आता भ्रष्टाचाराच्या केलेल्या पापाचे प्रायचित्त म्हणून निलंबन आणि थेट बडतर्फसाठी खबरीलालचा पाठपुरावा अमळनेर (खबरीलाल विशेष) येथील शासकीय रेशन गोडाऊनमध्ये व्यवस्थापक चोर अनिल पाटील दरमहा गरिबांच्या धान्याचा काळाबाजार करीत कसा भ्रष्टाचार करीत आहे, याचा भांडाफोड खबरीलालने केला आहे. त्यानंतर त्याचा पाठपुरावा करत अखेर प्रशासनाने अनिल पाटील यांचा गोडाऊन व्यवस्थापक म्हणून …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*
🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑 *13 डिसेंबर* Q.1) अलीकडेच किती राज्यात निवडणुका पार पडल्या आहेत? ✅ *पाच* Q.2) यंदाचा पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ *जावेद अख्तर* Q.3) नुकतेच कोणाच्या हस्ते पहिल्या भारतीय कला व वास्तुकला आणि डिझाईन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले? ✅ *नरेंद्र मोदी* …
गलवाडे बुद्रुक येथे 68 लक्षच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण करून विकास कामांचे भूमिपूजन
मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून विकास कामे, जयश्री पाटील यांच्या उपास्थितीत कार्यक्रम अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गलवाडे बुद्रुक येथे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन अंतर्गत मंजुर झालेल्या 68 लक्षच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे पाणी …
पराग स्पोर्ट्स संघाने पवार वॉरियर्स संघाचा पराभव करीत पटकवला भूषणभाऊ चव्हाण स्मृती चषक
पराग स्पोर्ट्स संघाने १४० धावांचे लक्ष्य १५.२ षटकात केले पूर्ण अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर नुकत्याच झालेल्या भूषणभाऊ चव्हाण स्मृती चषकाच्या अंतिम सामना पराग स्पोर्ट्स विरुद्ध पवार वॉरियर्स या दोन संघात झाला. पराग स्पोर्ट्स संघाने १४० धावांचे लक्ष्य १५.२ षटकात पूर्ण करीत विजेतेपद पटकवले. अंतिम सामन्यात पवार …
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्याने नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
अमळनेर शहरातील दक्ष नागरिक विजय पाटील यांनी पोलिसांकडे केली मागणी अमळनेर (प्रतिनिधी) शहरात भटक्या कुत्र्यांचा मोठा त्रास वाढल्याने नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्याने संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विजय पाटील यांनी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर शहरातील …
विमा कंपनीच्या नागपूर येथील मुख्य कार्यालयात जाऊन अमळनेरच्या शेतकऱ्यांनी केला दांगडो
विमा कंपनीचे फाईल्स फेकून संगणकही तोडले अमळनेर (प्रतिनिधी) नुकसान होऊनही भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ओरिएंटल इंस्युरंस कंपनीच्या नागपूर येथील मुख्य कार्यालयात जाऊन अमळनेरच्या शेतकऱ्यांनी दंगडो करून अधिकाऱ्यांना धारेवार धरले. विमा कंपनीने पुन्हा दिल्ली येथील तांत्रिक सल्लागार समिती टॅक (टी ए सी) कडे अपील करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. यामुळे …
ताडेपुरा आश्रमशाळेत शरद पवार यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमानी केला साजरा
अमळनेर (प्रतिनिधी) ताडेपुरा आश्रमशाळेत शरद पवार यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थीनीच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक आमदार दिलीप तात्या सोनवणे, राष्ट्रवादीच्या नेत्या तिलोत्तमा पाटील, माजी जि. प. सदस्य शिवाजी नाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष रफिक शेख, …
दंडासह चोरीचा गुन्हाही दाखल केल्याशिवाय वाळू वाहतुकीची वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यास नकार
पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी घेतली कठोर भूमिका अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यातून होणारी अवैध वाळू वाहतूक रोखण्याच्या कारवाईत महसूल विभागाच्या दंडासह चोरीचा गुन्हाही दाखल केल्याशिवाय वाळू वाहतुकीची वाहने पोलीस स्टेशनच्या आवारात जमा करणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. यामुळे आता यापुढे पोलीस आणि महसूल या दोन्ही कारवायांना वाळू …
गुजरात येथे कंपनीत असलेल्या तरुणाची गावी कावपिंप्री येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
अमळनेर (प्रतिनिधी) गुजरात येथे कंपनीत असलेल्या तरुणाने आपल्या गावी आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कावपिंप्री येथे घडली. याप्रकारणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथील धनंजय गुलाबराव पाटील (वय २०) याने १२ रोजी दुपारी २ वाजता स्वतःच्या राहत्या घरी छताला सुताची …