किसान काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन अमळनेर (प्रतिनिधी) जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्यामुळे जिल्ह्यातील २७ मंडळातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रिम रक्कम तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी किसान काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदन म्हटले आहे की, संपूर्ण जिल्ह्यात सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पाऊस झाल्याने …
मुडी प्र. डांगरी येथे मारवड पोलिसांनी छापा टाकून गावठी दारूची भट्टी उदध्वस्त करीत उतरवली नशा
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथे गावठी दारू भट्टीवर मारवड पोलिसांनी छापा टाकून भट्टी उदध्वस्त करीत नशा उतरवली. याप्रकारणी एकास रंगेहाथ पकडत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याबाबत अधिक माहिती अशी की, मुडी प्र. डांगरी येथे गावठी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने एपीआय शितलकुमार नाईक यांच्या आदेशावरून मारवड …
मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची ३ रोजी अमळनेर येथे होणार सभा
सभेच्या नियोजनासाठी झाली पूर्वनियोजन बैठक अमळनेर (प्रतिनिधी) मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांची ३ रोजी अमळनेर येथे सभा होणार आहे. यासाठी पूर्वनियोजन बैठक मराठा मंगल कार्यालयात झाली. यामुळे या सभेची उत्सुकता लागून आहे. सभा ही साने गुरुजी शाळेमध्ये होणार आहे. सभेच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीस प्रवीण देशमुख, सचिन …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*
: 30 November 2023 Current Affairs in English & Hindi ➼ Recently ‘Afghanistan’ has announced the permanent closure of its embassy located in New Delhi. हाल ही में ‘अफगानिस्तान’ ने नई दिल्ली में स्थित अपने दूतावास को स्थायी रूप से बंद करने की घोषणा की है। ➼ …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*
🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑 Q.1) पॅरा एशियन तिरंदाजी चॅम्पियनशिप 2023 मध्ये पद तालिकेत भारताचा क्रमांक काय आहे? ✅ *पहिला* Q.2) “आयुष्यमान भारत” चे नाव बदलून आता काय ठेवण्यात आले आहे? ✅ *आयुष्यमान आरोग्य मंदिर* Q.3) 2024 चे आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे देण्यात आले? ✅ *भारत* Q.4) …
मंगळग्रह मंदिराच्या शोभायात्रेदरम्यान फळे, फ्रूट ज्यूस मिठाई व फरसाण वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) श्री मंगळग्रह मंदिरात शनिवारी, २५ नोव्हेंबर रोजी शोभायात्रा व वृक्षदिंडी तसेच २६ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या वर राजा भगवान श्री विष्णूजी व वधू राणी श्री तुलसीदेवी यांच्या विवाह महासोहळ्यास अनेकांचे सहकार्य लाभले. अनेक दात्यांनी शोभायात्रेदरम्यान फळे, फ्रूट ज्यूस मिठाई व फरसाण वाटप केले. यात लायन्स व रोटरी क्लबच्या …
स्व. उदय बापू वाघ यांच्या चतुर्थ स्मृती दिनी अभिवादन करून दिला आठवणींना उजाळा
अमळनेर (प्रतिनिधी) भाजपचे दिवंगत नेते माजी जिल्हाध्यक्ष स्व. उदय बापू वाघ यांच्या चतुर्थ स्मृती दिनी अमळनेरात अनेकांकडून आदरांजली अर्पण करण्यात आली. अमळनेर बाजार समिती समोरील स्मारकस्थळी हितचिंतक व कार्यकर्त्यांची सकाळीपासून गर्दी झाली होती. यावेळी अनेकांनी बापूंच्या प्रतिमेस फुले वाहत त्यांच्या आठवणीना उजाळा दिला.‘सहवास जरी सुटला तरी स्मृती सुगंध देत राहील’,’आयुष्याच्या …
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री मंगळग्रहाच्या पालखीची काढली मिरवणूक
अमळनेर (प्रतिनिधी) मंगळग्रह सेवा संस्थेने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री तुळशी विवाह महासोहळ्याची परंपरा सुरू केली आहे. यंदा महासोहळ्याच्या प्रारंभी वराच्या वेशातील भगवान श्रीकृष्णाची श्री विष्णू अवतारातील मूर्तीची सजवलेल्या रथात व श्री मंगळग्रहाची उत्सवमूर्ती असलेल्या पालखीची मंदिर परिसरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात महिला-पुरुष भाविकांनी भक्तिमय वातावरणात जल्लोषपूर्ण नृत्य करून आनंद व्यक्त …
शहरातील दुकानदारांना मराठीत फलक लावण्याचे आदेश द्यावेत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन अमळनेर (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील दुकानदारांना मराठीत फलक लावण्याचे आदेश देण्यात यावेत, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मराठी भाषेत फलक लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश देण्यात आले आहेत. …
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
अमळनेर (प्रतिनिधी) येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र राज्य माळी समाज महासंघ, क्षत्रिय काच माळी समाज पंचमंडळ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळतर्फे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाउपाध्यक्ष भीमराव महाजन, शहराध्यक्ष प्रताप पाटील, क्षत्रिय माळी समाज पंच …