अमळनेर (प्रतिनिधी ) साहित्य संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रम 29 जानेवारीपासून आयोजित करण्यात आले होते. याचा 31 रोजी समारोप करण्यात आला. पूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांस आर्या शेंदुर्णीकर (जळगाव) यांनी कथ्थक नृत्याने बहारदार सुरुवात केली. साहित्य संमेलनात संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांची लक्षणीय हजेरी होती. जळगावच्या तेजल जगताप याने एकल तबला वादन सादर केले. सुनील …
गांधी विचार संस्कार परीक्षेत नाजमीन पठाण जिल्ह्यातून आली प्रथम
अमळनेर (प्रतिनिधी) गांधी विचार संस्कार परीक्षेत कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील कु. नाजमीन पठाण या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदक प्राप्त केले आहे. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम कस्तुरबा सभागृह, गांधी तीर्थ,जैन हिल्स, जळगाव येथे झाला. माजी शिक्षणाधिकारी नीलकंठ गायकवाड, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ …
गांधी विचार परीक्षेत लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातून पटकावला तिसरा क्रमांक
अमळनेर (प्रतिनिधी) गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे दरवर्षी घेतली जाणारी गांधी विचार संस्कार परीक्षेत लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यात वैभवी सुनिल महाजन व नंदिनी विजय सोनार या विद्यार्थींनींनी जळगाव जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यांना विद्यालयाच्या शिक्षिका रेखा कांबळे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक मनोहर महाजन तसेच सर्व शिक्षक …
साहित्य संमेलन पूर्व सांस्कृतिक कार्यक्रमात गोंधळ नृत्य,कथ्यक नृत्य,भरत नाट्यम व सुरेल गीतांची मैफल
अमळनेर (प्रतिनिधी) येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पूर्व सांस्कृतिक कार्यक्रमात रंगतदार कार्यक्रमांनी मोठी धम्माल केली,यावेळी गोंधळ नृत्य,कथ्यक नृत्य,भरत नाट्यम व सुरेल गीताच्या कार्यक्रमाने उस्फुर्त दात मिळवली. तसेच या कार्यक्रमाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. प्रताप महाविद्यालयातील बालकवी ठोंबरे सभागृहात दि 29 ला जळगांवच्या आर्या शेंदूर्णीकर यांनी बहिणाबाईंची कविता – माझी माय …
मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वाकडे, आज बालसाहित्य संमेलनास होणार प्रारंभ
अमळनेर (प्रतिनिधी) अवघ्या एका दिवसावर येवून ठेपलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वाकडे आलेली आहे. मुख्य सभा मंडपासह उर्वरित दोन सभागृहांची उभारणी पूर्ण झाली आहे. मुख्य सभागृहातील व्यासपीठ तयार झाले असून, उर्वरित दोन सभागृहांच्या व्यासपीठांची उभारणी सुरू आहे. दरम्यान, 1 फेब्रुवारी रोजी बालसाहित्य संमेलनास प्रारंभ होणार आहे. साहित्य संमेलनानिमित्ताने …
अमळनेरात आज रंगणार बालसाहित्य संमेलन, संमेलन अध्यक्ष, उद्घाटकही बालकच राहणार
अमळनेर (प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला 1 फेबुवारी रोजी बालसाहित्य संमेलन होणार आहे. प्रताप महाविद्यालयातील भव्य प्रांगणात उभारण्यात आलेल्या ‘साने गुरुजी साहित्य नगरी’त हे बालसंमेलन होईल. या बालसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यात अध्यक्ष, उद्घाटक ही सर्व मंडळी विविध शाळांमधील बालकच आहेत. बालमेळाव्याच्या अध्यक्षपदी तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, चाळीसगावचा विद्यार्थी …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
जुलाई से दिसंबर 2023 तक चर्चा में रही महत्वपूर्ण योजनाएं👇👇👇 अमृत सरोवर अभियान – 24 अप्रैल 2022 प्रधानमंत्री जन धन योजना- 28 अगस्त 2014 प्रधानमंत्री विश्वकर्म योजना -17 सितंबर 2023 स्मार्ट सिटी मिशन- 25 जून 2015 आजादी का अमृत महोत्सव -12 मार्च 2021 ई कोर्ट …
जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातील ६४ पोलिस कर्मचाऱ्यांना दिली पदोन्नती
अमळनेर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात कार्यरत ३२ हवालदारांना पोलिस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली असून पोलिस नाईक असलेल्या ३२ पोलिस कर्मचाऱ्यांना हवालदार पदी पदोन्नती मिळाली. अशा एकूण ६४ पोलिस कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गत पदोन्नतीने बढती प्राप्त झाली. जिल्हा पोलिस दलात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, …
रा. काँ. अजित पवार गटाच्या तालुका चिटणीसपदी प्रफुल्ल पाटील यांची वर्णी
अमळनेर (प्रतिनिधी) रा. काँ. अजित पवार गटाच्या तालुका चिटणीसपदी तालुक्यातील एकलहरे येथील प्रफुल्ल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे. मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल टील यांच्या हस्ते त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व इतर …
विद्रोही मराठी साहित्य संमेलन पत्रिकेचे डिजिटल उद्घाटन, विविध सादरीकरणाची भरगच्च रेलचेल
अमळनेर (प्रतिनिधी) ३ व ४ फेब्रुवारीला कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरी अमळनेर येथे होणारे विद्रोही मराठी साहित्य संमेलन पत्रिकेचे डिजिटल उद्घाटन संमेलन स्थळी संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. दोन दिवस रसिक,श्रोते व प्रेक्षकांचेअनुभव विश्व समृध्द करणाऱ्या वैचारिक, साहित्यिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमासह कला प्रदर्शनाचे विविध सादरीकरणाची भरगच्च रेलचेल पत्रिकेत आहे. …