स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  CAG) – गिरीश चंद्र मुर्मू (14 वे)   2.  भारताचे लेखा नियंत्रक (CGA) – श्री एस.एस. दुबे (24वे)   3. भारताचे ऍटर्नी जनरल- आर वेकेटरामानी   4. भारताचे सॉलिसिटर जनरल – तुषार मेहता   5. संरक्षण प्रमुख (CDS) – अनिल चौहान   6. इस्रोचे अध्यक्ष- एस सोमनाथ (10वे)   …

हेडावे येथील ग्रामसेवकाची बदली प्रशासनाने तात्काळ थांबवावी

अमळनेर(प्रतिनिधी)  तालुक्यातील हेडावे येथील ग्रामसेवकाची बदली तात्काळ थांबवण्यात यावी अन्यथा आंदोलनाचा इशारा हेडावे येथील ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. हेडावे येथे २० जानेवारी २०२३ रोजी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी आपला पदभार स्वीकारला. या ११ महिन्याच्या काळात तब्बल ३ ग्रामसेवकांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामागे सरपंच …

लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित शाळांचे आजपासून वार्षिक स्नेहसंमेलन

अमळनेर (प्रतिनिधी) येथील लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित बालविकास मंदिर,नवीन मराठी शाळा व लोकमान्य विद्यालय या तिन्ही शाळांचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलना गुरुवारी दि १२ व उद्या शनिवार दि १३ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.  यावेळी वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक समारंभ पार पडणार आहे.आज १२ रोजी  सकाळी ८.३० वाजता लोकमान्य …

स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात अमळनेर नाशिक विभागात प्रथम

अमळनेर (प्रतिनिधी) स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात अमळनेर नगरपरिषदेचा नाशिक विभागात पहिला क्रमांक पटकावून आपल्या कामाची पवाती दिली आहे. तर राज्यात ४६ वा आणि  देशाच्या पश्चिम विभागात ९ वा क्रमांक आला आहे. शहरातील ५० हजार ते एक लाख लोकसंख्या असलेल्या नगरपालिकांमधून संपूर्ण देशातून १०४ वी रँक मिळाली आहे. देशाच्या पश्चिम विभागात …

अखिल भारतीय आणि विद्रोही साहित्य संमेलन निमित्त राबवली स्वच्छता मोहीम

अमळनेर(प्रतिनिधी)  येथे होणऱ्या जाणाऱ्या अखिल भारतीय आणि विद्रोही साहित्य संमेलन निमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे आदेशान्वये नगर परिषद मार्फत महास्वच्छता अभियान राबविले जात आहे.  दिनांक ११ जानेवारी रोजी बोरी नदी पात्र येथे सर्व सफाई कर्मचारी, अधिकारी, मुकादम,आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे,हैबतराव पाटील यांच्यामार्फत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. दिनांक …

स्वच्छता निरीक्षक युवराज चव्हाण यांची नंदुरबार येथे झाली बदली

अमळनेर (प्रतिनिधी) नंदुरबार नगरपरिषदेत अमळनेर येथील पलिकेच्या आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक युवराज श्रीपत चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे.  नगरपरिषद प्रशासन संचालनालयास केलेल्या विनंतीनुसार चव्हाण यांची बदली झाली असून याबाबत नगरपरिषद संचालनालयाचे आदेश दि ९ जानेवारी रोजी प्राप्त झाले आहेत.  चव्हाण हे गेल्या २७  वर्षांपासून अमळनेर पालिकेत सेवारत होते,कालांतराने त्यांची …

अमळनेरात उबाठा गटातर्फे राहुल नार्वेकरांचा केला निषेध

अमळनेर(प्रतिनिधी) आमदार अपात्रताप्रकरणी अध्यक्षांनी दिलेला निकाल लोकशाहीला मारक असल्याच्या भावना व्यक्त करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटातर्फे निषेध नोंदवून आंदोलन करण्यात आला.   शहरातील मंगलमूर्ती चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल नार्वेकर यांच्या निषेधाच्या घोषणा करण्यात आल्या.यावेळी नाना ठाकूर, विजय पाटील,चंद्रशेखर भावसार, सचिन पाटील, …

नंदगाव येथे दुर्मिळ शिवकालीन शस्रांसह शिवकालीन लाठी काठींचे मांडले प्रदर्शन

अमळनेर  (प्रतिनिधी) स्पार्क फाउंडेशनतर्फे जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती युवा दिनानिमित्त १२ रोजी तालुक्यातील नंदगाव  येथे दुर्मिळ शिवकालीन शस्रांचे प्रदर्शन आणि शिवकालीन लाठी काठी प्रदर्शन अयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन प पू श्री श्री १००८ ईश्वरदासजी महाराज ,श्री गोविंदासजी महाराज यांच्या वतीने करण्यात आले. स्पार्क फौंडेशन चे  पंकज …

बाल संमेलनाध्यक्षपदी चाळीसगावचा शुभमसह जळगावची पियुषा, अमळनेरच्या दिक्षाची निवड

अमळनेर (प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या पार्श्वभूमीवर दि. १ रोजी बालमेळावा झाला. अध्यक्षपदी तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय,  चाळीसगांवचा विद्यार्थी शुभम सतीश देशमुख होता. उद्घाटक म्हणून रावसाहेब रुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जळगावची विद्यार्थीनी पियुषा गिरीष जाधव तर बाल स्वागताध्यक्ष म्हणून डि.आर.कन्या हायस्कूल, अमळनेरची विद्यार्थीनी दिक्षा राजरत्न सरदार हिची …

अमळनेर बस आगारात रस्ते अपघात सुरक्षा सुरक्षितता अभियानाचे उद्घाटन

अमळनेर(प्रतिनिधी) येथील बस आगारात रस्ते अपघात सुरक्षा सुरक्षितता अभियानाचे उद्घाटन प्रांताधिकारी महादेव खेडकर यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी रस्ते अपघात, सुरक्षा व सुरक्षितता या विषयावर उपस्थित मान्यवारांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी पोलीस निरीक्षक विजय शिंदे, रा.प.महामंडळाचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक माधवराव देवधर,आगार प्रमुख इम्रान पठाण,सहाय्यक वाहतूक अधीक्षक . एस. चौधरी, सहाय्यक कार्यशाळा …