स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

7 ऑगस्ट; चालू घडामोडी Q.1) पुण्यातील लवासा येथे कोणाचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारण्यात येणार आहे? ✅ *पंतप्रधान नरेंद्र मोदी* ( अंदाजे उंची 190 ते 200 मीटर) Q.2) भारतीय U23 राष्ट्रीय फुटबॉल संघाचा मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड झाली आहे? ✅ *क्लिफर्ड मिरांडा* Q.3) वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाने सरकार आणि …

शहरात १०५ फूट तिरंगा चौकात शिलाफलक उभारण्यात येणार

मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली माहिती अमळनेर (प्रतिनिधी) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगता निमित्त शहरात १०५ फूट तिरंगा चौकात शिलाफलक उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली. पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सांगितले की, मेरी मिट्टी मेरा देश अभियांनातर्गत देशातील स्वातंत्र्य सैनिक ,हुतात्म्यांना , देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांसाठी …

ग्रामविकास शिक्षण मंडळाच्या वादामुळे ४० कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यांपासून रखडले वेतन

कर्मचाऱ्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे मांडली कैफियत अमळनेर (प्रतिनिधी) संस्थेच्या वादामुळे तालुक्यातील मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित तीन शाळेतील सुमारे ४० कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. संस्थेच्या वादामुळे काम शिक्षण विभागाने कर्मचार्‍यांना वेठीस धरू नये म्हणून कर्मचाऱ्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे कैफियत मांडली. मारवड …

जि.प.अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांची रखडलेली मानधन वाढ पूर्ववत करण्यासाठी मंत्री अनिल पाटील यांना साकडे

अमळनेर (प्रतिनिधी) २०१६ पासून प्रतिवर्षी होणारी १०% मानधन वाढ पूर्ववत सुरू करावी अशी मागणी प्राथमिक शिक्षण परिषद अंतर्गत जिल्हा परिषद व महानगरपालिकेतील समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांच्या मार्फत शासनाला निवेदन दिले . कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे की, राज्यातील ६२५१ कर्मचारी समग्र शिक्षा योजनेअंतर्गत …

तीन मोटरसायकलींच्या धडकेत एक जागीच ठार तर तीन झाले जखमी

अमळनेर (प्रतिनिधी) एकाच वेळी तीन मोटरसायकलींच्या झालेल्या धडकेत एक मोटरसायकलस्वार जागीच ठार तर तीन जखमी झाल्याची घटना तालुक्यातील देवळी शिवारात अमळनेर चोपडा रस्त्यावर ५ रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, प्रकाश रेबान बारेला (वय ३५ रा तासखेडा) …

हिरापूर व शेळावे बु.येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले स्वागत अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर मतदारसंघातील हिरापूर व शेळावे बु. येथील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय अमळनेर येथे हा प्रवेश सोहळा पार पडला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये सर्व प्रमुख …

आमदार चिमणराव पाटील यांच्या वाहनाला संरक्षण करणार्‍या पोलिसांच्या गाडीची धडक

सीट बेल्ट लावलेला असल्याने सुदैवाने काहीच झाली नाही इजा अमळनेर (प्रतिनिधी) पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या वाहनाला संरक्षण करणार्‍या पोलिसांच्या गाडीने धडक दिल्याची घटना ६ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अमळनेर चोपडा रस्त्यावर सिंधी कॉलनी जवळ घडली. सीट बेल्ट लावलेला असल्याने सुदैवाने त्यांना काहीच इजा झाली नाही. याबाबत अधिक माहिती …