अमळनेर (प्रतिनिधी) येथील रोटरी क्लबच्या वतीने दि 14 ते 17 दरम्यान यंदाही रोटरी उत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभ आज सायंकाळी 4 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अमळनेर शहरातील आर के नगर समोरील आर. के. पटेल फॅक्टरीच्या भव्य कंपाऊंड मध्ये चार दिवस हा उत्सव रंगणार असून यात …
अल्पवयीन मुलीला बदनामीची धमकी देत पळवून आणणाऱ्या चोपड्याच्या दोघांना सात वर्षांची शिक्षा
11 साक्षीदारांसह रिक्षाचालक आणि गांधलीपुरा भागातील प्रत्यक्ष साक्षीदार यांची साक्ष ठरली महत्त्वाची अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीला बदनामीची धमकी देत चोपड्यातून अमळनेरला पळवून आणणाऱ्या चोपड्याच्या दोघांना अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यात अकरा साक्षीदार तपासले. रिक्षाचालक आणि गांधलीपुरा भागातील प्रत्यक्ष साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य धरून …
अमळनेरच्या समाजकार्य महाविद्यालयात वर्धिष्णू संस्थेच्या आनंदघर प्रकल्पासाठी कॅम्पस मुलाखती
15 विद्यार्थ्यांची पुढील प्रक्रियेसाठी निवड अमळनेर (प्रतिनिधी) येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालयात जळगाव येथील वर्धिष्णू या संस्थेच्या आनंदघर प्रकल्पासाठी कॅम्पस मुलाखती झाल्या. यात 15 विद्यार्थ्यांची पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलद्वारे आयोजन करण्यात आले होते. आनंदघर प्रकल्पाकरिता एमएसडब्ल्यू उमेदवाराची निवड करण्यासाठी वर्धिष्णु संस्थेकडून शख्याती मुमैया …
वाळू चोरट्यांनी तापी नदी पात्रात खोदलेले चारी बुजून पुन्हा सुरू केली अवैध वाळूची वाहतूक
महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप अमळनेर (प्रतिनिधी) तापी काठावर धावडे गावांच्या नदीच्या पात्रातून अवैध वाळू रोखण्यासाठी वाळू चोरांनी रस्त्यात खोदलेली चारी पुन्हा बुजून वाहनांचा मार्ग मोकळा केला आहे. यामुळे पुन्हा मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा होत असून याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. धावडे हे सावखेडा हुन तीन …
मंगळग्रह सेवा संस्था व ग्रामीण रुग्णालयातर्फे एड्स जनजागृती उपक्रमातून केले प्रबोधन
पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन, चलचित्रफीत, चालता बोलता आदी एड्स जनजागृतीपर राबवले विविधांगी उपक्रम अमळनेर (प्रतिनिधी) येथील मंगळग्रह मंदिर परिसरात मंगळवारी पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन, चलचित्रफीत, चालता बोलता आदी एड्स जनजागृतीपर विविधांगी उपक्रम राबवून जनतेचे उद्बोधन करण्यात आले. याप्रसंगी एचआयव्ही व कावीळ तपासणीही करण्यात आली. जागतिक एड्स दिनाच्या अनुषंगाने मंगळग्रह सेवा संस्थेचे …
विशाल चौधरीचा जिल्हाधिकारींनी काढलेला एमपीडीएचा आदेश औरंगाबाद खडपीठाने ठरवला रद्दबातल
अमळनेर (प्रतिनिधी) येथील विशाल चौधरीचा जिल्हाधिकारींनी काढलेला एमपीडीएचा आदेश कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खडपीठाने तो रद्दबातल ठरवला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील भोई वाडा भागातील विशाल दशरथ चौधरी याच्यावर जिल्हाधिकारीच्या आदेशाने एमपीडीएची कारवाई करून त्याला पुणे येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. विशाल याच्यावर …
ओरिएंटल इंस्युरन्स कंपनीकडून पिक विमा मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय प्रभाव पडतोय कमी
पिक विमा कंपनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची करतेय थट्टा, शेतकरी नेते सुभाष पाटील यांनी केला आरोप अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव आणि नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमासाठी सरकारी ओरिएंटल इंस्युरन्स कंपनी निश्चित केली आहे. हीच कंपनी नगर जिल्ह्याला १८१ कोटी रुपये देते आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे. यासाठी जळगाव जिल्ह्याचा राजकीय …
सांघिक काम करुन साहित्य संमेलन यशस्वी करुन दाखविण्याचा गठीत समितीनी केला निर्धार
अमळनेर (प्रतिनिधी) येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनसाठी गठित सर्व समित्यांची समन्वय बैठक प्रताप तत्वज्ञान मंदिरात पार पडली. सांघिक काम करुन संमेलन यशस्वी करुन दाखविण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. तीन टप्प्यात झाली बैठक. मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला व्यासपीठावर म.वा …
जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते चौबारी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चौबारी येथे मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते थाटात पार पडला. या प्रसंगी कामगार नेते एल.टी. पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रापंचायत सदस्य यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*
🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑 *14 डिसेंबर* Q.1) 8 डिसेंबर रोजी कोणत्या खासदाराला लोकसभेतून बेदखल करण्यात आले? ✅ *मोहूआ मोईत्रा* Q.2) प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? ✅ *अनुराग ठाकूर* Q.3) नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक प्रदूषण क्रमवारीनुसार कोणते शहर …