🔷 चालू घडामोडी :- 22 फेब्रुवारी 2024 ◆ निकाराग्वा येथील शेनिस पॅलासिओसने मिस युनिव्हर्स 2023 चा ताज जिंकला. ◆ जम्मू आणि काश्मीर मधील पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वे चे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. ◆ शाहबाज शरीफ यांची पाकिस्तान या देशाच्या पंतप्रधानपदी निवड होणार आहे. …
खा.शि.मंडळ कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध, निवडून आलेल्या ११ संचालकांचे स्वागत
अमळनेर (प्रतिनिधी) येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या माध्यमिक व प्राथमिक कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली असून बिनविरोध निवडणुकीची परंपरा अबाधित राहिली आहे. पडली.यात एकूण ११ संचालक बिनविरोध निवडुन आले आहेत. या संचालकांचे स्वागत करण्यात येत आहे अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या माध्यमिक व प्राथमिक पतसंस्थेची (२०२४-२०२९ ) पंचवार्षिक …
अमळनेर करांचे स्वप्न होणार पूर्ण, पाडळसे धरणास लवकरच देणार केंद्रीय जलआयोगाची मिळणार मान्यता
केंद्रीय जल आयोगाचे चेअरमन वोहरा यांचे मंत्री अनिल पाटलांना दिल्ली येथे झालेल्या बैठकित आश्वासन अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी पाडळसे धरणास लवकरच केंद्रीय जलआयोगाची मान्यता देण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय जल आयोगाचे चेअरमन कुशवेंद्र वोहरा यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटील यांना दिल्ली येथे झालेल्या बैठकीत दिले. …
बाहेरच्या टारगट पोरांच्या गोंधळाव्यतिरिक्त पाचही केंद्रांवर परीक्षा सुरळीत सुरू
पहिलाच इंग्रजीचा पेपर झाल्याने विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा विश्वास अमळनेर (प्रतिनिधी) बारावीच्या परीक्षांना बुधवारपासून सुरुवात झाली. बाहेरच्या टारगट पोरांच्या गोंधळाव्यतिरिक्त पाचही केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली. एकही कॉपी केस झाली नसल्याचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी सांगितले. तर पहिलाच इंग्रजीचा पेपर झाल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा विश्वास सोडला. अमळनेर तालुक्यात १२ वीला पाच …
अमळनेरात येत्या रविवारी मोफत हृदयरोग चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
अमळनेर पत्रकार संघ,न्यू प्लॉट विकास मंच व जैन सोशल ग्रुपचा सामाजिक उपक्रम उपक्रम अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, न्यू प्लॉट परिसर विकास मंच, तसेच जैन सोशल गृप, अमळनेरच्या वतीने रविवार दि 25 फेब्रुवारी रोजी।मोफत हृदयरोग चिकित्सा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरात धुळे …
लोंढवे माध्य.विद्यालयात प्रा.डॉ.ललित मोमाया यांनी मोबाईलचे फायदे व दुष्परिणाम बाबत केले मार्गदर्शन
अमळनेर (प्रतिनिधी) मोबाईल वापराचे फायदे आणि दुष्परिणाम बाबत तालुक्यातील लोंढवे येथील कै.आबासाहेब एस.एस.पाटील माध्य. विद्यालयात दुपारच्या सत्रात प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य प्रा.डॉ.ललित मोमाया यांचे इ.५वी ते १० वी पर्यंतच्या मुलांसाठी व्याख्यान झाले. यावेळी निवृत्त उपप्राचार्य प्रा.डॉ.ललित मोमाया यांनी मोबाईलचे फायदे, तोटे, उपयुक्तता, महत्व, अती वापर घातकच या किशोरवयीन मुलांना …
अमळनेर रेल्वे स्टेशनच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीत रेल्वे सल्लागार समिती सदस्यांनी मांडल्या समस्या
अमृत भारत योजने अंतर्गत अमळनेर रेल्वे स्थानकाचा समावेश झाल्याने पालटणार रूप : स्टेशन मॅनेजर शिंदे अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर रेल्वे स्टेशनच्या अधिकाऱ्यांसोबत रेल्वे सल्लागार समिती सदस्यांची बैठक झाली. यावेळी प्रवाशांच्या विविध समस्या सल्लागार समिती सदस्यामार्फत रेल्वे बोर्ड अधिकारी समोर मांडण्यात आल्या तर अमृत भारत योजने अंतर्गत अमळनेर रेल्वे स्थानकाचा समावेश …
सरपंच उपसरपंच परिषदतर्फे मराठा समाज मंगल कार्यालय येथे झाला सत्कार कार्यक्रम
अमळनेर ( प्रतिनिधी) सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांची सरपंच उपसरपंच परिषद यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रम मराठा समाज मंगल कार्यालय येथे झाला. यावेळी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी आमदार शदादा चौधरी व सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे,तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, शितल पाटील व जामनेरचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजमल भागवत व …
वीज कंपनीला झटका देत चार हजार मीटर विजेची तार अज्ञात चोरट्यांनी लांबवली
अमळनेर तालुक्यातील जैतपिर शिवारातील घटना अमळनेर (प्रतिनिधी) वीज कंपनीला झटका देत चार हजार मीटर विजेची तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना तालुक्यातील जैतपिर शिवारात घडली. याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मारवड कक्षाचे कनिष्ठ अभियंता भाऊसाहेब महाजन यांनी फिर्याद दिली आहे. …