: ╭───────────────────╮ ⚡️ करेंट अफेयर्स : 30 मई 2024 ⚡️ ╰───────────────────╯ Q. एशियाई रिले चैंपियनशिप 2024 में 4×400 मीटर मिश्रित रिले स्पर्धा में किस देश की टीम ने स्वर्ण पदक जीता – भारत चीन जापान वियतनाम 1 भारतीय एथलेटिक दल ने पहली एशियाई रिले चैंपियनशिप में तीन पदक – एक …
अमळनेरात आचार्यदेव श्रीमद विजय रत्नसुंदरसूरीश्वरजींचे जल्लोषात स्वागत
वरघोडा मिरवणूक काढून रत्नप्रवाह प्रवचनमालेस झाला प्रारंभ अमळनेर (प्रतिनिधी) पूज्यपाद आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुन्दरसूरीश्वरजी महाराज यांचे सुमारे चाळीस संत- साध्वींसह २९ मे रोजी अमळनेर नगरीत आगमन झाल्याने श्री सकल जैन समाजाच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. अमळनेर शहरात ज्ञानगंगेचा रत्नप्रवाह’ प्रवचन मालिकेतून दि २९ मे ते १३ …
चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) शेतीसंबंधिची वाद न्याप्रविष्ठ असताना चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी एकावर अमळनेर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्माराम जगन्नाथ चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आत्माराम चौधरी व चेतन शांताराम ठाकूर यांच्या अमळनेर शिवारात असलेल्या शेतातील बांधाचा वाद २०११ पासून सुरू आहे. सद्यस्थितीत हा वाद …
नॉर्वे विद्यापीठातर्फे रविंद्र पाटील यांना डॉक्टरेट बहाल
अमळनेर (प्रतिनिधी) येथील रविंद्र राजाराम पाटील यांना युरोप मधील आर्कटिक युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्वे तर्फे डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. ते नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याचे सुपुत्र आहेत. असलेल्या रविंद्र पाटील यांनी २८ फेब्रुवारी २०२४ रोजी नार्वे (युरोप) येथील यूआयटी द आर्कटिक युनिर्व्हसिटी ऑफ नार्वे येथे अभियांत्रिकी विज्ञान, विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि …
तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी २७ हजार २०० पुस्तके प्राप्त
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील उर्दू, मराठी, सेमी इंग्रजी माध्यमांच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २७ हजार २०० पुस्तके शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. राज्य शासनातर्फे पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्य पुस्तके दिली जातात, शाळा १५ जून ला उघडणार असल्या तरी त्याआधीच अमळनेर तालुक्यात पाठ्यपुस्तकांची उपलब्धता झाली आहे, १५ जूनला म्हणजेच …
पोलिसांनी दोन दिवसात सात जनावरे दोन वाहनांसह साडे पाच लाखाचा मुद्देमाल केला जप्त
अमळनेर (प्रतिनिधी) जनावरांची कत्तल थांबवण्यासाठी पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी आठवडा भरात पाच सहा कारवाया केल्या आहेत. गेल्या दोन दिवसात दोन वाहनांवर कारवाया करून सात जनावरे व दोन वाहने असा एकूण पाच लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, आगामी बकरी …
खान्देशीयन ऑफ द इयर 2024 पुरस्काराने आरोग्य सेविका सुवर्णा धनगर सन्मानित
अमळनेर (प्रतिनिधी) खान्देशातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम केलेल्या २४ व्यक्तींचा मराठी सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते “खान्देशीयन ऑफ द इयर 2024” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात अमळनेर तालुक्यातील आरोग्य सेविका सुवर्णा धनगर (वाळकी प्राथमिक आरोग्य केंद्र हातेड अंतर्गत ता.चोपडा) यांचा समावेश आहे. जळगाव येथे ‘आस बहुउद्देशीय विकास संस्था’, …
सावित्रीबाई फुले विद्यालयातील दहावीतील गुणवंताचा केला सन्मान
अमळनेर (प्रतिनिधी) येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने दहावीच्या वर्गाची १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. या पार्श्वभूमीवर “शाळा- आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत या गुणवंत “सावित्रीच्या लेकीं”चा आई- वडिलांसह घरी जाऊन सन्मान केला. येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात दिव्या किरण पाटील (रा.सडावण) हिने 92.40 टक्के गुण मिळवून …
अंबरीष ऋषी महाराज टेकडीवर महा वृक्षारोपण करण्यात येणार
एका मिनिटात २२२२ रोपे लावून मानव निर्मित जंगलाकडे वाटचाल अमळनेर (प्रतिनिधी) अंबरीष ऋषी महाराज टेकडीवर महा- वृक्षारोपण करण्यात येणार असून एका मिनिटात २२२२ रोपे लावून मानव निर्मित जंगलाकडे वाटचाल करण्यात येणार आहे. पावसाळाच्या सुरूवातीला संत सखाराम महाराज यांच्या हस्ते व मंत्री अनिल पाटील, माजी आमदार, खासदार, नगराध्यक्ष, लोक प्रतिनिधी, …
मालाची आवक वाढल्याने मांडळ येथे उपबाजार समिती होणार विकसीत
सभापती अशोक आधार पाटील यांनी दिली माहिती अमळनेर (प्रतिनिधी) येथील बाजार समितीत धुळे, शिरपूर ,शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी देखील आपला माल विक्रीसाठी आणत आहे. त्यामुळे मालाची आवक वाढू लागल्याने तालुक्यातील मांडळ येथे उपबाजार समिती सुरू करण्यात येणार आहे. याबाबत ग्रामसभेचा ठराव झाला आहे. तसेच मारवड उपबाजार देखील विकसित करण्यात येणार …