: 🚨स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी* *7 फेब्रुवारी 2024* Q.1) यंदाचा ‘ग्रॅमी २०२४’ हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? *उत्तर – शंकर महादेवन आणि झाकिर हुसैन* Q.2) देशातील पहिले सर्वात मोठे बापू टॉवर कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आले? *उत्तर – बिहार* Q.3) पॅरिस 2024 ओलंपिक साठी …
शहरातील ढेकू रोड परिसरात पाणी पुरवठा झाला विस्कळीत
साहित्य संमेलनाला पुरवठा करावा लागल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा जावई शोध अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील ढेकू रोड परिसरात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. चार दिवसा आड झालेला पाणी पुरवठा सहा दिवस उलटूनही नगरपालिका नागरिकांना पाणी देऊ शकत नसल्याने पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. दरम्यान अखिल भारतीय …
अंबारे मराठी शाळेचे शिक्षक प्रदीप नेट परीक्षा उत्तीर्ण
अमळनेर (प्रतिनिधी) नेट परीक्षेत तालुक्यातील अंबारे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचे शिक्षक प्रदीप रावण कंखरे हे मराठी विषयात उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे राज्यात ओबीसी संवर्गात केवळ ७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, यात कंखरे यांचा समावेश आहे. ते आदर्श शिक्षक असून विद्यार्थी हितासाठी तथा गोरगरीब विद्यार्थी घडवण्यासाठी त्यांची नेहमीच धरपड सुरू असते, …
मेंढपाडांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला करून मेंढी केली ठार
अमळनेर (प्रतिनिधी) मेंढपाडांच्या कळपावर सोमवारी रात्री बिबटने हल्ला करून एक मेंढी ठार केल्याची घटना तालुक्यातील रूंधाटी परिसरात घडली. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच रात्री तात्काळ वनविभागाची कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. व त्यांनी ग्रामस्थांना काही सूचना केल्यात. पहाटे पाच वाजेपर्यंत परिसरात ग्रस्त घातली. अंधार असल्याने काहीसे समजले नाही. …
चौकास श्री. संत सेवालाल महाराज नाव देऊन प्रतिमा लावण्याची मागणी
मुख्याधिकाऱ्यांना अमळनेर येथील संत सेवालाल जयंती उत्सव समितीतर्फे निवेदन अमळनेर (प्रतिनिधी) चौकास श्री. संत सेवालाल महाराज यांचे नाव देण्यासह त्यांची प्रतिमा लावण्यासाठी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना अमळनेर येथील संत सेवालाल जयंती उत्सव समितीतर्फे निवेदन देण्यात आले. बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री. संत सेवालाल महाराज यांची जयंती १५ फेब्रुवारीला राज्यभर मोठ्या उत्साहात …
पळासदडे येथील शेतकऱ्यांच्या प्रयत्नानी दोन काळवीटांना जीवदान
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पळासदडे येथील शेतकऱ्यांच्या प्रयत्नानी दोन काळवीटांना जीवदान मिळाले. पळासदडे शिवारात गट क्रमांक 102/4 मध्ये दिनांक ६ रोजी सकाळी १०.३० वाजता दोन काळवीट हरभरा पिकांमध्ये ठिबकमध्ये अडकून बाहेर पडण्यासाठी आटा पिटा करत असताना शरद फकिरा पाटील यांना दिसले , त्यांनी तात्काळ शेतमालक उमाकांत बेहरे यांना फोन करून सांगितले. …
गोवर्धन येथे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे थाटात उद्घाटन
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथील कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिरास मंगळवारी गोवर्धन येथे सुरुवात झाली. सात्रीचे माजी सैनिक तथा पोलीस पाटील विनोद बोरसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉ. सचिनजी नांद्रे (संचालक कबचौ उमवी जळगाव) तसेच …
अखिल सुवर्णकार सखी मंचतर्फे हळदी कुंकूचा कार्यक्रम व कार्यकारणी जाहीर
अमळनेर (प्रतिनिधी) येथील अखिल सुवर्णकार सखी मंचचे वर्धापनदिनी हळदीकुंकूचा कार्यक्रम झाला. महिलांना वार्षिक बक्षीस वितरणही करून महिला मंडळाच्या मार्गदर्शक व सल्लागार नीता अविनाश सोनार यांनी सन-२०२४ ची कार्यकारिणी जाहीर केली. अध्यक्षा दीप्ती किशोर अहिरराव, उपाध्यक्षा पुनम संदीप भामरे यांची निवड झाली. कोषाध्यक्षा नूतन भामरे, सह- कोषाध्यक्षा शितल सोनार, तर सचिवपदी …
मे महिन्यात मूहुर्त नसल्याने पौष महिन्यातही शुभमंगलास पसंती
अमळनेर (प्रतिनिधी) यंदा मे महिन्यात मूहुर्त नाहीत, त्यामुळे काळानुरूप मानसिकतेत बदल करून पौष महिन्यात शुभमंगल उरकरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पुरोहितांकडून मुहूर्त काढून लग्नाची तयारी अनेक ठिकाणी होताना दिसत आहे. पौष हा एक भारतीय पंचांगानुसार वर्षातील दहावा महिना आहे. हा महिना तीस दिवसाचा असतो. साधारणतः पौष महिना हा ग्रेगोरियन कॅलेंडरच्या …
पुणे येथील नाटकात गोंधळ घालणाऱ्या समाज कंटकांचा अमळनेरात निषेध
सर्व पक्षीय व संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना दिले निवेदन अमळनेर (प्रतिनिधी) ललित कला केद्र पुणे येथील नाटकात गोंधळ घालणाऱ्या समाज कंटकांचा निषेध करीत अमळनेरला सर्व पक्षीय व संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पुण्याच्या ललित कला केंद्राला अभिनय क्षेत्राचा …