अमळनेर (प्रतिनिधी) संभाजीनगर येथे झालेल्या अबॅकस नॅशनल लेव्हल च्या परीक्षेत अमळनेरचे विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावली. संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालेल्या नॅशनल लेवल अबॅकसच्या परीक्षेत ५००० विद्यार्थी सहभागी होते. अबॅकस स्पर्धेत सात मिनिटात १०० गणित सोडवण्याचे विद्यार्थ्यांना आव्हान दिले जाते. यात चाळीसगाव, जळगाव, यावल, बीड, संभाजीनगर या सर्व जिल्ह्यातील …
पांझरा काठच्या गावातील टंचाई निवारणासाठी अक्कलपाडातूनआवर्तन सोडा
मंत्री अनिल पाटील यांच्या धुळे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना अमळनेर (प्रतिनिधी) यंदा पावसाळा कमी झाल्यामुळे तालुक्यातील पांझरा नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यावर मात करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात आवर्तन सोडण्यात यावे, अश्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी धुळे जिल्हाधिकारीना दिल्या आहेत. …
साने गुरुजी नूतन विद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर डॉ. विक्रांत पाटील व डॉ. प्रियंका प्रशांत शिंदे यांनी केली तपासणी
अमळनेर (प्रतिनिधी) साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. विक्रांत पाटील व डॉ. प्रियंका प्रशांत शिंदे यांनी आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक प्रा.डॉ.एस.जे.शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक गुणवंतराव पाटील, ॲड.अशोक बाविस्कर, भास्करराव बोरसे, किरण पाटील …
चाकूचा धाक दाखवून जबरी लूट, चोरी करणाऱ्या माकूवर एमपीडीए कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी) चाकू दाखवून जबरी लूट, चोरी करणाऱ्या रमण उर्फ माकू बापू नामदास (वय २२) याच्यावर एमपीडीए कारवाई करून त्याला कोल्हापूर येथील कारागृहात रवाना करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात सात जणांवर एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे. रमण उर्फ माकू (रा. रेल्वे स्टेशन रोड) हा चाकू दाखवून जबरी चोरी ,लूट करीत …
मारवड येथील सु. हि. मुंदडे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा तीन दशकांनी रंगला मेळावा
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथील सु. हि. मुंदडे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल तीस वर्षांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. सोशल मिडियाच्या माध्यमातून ग्रुप तयार करत तब्बल तीस वर्षानंतर हे माजी विद्यार्थी एकत्र आहे. सु.हि. मुंदडे हायस्कूलच्या सन १९९४-९५ ची इयत्ता दहावीची बॅच व सन १९९६-९७ ची इयत्ता बारावीची बॅचचा …
पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ३० खाटांचे ग्रामिण रुग्णालय म्हणून मंजुरी
राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील यांनी दिली माहिती अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांचे ग्रामिण रुग्णालय म्हणून श्रेणीवर्धन करण्यास मंजूरी दिल्याची माहिती राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. यामुळे केंद्राचे ग्रामिण रुग्णालयात रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत महाराष्ट्र शासन …
विद्रोही मराठी साहित्य संमेलनात दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी
अमळनेर (प्रतिनिधी) येथे ३ व ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची दोन दिवसीय कार्यक्रमांची भरगच्च कार्यक्रम विद्रोही सांस्कृतिक चळवळ व विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीतर्फे आयोजित करण्यात आले आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत दोन भव्य सभा मंडप असून ३ दालनांमध्ये बालमंच, युवा मंच यासह एकूण …
कै. न्हानाभाऊ पाटील कला महाविद्यालयात महात्मा गांधींना अभिवादन
अमळनेर (प्रतिनिधी) कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनाअभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत देसले होते.त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून जीवन कार्यावर प्रकाश टाकला. विकसित भारताकडे वाटचाल करीत असताना ग्रामीण भागातील खेडी ओस …
साहित्य संमेलनात पथनाट्य व उद्बोधनगीतांतून करणार मतदार जनजागृती
अमळनेर (प्रतिनिधी) पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर आणि निवडणूक आयोग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना निवडूक अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. साहित्य संमेलनामध्ये विद्यार्थी स्वयंसेवकाकडून पथनाट्य व उद्बोधन गीतांचे सादरीकरण केले जाणार आहे. याच्या पूर्वतयारीसाठी महाविद्यालयात श्रीमती (मुख्य …
मराठी साहित्य संमेलन अमळनेर मराठी वाड्मय मंडळाचे की खाजगी धंदेवाईकांचे ? माजी आमदार डॉ. बि एस पाटील
स्वागत कमानींवर इंग्रजी शाळांच्या जाहिराती करून मराठीची गळचेपी अमळनेर (प्रतिनिधी) अखिल भारतीय साहित्य संमेलन हे घरचा खासगी कार्यक्रम समजून त्याची आखणी, नियोजन आणि जाहिराती करून होत असल्याचे दिसून येत आहे. साहित्य संमेलन मराठी असून इंग्रजी शाळांच्या जाहिराती म्हणजे चक्क मराठीची गळचेपीच असल्याचा आरोप बुद्धीजीवींकडून केला जात असून अखिल भारतीय मराठी …