला व मुलगी जखमी
अमळनेर (प्रतिनिधी) अचानक हवा वादळ आणि पाऊस आल्याने एक घर कोसळून महिला व मुलगी जखमी झाल्याची घटना शहरातील कसाली मोहल्ला येथे २८ रोजी सायंकाळी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, फिरोज खा शमशेर खा पठाण यांची पत्नी सायंकाळी स्वयंपाक करत असताना वादळ व पाऊसमुळे अचानक घर कोसळले. धब्याची माती व …
हिंगोणे खु. येथे बिबट्याच्या हल्ल्यात झाला गोऱ्हा ठार
वन विभागाला आढळले पावलांचे ठसे अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार असून त्याने हिंगोणे खु. येथे हल्ला करीत गोऱ्हा ठार केला. वनविभागाने पायांच्या ठश्यांची पाहणी करून सावधानतेचा इशारा दिला आहे. तर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अमळनेर तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथील गोपाळ हिम्मत कोळी यांचा गोठ्यात बांधलेला गोऱ्हा सकाळी …
अमळनेर तालुक्यात यंदा पावसाची आभाळमाया, आतापर्यंत २०० मिमी पाऊस
जून महिन्याच्या २१ दिवसातच ३० टक्के पाऊस पडल्याने नदी, नाले विहिरींना पाणी अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या वर्षी जून महिन्यात पाऊसच पडला नव्हता. दुष्काळ आणि टंचाईचा सामना अमळनेर तालुक्याला करावा लागला होता. मात्र यंदा आभाळमाया राहिली आहे. जून महिना आटोपत नाही तोवर अमळनेर तालुक्यात पावसाने २०० मिमीचा आकडा पार केला आहे. …
शिरुड येथे दोन ठिकाणी घरफोडी, एक लाखाचा मुद्देमाल चोरून नेला
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरूड येथे घराच्या भिंतीला पडलेल्या भगदाडाला बांधलेला प्लास्टिक कागद फाडून चोरट्यांनी ९९ हजारांचा मुद्देमाल तर दुसऱ्या घरातील पाच हजार रुपये व एक ग्रम सोने चोरून नेल्याची घटना २९ जून रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसानी दिेलली माहिती अशी की …
नगरपरिषदेच्या बाजूलाच काँक्रिट रस्त्याचे काम नित्कृष्ट केल्याने दुकानदार झाले त्रस्त
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर नगरपरिषदेच्या बाजूलाच नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रिट रस्त्याचे काम नित्कृष्ट झाल्याने दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत दुकानदारांनी पालिकेला निवेदन देऊन कैफियत मांडली आहे. दुकानदारांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, नगरपरिषदेच्या नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बाजूला नुकताच सिमेंट काँक्रिटचा नवीन रस्ता बनविण्यात आला …